बगदाद : इराकमधील मोसूल शहरात इसिससविरुद्ध सुरू असलेली लढाई आता शेवटच्या टप्प्यात पोहोचल्याचे स्पष्टपणे दिसत असून, इसिसचा म्होरक्या असलेल्या अबू बक्र अल बगदादीला इराकी फौजांनी घेरले आहे. चहुबाजूंनी कोंडी झालेली असतानाही बगदादीने अल फुरकान मीडियाच्या माध्यमातून एक ध्वनिफित प्रसारित करून आपल्या समर्थकांना ‘‘माघार घेऊ नका, चिवटपणे लढा द्या आणि लढतच राहा,’’ असा संदेश दिला आहे. इसिसने इराक आणि सीरियात आपले बस्तान बसवले होते. मात्र इसिसचा बालेकिल्ला असलेल्या मोसूल शहरावरही इराकी फौजांनी चाल करत या शहराला वेढा घातला आहे. (वृत्तसंस्था)
बगदादीची अतिरेक्यांना चिथावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2016 04:24 IST