शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
2
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
3
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
4
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
5
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
6
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
7
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
8
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
9
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
10
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
11
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
12
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
14
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
15
सवतीचे घर बळकावण्यासाठी क्रेनचा वापर; साथीदारांसह घरात घुसून केली मारहाण
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
17
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
18
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
19
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
20
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   

दक्षिण सुदानच्या राजधानीत अडकले ३०० भारतीय

By admin | Updated: July 13, 2016 02:46 IST

दक्षिण सुदानमधील यादवीला पुन्हा तोंड फुटल्यामुळे देशाची राजधानी जुबात ३०० हून अधिक भारतीय अडकून पडले आहेत.

जुबा : दक्षिण सुदानमधील यादवीला पुन्हा तोंड फुटल्यामुळे देशाची राजधानी जुबात ३०० हून अधिक भारतीय अडकून पडले आहेत. वांशिक आधारावर फूट पडलेल्या दोन सशस्त्र गटांत गुरुवारपासून लढाई सुरू असून, भारतीयांनी भारतीय दूतावासासह विविध ठिकाणी आश्रय घेतला आहे. जुबातील भारतीयांची सुटका करण्याची योजना आखण्यात आल्याचे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी टिष्ट्वटरवरून सांगितले. ‘दक्षिण सुदानमधील घडामोडींची मला कल्पना आहे, घाबरू नका. तुमचे नाव भारतीय दूतावासात नोंदवा,’ असे आवाहन त्यांनी सुदानमधील भारतीयांना केले. दुसरीकडे भारतीय दूतावासाने भारतीयांच्या संपर्कात राहण्यासाठी व्हॉटस् अ‍ॅप ग्रुप तयार केला आहे. ‘जुबातील सर्व भारतीय सुरक्षित आहेत. तथापि, तुंबळ लढाई सुरू असून, जुबात तोफगोळ्यांचा मारा होत आहे. आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असून, योग्य संधी मिळताच भारतीयांची सुटका केली जाईल. मात्र, सध्या तरी परिस्थिती प्रतिकूल आहे. विमानतळ बंद असून, रस्त्यावर जागोजागी अडथळे निर्माण करण्यात आले आहेत, त्यामुळे तूर्त भारतीयांची सुटका करणे कठीण आहे,’ असे भारताचे दक्षिण सुदानमधील राजदूत श्रीकुमार मेनन यांनी सांगितले. ‘संयुक्त राष्ट्रसंघाच्या दक्षिण सुदानमधील शांतता पथकांत २,५०० भारतीय सैनिकांचा समावेश असून, त्यातील १५० सैनिक राजधानी जुबात आहेत. मात्र, त्यांना मदत करणे शक्य नाही,’ असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)अडकून पडलेल्यांत महाराष्ट्र पोलीस दलाच्या ३० अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे अधिकारी संयुक्त राष्ट्र शांतता पथकात नेमणुकीला आहेत. पोलीस उपायुक्त शीला सैल यांचा यात समावेश आहे. त्यांच्यासोबत चार कनिष्ठ अधिकारी आहेत. मुंबई पोलिसांनी याबाबत केंद्राकडून काहीही माहिती मिळाली नसल्याचे सांगितले. तथापि, हे सर्व अधिकारी सुखरूप असल्याचे केंद्रातील अधिकाऱ्यांनी सांगितले.