शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

वार्धक्याच्या खुणा मिटवण्यापेक्षा वार्धक्यालाच ठेवा दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 17:08 IST

वास्तवातल्या वयापेक्षा तुम्ही नक्कीच दिसाल तरुण..

ठळक मुद्देहवा, पाणी आणि अन्नातील दुषित घटक आपल्या आरोग्याची आणि त्यातही आपल्या त्वचेची वाट लावत असतात. त्यापासून आपण वाचायला हवं.थोड्या पाण्यात लिंबू पिळून त्यानं आपली त्वचा स्वच्छ केल्यास अनेक दुषित घटक त्वचेपासून मुक्त होतात आणि त्वचेला टवटवी येते.आपल्या शरीरात हेल्दी फॅट्स जाताहेत की नाहीत याचीही काळजी घ्यायला हवी.आपली त्वचाही टेन्शनमुळे खराब होते. म्हातारी होते. त्यावर सुरकुत्या येतात. त्यामुळे टेन्शनफ्री जगण्याकडे लक्ष द्या.

- मयूर पठाडेम्हतारं व्हायला, म्हातारपणाची लक्षण चेहºयावर, शरीरावर दिसायला लागली की सारेच जण अस्वस्थ होतात. ही लक्षणंं लपवण्यासाठी मग तयांची धडपड सुरू होते. काही जण हे वार्धक्य लपवण्यात यशस्वी होतातही, पण ते वार्धक्य फक्त पडद्याआड आपण लपवलेलं असतं, त्याचं खरं स्वरुप फक्त आपल्यालाच माहीत असतं.वार्धक्य लपवण्याचा हा आटोकाट प्रयत्न वयाच्या एका टप्प्यानंतर किंवा खूप उशिरा सुरू होतो. वार्धक्य प्रत्येकाला अटळ आहे, हे निश्चित, पण ते आपण दूर निश्चितच ढकलू शकतो. आपण ज्या वयाचे आहोत, त्यापेक्षा तरुण खात्रीनं दिसू शकतो. त्यासाठी काही गोष्टी मात्र कराव्या लागतील.वार्धक्याला पळवण्यासाठी काय कराल?१- कुठल्या ना कुठल्या कारणानं बाह्य गोष्टींशी आपला संपर्क येत असतो. कधी हा संपर्क हवेमुळे असेल, कधी पाण्यामुळे, तर कधी अन्नामुळे. पण त्यात असलेले दुषित घटक आपल्या आरोग्याची आणि त्यातही आपल्या त्वचेची वाट लावत असतात. त्यापासून आपण वाचायला हवं आणि दुषित घटकांपासून आपल्याला जितकं लांब राहाता येईल तितकं लांब राहायला हवं.२- आपलं शरीर रोज स्वच्छ करताना, त्यावरील दुषित घटकही निघून गेले की नाहीत, याची खात्री करायला हवी. त्यासाठी रासायनिक घटक असलेल्या पदार्थांचा वापर मात्र शरीरावर अजिबात नको. थोड्या पाण्यात लिंबू पिळून त्यानं आपली त्वचा स्वच्छ केल्यास अनेक दुषित घटक आपल्या त्वचेपासून मुक्त होतात आणि त्वचेला टवटवी येते.३- आपल्या शरीरात हेल्दी फॅट्स जाताहेत की नाहीत याचीही काळजी घ्यायला हवी. हे फॅट्स आपल्या त्वचेचीही काळजी घेईल. फॅटी अ‍ॅसिड, मांसाहार करणाºयांनी मासे, आॅलिव्ह आॅइल.. यासारखे पदार्थ आपल्या शरीरात जाताहेत की नाहीत याची काळजी घ्यायला हवी.४- आपल्याला असलेल्या रोजच्या टेन्शन्समुळे आपल्या मनावरच फक्त त्याचा विपरित परिणाम होतो, असं नाही. आपली त्वचाही टेन्शनमुळे खराब होते. म्हातारी होते. त्यावर सुरकुत्या येतात. त्यामुळे टेन्शनफ्री जगण्याकडे लक्ष द्या. योगा, ध्यानधारणा, हास्यविनोद, मित्रमंडळीत मन रमवणं या गोष्टी केल्या, तर आपलाच नाही, आपल्या त्वचेचाही उत्साह वाढेल.५- त्वचा निरोगी राहाण्यासाठी योग्य आणि पुरेशी झोपही अत्यावश्यक आहे. रात्रीची झोप केव्हाही चांगली. झोपेचा कोटा पूर्ण करण्यासाठी मुद्दाम दुपारी झोपण्यापेक्षा शक्यतो रात्रीच पुरेशी झोप घ्यावी.६- व्यायाम हा प्रत्येकाच्या आरोग्याचा मूलमंत्र आहे. व्यायामामुळे केवळ तुमच्या मनाची, शरीराचीच नव्हे, तुमच्या त्वचेचीही शक्ती नक्कीच वाढेल.