शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

स्त्रियांनी मानसिक, आर्थिक व सामाजिक दृष्टीने सक्षम व्हावे

By admin | Updated: March 30, 2015 01:17 IST

मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, जिल्हा माहिती कार्यालय

गोंदिया : मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, जिल्हा माहिती कार्यालय आणि श्री शारदा वाचनालय यांच्या संयुक्त वतीने श्री शारदा वाचनालयाच्या बजाज सांस्कृतिक सभागृहात आयोजित गोंदिया ग्रंथोत्सव-२०१५ अंतर्गत ‘२१ वे शतक आणि महिला सबलीकरण’ या विषयावर महाचर्चा आयोजित करण्यात आली होती. महाचर्चेमध्ये एस.एस. गर्ल्स महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. राजश्री धामोरीकर आणि प्रा. कविता राजाभोज, राजीव गांधी समाजकार्य महाविद्यालयाच्या प्रा. सविता बेदरकर, एम.बी.पटेल महाविद्यालय देवरीच्या प्रा. डॉ. वर्षा गंगणे आणि एन.एम.डी. महाविद्यालयाचे प्रा. बबन मेश्राम यांनी सहभाग घेतला. यावेळी डॉ. राजश्री धामोरीकर यांनी, चांगल्या संस्कारांनी आयुष्याला दिशा मिळण्यास मदत होते. स्त्री-पुरूष समानतेच्या युगात आई-वडिलांनी देखील मुलगा-मुलगी हा भेद करू नये. काळ बदलला तशी स्त्रीची भूमिकाही बदलली. ग्रंथालयातील विदूषी स्त्रिया आजही एक व्यक्ती म्हणून जगू शकत नाही. स्त्रियांनी त्यांच्या स्वसंरक्षणासाठीही सबल होणे महत्वाचे आहे, असे मत मांडले.प्रा. सविता बेदरकर यांनी, स्त्रीने आर्थिक, सामाजिक व बौध्दिकदृष्ट्या सबल होण्याबरोबरच शारीरिकदृष्ट्या सबल होणे महत्वाचे आहे. आजही ठिकठिकाणी अपमानास्पद वागणूक व समाज कंटकांच्या विभत्स वर्तनाला सामोरे जावे लागते. २१ व्या शतकात जो समाज छाती ठोकून स्त्रीरक्षणाच्या गोष्टी सांगतो तो समाज प्रसंगी तिचे भक्षणही करतो. म्हणून शतक कुठलेही असो स्त्रीने तिच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणे आवश्यक आहे. स्त्रीरक्षणाचे कायदे स्त्रियांच्या पाठीशी आहेत. पण त्या कायद्याचा उपयोग करणे किंवा मनगटातील ताकद दाखविणे यापेक्षा आपल्या व्यवहारातून समाजाला संधी देवू नये असे मत मांडले.प्रा. डॉ. वर्षा गंगणे यांनी, कुटुंब संस्था व समाज या एकमेकांना पुरक संस्था आहेत. चूल व मूल या संकल्पनेतून आजची स्त्री बाहेर पडली आहे. समाजातील सर्व घटकातील स्त्री अविभाज्य अंग आहे. समाजाने स्त्री विषयक विचार बदलविणे म्हणजे प्रत्येक व्यक्तीने स्त्रियांना योग्य ते स्थान देणे होय. यावेळी त्यांनी स्त्रीरक्षणावर भर दिला व विविध उदाहरणांच्या माध्यमातून स्त्रिया सुरक्षित नसल्याचे सांगितले. प्रा. कविता राजाभोज यांनी, निसर्गाने स्त्रीला प्रजननक्षमता प्रदान करून वेगळेपण दिले आहे. यावेळी त्यांनी ऋषी वाल्मिकी व सेंट पॉलचे स्त्रीविषयक विचार मांडले. काळाच्या ओघात स्त्रीने स्वत:ला देहस्विनी, समाजाने कुटूंबिनी बनविले. स्त्रीने दोन्ही भूमिका यशस्वीपणे निभावल्या. २१ व्या शतकातील स्त्री सबल असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. प्रा. बबन मेश्राम यांनी आपल्या वक्तव्यातून सक्षमीकरण व सबलीकरण यातील भेद व्यक्त केला. स्त्रियांचे सबलीकरण होण्याकरिता स्त्रियांचे सक्षमीकरण होणे आवश्यक असल्याचे सांगितले. स्त्री कुटूंबाची, समाजाची जबाबदारी व कर्तव्य कधीच नाकारली नाही. पण पुरूषांनी नेहमीच स्त्रियांचे स्थान दुय्यम मानले आहे, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी मांडले. संचालन रक्त संक्रमण अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी केले. आभार माहिती सहायक पल्लवी धारव यांनी मानले. कार्यक्रमाला महिला, विद्यार्थिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)