तिसऱ्या टप्यात ६३ गावांची निवड सुजलाम-सुफलाम ९४ गावे ५० पैशांपेक्षा कमी आणेवारीची १७ गावेनरेश रहिले गोंदियादुष्काळावर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानाला जिल्ह्यात उदंड प्रतिसाद मिळाला. जलयुक्त शिवार अभियानामुळे गोंदिया जिल्ह्यातील ९४ गावे वॉटर न्यूट्रल झाले आहेत. सन २०१९ पर्यंत राज्य दुष्काळमुक्त होईल या दिशेने पाऊल टाकले जात असल्याने तिसऱ्या टप्यात जिल्हा कृषि अधीक्षक कार्यालयाने ६३ गावांची निवड केली आहे. जलयुक्त शिवार अभियानातून जलसमृद्धी येत आहे.यात तीन तालुक्यातील प्रत्येकी १० गावे तीन तालुक्यातील प्रत्येकी सात गावे तर दोन तालुक्यातील एका तालुक्यातील प्रत्येकी सहा गावांची निवड करण्यात आली आहे.जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्यात सन २०१५-१६ मध्ये ९४ गावांची निवड करण्यात आली होती. निवड करण्यात आलेली ही गावे शंभर टक्के वॉटर न्यूट्रल झाली आहेत. दुसऱ्या टप्यात सन २०१६-१७ या वर्षात ७७ गावांची निवड करण्यात आली होती. या वर्षी जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्यातील१०, गोंदिया १०, गोरेगाव ११, तिरोडा ९, अर्जुनी मोरगाव ९, आमगाव ९, देवरी ११ व सालेकसा ८ गावांचा समावेश आहे. तिसऱ्या टप्यात सन २०१७-१८ गावांची संख्या कमी करून ६३ गावांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या तिरोडा, गोरेगाव व गोंदिया तालुक्यातील प्रत्येकी १० गावे, सालेकसा, देवरी वं अर्जुनी मोरगाव या तालुक्यातील प्रत्येकी सात गावे व आमगाव व सडक-अर्जुनी तालुक्यातील प्रत्येकी६ गावांचा समावेश आहे. तिसऱ्या टप्यात समाविष्ट करण्यात आले गावांमध्ये एकीकृत जल व्यवस्थापन कार्यक्रम/ पाऊस जल क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत २७ गावांची निवड करण्यात आली आहे. यात ५० पैश्यापेक्षा कमी आणेवारी असलेल्या १७ गावांचा समावेश करण्यात आला. बफर झोनमधील १३ गावे, आमदार व खासदार यांनी सुचविलेले व जलसंधारणाच्या ११ गावांचा समावेश आहे.यात ४ गावांची एकीकृत जल व्यवस्थापन कार्यक्रम/पाऊस जल क्षेत्र विकास कार्यक्रम व ५० पैश्यापेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावांची निवड करण्यात आली. फक्त एका गावाची निवड एकीकृत जल व्यवस्थापन कार्यक्रम/पाऊस जल क्षेत्र विकास कार्यक्रम व बफर झोन अंतर्गत करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरावे यसाठी सुरू करण्यात आलेले जलयुक्त शिवर अभियान जलसमृध्दी आणत आहे.९४ गावे वॉटर न्युट्रलदुष्काळावर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियान योनेला जिल्ह्यात उदंड प्रतिसाद मिळाला. जलयुक्त शिवार अभियानामुळे गोंदिया जिल्ह्यातील ९४ गावे वॉटर न्यूट्रल झाले आहेत. ८४ गावे शंभर टक्के तर १० गावे ८० ते ९९ टक्याच्या घरात वॉटर न्यूट्रल झाले आहेत. आमगाव तालुक्यातील ४ गावे, सडक-अर्जुनी तालुक्यातील ५ गावे, देवरी तालुक्यातील ७ गावे, सालेकसा तालुक्यातील १३ गावे, तिरोडा तालुक्यातील २४ गावे, गोरेगाव तालुक्यातील १३ गावे, गोंदिया तालुक्यातील २४ गावे, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ४ गावांचा समावेश आहे. शेतशिवारात पडलेले पावसाचे पाणी अडवून त्याला जमीनीत मुरलेल्या पाण्याचा ताळेबंद करण्याची पध्दत जलयुक्त शिवार अभियानात ठरविण्यात आली. त्यानुसार गावाची सिंचन क्षमता व पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यामातून करण्यात आलेल्या कामामुळे पावसाच्या पाण्याचा जमाखर्च व ताळेबंद तयार करणे म्हणजेच वॉटर न्यूट्रल टक्केवारी आहे.बदलत्या चित्रामुळे ४४४ कामे रद्द जलयुक्त शिवार अभियानातून केलेल्या कामामुळे जिल्ह्यातील ९४ गावे वॉटर न्यूट्रल झालीत. या ९४ गावांपैकी ८४ गावांत या अभियानांतर्गत आता कामाची गरज नाही. त्यामुळे १०० टक्के वॉटर न्यूट्रल असलेल्या गावातील ४४४ गावातील कामांना जिल्हा कृषि विभागाला रद्द करावे लागले आहे. ४४४ (६६.७१ टक्के) काम रद्द करण्यात आले. यात कृषि विभागाचे ४५४ पैकी ३६०, पं.स. चे ११ मधून ११ व वन विभागाच्या१६६ पैकी ७३ कामांचा समावेश आहे.जलयुक्त शिवारावर ४७ कोटी खर्च राज्यातील दृष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानाने पहिल्या वर्षी १ हजार ७६८ कामांवर ४७ कोटी १५ लाख ८२ हजार रूपये खर्च करण्यात आले. यातील ६८२ कामे प्रगतीपथावर असून त्या कामांवर १३ कोटी ४० लाख ५१ हजार रूपये खर्च करण्यात आले.या गावांची केली निवडजिल्ह्यात तिरोडा तालुक्यातील अर्जुनी, खैरलांजी, इंदोरा बु., परसवाडा, सेजगाव, नवेझरी, कोयलारी, खैरी, मुरमाडी, सेलोटपार, गोरेगाव तालुक्यातून डव्वा, कवलेवाडा, तिमेझरी, पुरगाव, हीरापूर, शहारवाणी, मुंडीपार, गिधाडी, बाम्हणी, मोहगाव बु., अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भरनोली, सायगाव, जांभली, रामपूरी, झाशीनगर, कवठा, गंधारी, गोंदिया तालुक्यातील पांगडी, धामनेवाडा, कोहका, देवरी, निलागोंदी, गिरोला (दा.), लहिटोला, सोनपूरी, पोवारीटोला, निलज, आमगाव तालुक्यातून खुर्शीपार, खुर्शीपारटोला, ठाणा, सुरकुडा, बासीपार, कोसमटोला, सडक-अर्जुनी तालुक्यातून पाटेकुर्रा, कोहळीटोला, चिखली, मुरपार-मंगेझरी रिठी, रेंगेपार-दल्ली, कन्हारपायली, सालेकसा तालुक्यातून नवाटोला, जांभळी, महाराजीटोला, कलकालीटोला, रामाटोला, पिपरिया, निंबा व देवरी तालुक्यातील तुमडीकसा, मेहताखेडा, लेंडीजोब, पुराडा, आलेबेदर, शेरपार, मुरदोली या समावेश समावेश आहे.या गावात कामे सुरू झाल्यानंतर पाण्याची टंचाई दूर होण्यास मदत होईल.
जलयुक्त शिवारातून येतेय जलसमृद्धी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2017 00:31 IST