शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

वाघ प्रकल्पाचा कालीमाटी शाखेवर मोठा अन्याय

By admin | Updated: December 27, 2014 22:53 IST

येथील वाघ सिंचन व्यवस्थापन शाखेंतर्गत उन्हाळी हंगामाच्या नियोजनात भातपिकांसाठी पाणी मिळत नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाविरूध्द एल्गार पुकारले आहे. वाघ प्रकल्पांतर्गत

एच.के. फुंडे - कालीमाटीयेथील वाघ सिंचन व्यवस्थापन शाखेंतर्गत उन्हाळी हंगामाच्या नियोजनात भातपिकांसाठी पाणी मिळत नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाविरूध्द एल्गार पुकारले आहे. वाघ प्रकल्पांतर्गत कालीमाटी शाखेवर अन्याय करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.वाघ सिंचन व्यवस्थापन उपविभागांतर्गत कालवे सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली. त्यात सिंचनासाठी अल्पसाठा २३.३२ दलघमी आहे. आजमितीस २३.०० दलघमी पाणी असून गोंदिया उपविभाग ४८५ हेक्टर, आमगाव ४६१ हेक्टर क्षेत्रासाठी मंजूर करण्यात आले. मागील वर्षी १०८ दलघमी पाणी ६ हजार हेक्टर शेतीसाठी पाणी देण्यात आले. पण यावर्षी प्रकल्पामध्ये अल्प प्रमाणात जलसाठा असल्याने उन्हाळी हंगामासाठी शेतकऱ्यांना धान उत्पादनापासून वंचित रहावे लागणार आहे, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. कालीमाटी शाखेंतर्गत करंजी कालव्याला कार्तूली या गावासाठी ४३ हेक्टर पाणी मिळणार असून उर्वरित शेकडो गावातील शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे या क्षेत्रातील शेतकऱ्यांनी प्रशासनाविरुध्द एल्गार पुकारले आहे. कालीमाटी येथील वाघ सिंचन व्यवस्थापन शाखेंतर्गत मानेकसा, टेकरी, सुपलीपार, मोहगाव वितरिकेत कालीमाटी, मानेकसा, घाटटेमनी, गिरोला, मोहगाव, करंजी, नंगपुरा, बंजारीटोला, मुंडीपार, भोसा, बोदा, मोहरनटोला, ननसरी अशा शेकडो गावांना पाण्यापासून मुकावे लागणार आहे. उपविभाग गोंदियातर्फे फक्त कालीमाटी शाखेतील कार्तुली गावासाठी पाणी देण्यात येणार आहे. सदर नियोजन करताना या परिसरावर अन्याय झाल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गोंदिया उपविभागांतर्गत शाखा कामठा येथे नवरगावकला भाग १- १३० हेक्टर, नवरगाव कला भाग २- १६२ हेक्टर, ईर्री कालवा १- १५० हेक्टर अशा एकूण ४८५ हेक्टर शेतीसाठी पाणी मिळणार आहे. यामुळे कालीमाटी शाखेवर दुजाभाव केला असून येथील शेतकऱ्यांवर अन्याय केलाचा आरोप पाणी वाटप सोसायटीच्या सदस्यांनी केला आहे. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा शाखेत झालिया कालव्यासाठी २० हेक्टर, लटोरीसाठी २० हेक्टर, बाह्मणी २० हेक्टर, बिंजली २० हेक्टर आणि विद्युत पंपासाठी ७९ हेक्टर अशा एकूण १५९ हेक्टर शेतीसाठी पाणी मंजूर करण्यात आले आहे. शाखा पुजारीटोलाकरिता सातगाव कालवा क्र. १-१०, सातगाव क्र. २-२० हेक्टर, पानगाव १० हेक्टर, विद्युत पंप १७ हेक्टर तसेच शाखा आमगाव रिसामा लघु कालवा २० हेक्टर, गणेशपूर २५ हेक्टर, पदमपूर ३० हेक्टर, आमगाव ३० हेक्टर, विद्युत पंप १४० हेक्टर असे एकूण २४५ हेक्टर पाणी उन्हाळी भात पिकांसाठी मंजूर करण्यात आले. गोंदिया उपविभागातर्फे प्रत्येक शाखेतील बहुतेक कालव्यांना पाणी मिळणार आहे. पण कालीमाटी शाखेत कातुर्ली या गावातच पाणी देऊन इतर कालव्यांवर येणाऱ्या गावांना वंचित ठेवण्यात आले आहे. पाणी वाटपाच्या नियोजन समितीच्या बैठकीत या परिसरातील स्थानिक प्रतिनिधी नसल्याने सदर शाखेवरील अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचाही आरोप होत आहे. एकीकडे पावसाळ्यात पाण्याच्या लहरीपणामुळे कालीमाटी परिसरात दुष्काळाची स्थिती निर्माण झाली, येथील शेतकरी कर्जाच्या कचाट्यात सापडले. त्यामुळे उन्हाळी हंगामात पाणी मिळेल व कर्जाची परतफेड करून आर्थिक व मानसिक स्थिती सुधारता येईल, अशी त्यांची अपेक्षा होती. पण शेतकऱ्यांच्या या आशेवर पाणी फिरल्याने ते हताश झाल्याचे दिसून येते. पुन्हा नियोजन समितीची बैठक बोलवून कालीमाटी शाखेला अधिक कालव्यांना पाणी देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.