शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

१०० पट वेगवान इंटरनेट देणारे नवे वाय-फाय तंत्र विकसित

By admin | Updated: March 21, 2017 00:37 IST

कोणत्याही प्रकारे हानिकारक नसलेल्या इन्फ्रारेड किरणांवर आधारित असे नवे वायरलेस इंटरनेट वैज्ञानिकांनी विकसित केले असून

लंडन : कोणत्याही प्रकारे हानिकारक नसलेल्या इन्फ्रारेड किरणांवर आधारित असे नवे वायरलेस इंटरनेट वैज्ञानिकांनी विकसित केले असून, त्याचा वेग सध्याच्या वाय-फायपेक्षा १०० पट अधिक असेल, शिवाय त्यावर अधिक वायरलेस उपकरणे एकाच वेळी चालविता येऊ शकतील.वाय-फायचा कमी वेग हा प्रत्येकाचाच त्रासदायक अनुभव असतो, शिवाय अधिकाधिक वायरलेस उपकरणे वापरली जाऊ लागल्याने, उपलब्ध असलेले वाय-फाय ‘जाम’ होणे ही आणखी एक अडचण असते. या नव्या इन्फ्रारेड वाय-फायने या दोन्ही अडचणींवर मात होणार असल्याचा वैज्ञानिकांचा दावा आहे.नेदरलँडमधील एन्डोव्हेन तंत्रज्ञान विद्यापीठातील संशोधकांनी विकसित केलेल्या या नव्या वायरलेस प्रणालीची क्षमता, ४० गिगाबाइट््स प्रति सेकंदाहून अधिक एवढी प्रचंड आहे. एवढेच नव्हे, तर यात प्रत्येक उपकरण स्वतंत्र इन्फ्रारेड किरणावर चालणार असल्याने, यात अनेक उपकरणांना नेटवर्क ‘शेअर’ करावे लागत नाही.या वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, ही यंत्रणा वापरायला सुलभ व उभारायलाही सोपी आहे. यात वायरलेस डेटा काही केंद्रीय ‘लाइट अँटेना’मधून येतो व या अ‍ॅँटेना घराच्या छतावरही लावता येऊ शकतात. या अँटेना आॅप्टिकल फायबरमधून येणारे इन्फ्रारेड प्रकाशकिरण अचूकपणे हव्या त्या उपकरणाला पुरवू शकतात. या अँटेनांमध्ये ‘ग्रेटिंग’च्या जोड्या असतात व त्या विविध वेव्हलेंग्थच्या प्रकाश शलाका विविध कोनांतून चहूकडे पसरवितात.या प्रकाश शलाकांची वेव्हलेंग्थ बदलली की, त्यांची दिशाही बदलते. वैज्ञानिक म्हणतात की, ‘तुम्ही हातात स्मार्ट फोन किंवा टॅबलेट घेऊन जागा बदललीत, तर दुसऱ्या प्रकाश शलाकेची अँटिना ‘टेकओव्हर’ करते व तुमचे नेटवर्क विनाखंड सुरू राहाते. या प्रणालीत नव्याने वापरात येणारे उपकरण यंत्रणेत सामावून घेणेही अगदी सोपे आहे. कारण सध्याच्या पद्धतीप्रमाणे या वाढीव उपकरणाला अन्य कोणत्याही उकरणाचे नेटवर्क ‘शेअर’ करावे लागत नाही. बसविलेल्या त्याच अँटिनाकडून वेगळ््या वेव्हलेंग्थच्या प्रकाश शलाकेवर हे नवे उपकरण स्वतंत्रपणे चालू शकते. या नव्या प्रणालीचे प्रयोग केले, तेव्हा संशोधकांना २.५ मीटर अंतरापर्यंत ४२.८ गिगाबाइट््स प्रति सेकंद एवढा वेग मिळाला. सध्या उपलब्ध असलेले चांगल्यात चांगले वाय-फाय वापरले, तरी एवढ्या अंतरापर्यंत जास्तीत जास्त ३०० मेगाबाइट््स प्रति सेकंद एवढा वेग मिळू शकतो. म्हणजे सध्याचा वेग या नव्या प्रणालीहून शंभर पटीने कमी आहे.वैज्ञानिकांनी सध्या या नव्या प्रकाश शलाकांवर आधारित तंत्राचा वापर फक्त डाउनलोड करण्यासाठीच करून पाहिला आहे व अपलोडसाठी पूर्वीप्रमाणे रेडिओ सिग्नलच वापरले. कारण अपलोडिंगसाठी तुलनेने इंटरनेटची खूपच कमी क्षमता लागते. (वृत्तसंस्था)