रशियन मुलीला बेंगळुरूच्या चिमुकल्याचे हृदय
By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST
बेंगळुरू/चेन्नई : वय केवळ २ वर्षे १० महिने़ पण जग बघण्याआधीच मेंदुज्वराने या चिमुकल्याचे आयुष्य संपले़ पण त्याआधी एका रशियन मुलीला आपले हृदय देऊन हा चिमुकला जीव जणू अमर झाला़ त्याचे डोळे, किडनी, यकृत आदी अवयवही दान करण्यात आले़
रशियन मुलीला बेंगळुरूच्या चिमुकल्याचे हृदय
बेंगळुरू/चेन्नई : वय केवळ २ वर्षे १० महिने़ पण जग बघण्याआधीच मेंदुज्वराने या चिमुकल्याचे आयुष्य संपले़ पण त्याआधी एका रशियन मुलीला आपले हृदय देऊन हा चिमुकला जीव जणू अमर झाला़ त्याचे डोळे, किडनी, यकृत आदी अवयवही दान करण्यात आले़ गत गुरुवारी बेंगळुरूच्या मणिपाल रुग्णालयात या चिमुकल्याला ब्रेन डेड घोषित करण्यात आले होते़ अशास्थितीत त्याच्या पालकांनी त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला़ त्याचे डोळे(कार्निया) नारायण नेत्रालय, यकृत अपोलो रुग्णालय व किडनी सागर रुग्णालयातील योग्य रुग्णाला दान करण्यात आले़ हृदयाचे मॅच न मिळाल्याने चेन्नईत गरजू रुग्णाचा शोध घेतला गेला़ यावेळी चेन्नईच्या फोर्टिस रुग्णालयात एका रशियन मुलीला हृदय प्रत्यारोपणाची गरज असल्याचे लक्षात आले़ हृदयाच्या एका आजारावरील उपचारासाठी महिनाभरापूर्वी तिला फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ केवळ हृदय प्रत्यारोपण हाच एकमेव तिला वाचविण्याचा पर्याय होता़ यानंतर ब्रेन डेड चिमुकल्याचे हृदय केवळ ४७ मिनिटात बेंगळुरूवरून चेन्नईला पोहोचवले गेले़ शून्य अंशापेक्षा कमी तापमानावर प्रिझर्व्हेशन लिक्विडमध्ये ठेवण्यात आलेले हृदय घेऊन मणिपूर रुग्णालयातून रुग्णवाहिका निघाली़ या रुग्णवाहिकेने विमानतळापर्यंतचे ३़५ किमीचे अंतर केवळ १ मिनिट २० सेकंदात पूर्ण केले़ यानंतर विमान ३४ मिनिटात चेन्नईला पोहोचले़ तेथून ११ मिनिटात रुग्णवाहिकेने हे हृदय फोर्टिस रुग्णालयात पोहोचविण्यात आले़ याठिकाणी तब्बल आठ तासांच्या सर्जरीनंतर ते संबंधित रशियन मुलीच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले़