शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
2
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
3
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
4
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
5
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
6
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
7
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
8
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
9
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
11
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
12
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
13
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
14
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
16
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
17
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
18
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
19
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
20
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

नाट्यगृह नसल्याने सांस्कृतिक भूक भागेना!

By admin | Updated: December 22, 2014 15:05 IST

एकेकाळी /राज्यभरात लौकिकास पात्र ठरलेली हिंगोलीची नाट्यचळवळ नाट्यगृहाअभावी थंडावली आहे.

भास्कर लांडे ल्ल /हिंगोली एकेकाळी /राज्यभरात लौकिकास पात्र ठरलेली हिंगोलीची नाट्यचळवळ नाट्यगृहाअभावी थंडावली आहे. तरीही १९९५ पासून २0१0 पर्यंत तीन-चारवेळा बेंडे एकांकिका स्पध्रेने चळवळीला जगवण्याचा प्रयत्न केला; परंतु अभिनय जरी उघड्यावर करता येत असला तरी तांत्रिक बाबींशिवाय नाटक होवू शकत नाही. त्यातून बेंडे एकांकिकेचा उपक्रम बंद पडला. हळूहळू सांस्कृतिक चळवळीला अवकळा आल्याने हिंगोलीतील सांस्कृतिक चळवळथंडावली आहे. हिंगोलीत १९६८ मध्ये सुरू झालेल्या कै. o्रीपाद नृसिंह बेंडे एकांकिकेने चार दशके गाजवली. त्याने महाराष्ट्रात सर्वदूर लौकिक मिळवला. त्यातून स्थानिक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळाले. जागेअभावी संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर ताटवे लावून ही स्पर्धा घ्यावी लागली. नंतर महावीर भवनचा आधार मिळाला; परंतु इंदिरा खुले नाट्यगृहाचा कधीच वापर झाला नाही. आर्केस्ट्रा, संगीत रजनी आदी व्यावसायिक कार्यक्रमांसाठी नाट्यगृहाचा वापर झाला. बरेच छोटेखानी कार्यक्रमही झाले. मोठे सभागृह नसण्यापेक्षा या खुल्या नाट्यगृहाच्या असण्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजकांना चिंता नव्हती. लहानसहान संगीतसभा, बालक-महिलांचे कार्यक्रमही झाले. त्यातून सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू होती. मात्र हिंगोलीचे वैभव असणार्‍या बेंडे एकांकिकेस हे नाट्यगृह अपुरे पडू लागले. लहान आकारामुळे अपूर्ण जागा, आसन व्यवस्थेचा अभाव, लहान स्टेज, चेंजिंग रूमही नव्हत्या. त्यातच गृहास छत नसल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न होता. महिला आणि लहान मुलांची चिंता होती. प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामुळे जागा अपुरी पडत होती. त्यातून नाट्यगृह उभारणीचा विषय पुढे आला. कोट्यवधींचा निधी मंजूर झाला. काम सुरू झाले. ५0 टक्के काम पूर्णही झाले. अचानक ते बंद पडले. त्याला आज सात वर्षे उलटले. नाट्यगृहासोबत नाट्यचळवळीस अवकळा आली नसून सांस्कृतिक कार्यक्रमांना घरघर लागली. मुळात नाट्यगृह नियोजनपूर्वक बांधलेच नव्हते. स्टेजची अर्धवट उभारणी झाली होत. स्टेज उभारणीस उशिराने सुरूवात करण्यात आली होती. पिलरही टाकण्यात आले होते. तेव्हापासून काम बंद पडले. त्याच्या निधीची विल्हेवाट लावण्यात आली. नंतर कोणी विषयही काढला नाही. अर्धवट नाट्यगृहाचा उपयोग होणारच नव्हता. तिथे योग्य प्रकाशयोजना, नेपथ्य, पडदा, स्टेज उभारणी करता येत नाही म्हणून व्यावसायिक नाटकांचा विषय संपला. दुसरीकडे संघटना, शाळा, महाविद्यालये, प्रतिष्ठाणे कार्यक्रमांसाठी इच्छुक असले तरी उपलब्ध जागा नाही. मिळलेल्या जागेचे भाडेही परवडत नाही. नाट्यगृहाच्या नव्याने बांधकामास सुरूवात करावी, असे कोणाला वाटत नाही. लोकप्रतिनिधींना सांस्कृतिक चळवळीशीही काही देणोघेणे नाही. आजही गावागावात नाटक पाहणारे असले तरी त्यांची इच्छा पूर्ण होत नाही. नव्या पिढीच्या जन्मापूर्वीच सांस्कृतिक चळवळीने शेवटची घटका मोजली. उथळपणा वाढून नवतंत्रज्ञानाच्या ते अधीन झाले. मुळात सांस्कृतिक संस्काराअभावी त्यांच्यात प्रगल्भता आली नाही.

-------------

हिंगोलीतील रामलीला मैदानालगत इंदिरा खुले नाट्यगृहाच्या जागी नव्याने नाट्यगृह उभारणी सुरू केली होती. अचानक ते बांधकाम बंद पडले. त्याला ७ वर्ष लोटले तरी आजही ते अर्धवट अवस्थेत आहे.

■ अगदी स्वस्तात जरी हे नाट्यगृह मिळत असले तरी फायदा नव्हताच. नाईलाजाने बेंडे एकांकिकेसाठी खाजगी सभागृह घेण्याकरिता पुष्कळ पैसे मोजावे लागायचे. संपूर्ण एकांकिकेच्या खर्चाएवढेच जागेचे भाडे लागत होते. तेव्हा खुले नाट्यगृह असूनही त्याचा फायदा होत नसल्याचा विचार आला. खर्चाअभावी ११९५ ला एकांकिका बंद पडली. पुढे ११९८ ला कशीतरी सुरू केलेली एकांकिका पुन्हा २00८ मध्ये गुंडाळावी लागली.

■ नाट्यगृह उभारणीच्या चळवळीसाठी कलाकार कमी पडले. रसिकांचा आवाजही उठत नाही. त्यातच लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे जन्मत: कलेचे गुण असले तरी त्याच्या सुप्त गुणांना वाव नसल्याची प्रतिक्रिया नाट्यकलावंत सुनील पाटील यांनी दिली.