शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

उभ्या मालगाडीतून होते कोळशाची सर्रास चोरी

By admin | Updated: October 10, 2015 02:12 IST

मुंबई-हावडा या मुख्य रेल्वेमार्गावर असलेल्या गोंदिया जिल्ह्यात छोटे-मोठे १२ रेल्वे स्थानक आहेत.

चोरट्यांशी संगनमत? : रेल्वे सुरक्षा दलाकडून थातूरमातूर कारवाईदेवानंद शहारे गोंदियामुंबई-हावडा या मुख्य रेल्वेमार्गावर असलेल्या गोंदिया जिल्ह्यात छोटे-मोठे १२ रेल्वे स्थानक आहेत. या स्थानकांवर दररोज थांबणाऱ्या कोळशाच्या मालगाड्यांमधून कोळशाची खुलेआमपणे चोरी होत आहे. मात्र रेल्वे सुरक्षा दलाकडून त्या चोरट्यांवर कारवाई होत नसल्यामुळे त्यांच्याशी रेल्वे पोलिसांचे संगनमत असल्याची शंका घेतली जात आहे.मुख्य रेल्वे मार्गावरील बहुतांश रेल्वे स्थानकावर दररोज कोळशाच्या मालगाड्या थांबत असतात. गाडी थांबताच संधी पाहून काही चोरटे डब्यावर चढतात आणि पटापट त्यातील दगडी कोळसा खाली फेकतात. या चोरट्यांना कोणी प्रवाशांनी पाहिले किंवा त्यांच्याबद्दल कोणी रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली तर रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) कर्मचारी त्या चोरट्यांना पकडतात व थातूरमातूर कारवाई दाखवून नंतर सोडून देतात. या प्रकारामुळे मालगाड्यांमधून दगडी कोळशाची चोरी होण्याचे प्रकार वाढत आहे.शुक्रवारी (दि.९) सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास तिरोडा रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर दगडी कोळशाने भरलेली मालगाडी थांबलेली होती. त्या गाडीच्या डब्यावर दोन इसम चढून भराभर दगडी कोळसा खाली फेकत होते. या प्रकाराकडे तेथून ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे लक्ष गेले. मात्र रेल्वेचे कर्मचारी या घटनेपासून अनभिज्ञच होते. एका रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाला ही बाब समजली. तो घटनास्थळी पोहोचताच एका चोरट्याने पळ काढला. मात्र दुसऱ्याला पकडण्यात आरपीएफला यश आले. मात्र जणूकाही घडलेच नाही असे दाखवत नंतर त्याला सोडून देण्यात आले. प्रत्यक्षदर्शींनी आपल्या डोळ्यासमोर कोळशाची चोरी होताना पाहीले आहे. दोन व्यक्ती मालगाडीवर चढून भराभर दगडी कोळसा खाली फेकत होते. तरीही आरपीएफ चोरट्यांना पकडून कोणतीही कारवाई न करता सोडून देतात, ही बाब बरेच काही सांगून जाते. (प्रतिनिधी)१२ स्थानके, ५० पेक्षा जास्त गाड्यामुंबई-हावडा मार्गावर नागपूर-रायपूर या दरम्यान गोंदिया हे मुख्य रेल्वे स्थानक आहे. यासोबतच गोंदिया जिल्ह्याच्या हद्दीत याच मार्गावर मुंडीकोटा, तिरोडा, काचेवानी, गंगाझरी, गोंदिया, गुदमा, आमगाव, धानोली, सालेकसा, दरेकसा, बोरतलाव व दरेकसा असे १२ स्थानकं आहेत. त्या स्थानकापैकी कोणत्याही स्थानकावर मालगाड्या थांबू शकतात. दररोज कोळशाचा किमान ५० गाड्या तरी या स्थानकांवरून जातात. कोळसाचोर आता कोणकोणत्या स्थानकांवर सक्रिय आहेत याचा शोध घेतल्यास शासनाची बरीच मालमत्ता चोरी जाण्यापासून वाचू शकते.सुरक्षा कर्मचारी म्हणतात, ही मोठी बाब नाही!या प्रकाराबाबत गोंदिया रेल्वे सुरक्षा दलाचे इन्चार्ज बी.एन. सिंग यांना विचारणा केल्यावर त्यांनी सांगितले की, कोळशाने भरलेली मालगाडी सदर स्थानकावर थांबलेली असताना एक व्यक्ती एका पोत्यामध्ये गाडीखाली पडलेली कोळशाची चुरी उचलून जमा करीत होता. ही फारशी मोठी बाब नाही, मात्र तरी त्याला रेल्वे अ‍ॅक्टनुसार ताब्यात घेण्यात आले आहे, परंतु गुन्हा नोंदविण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले. वास्तविक मालगाडीतून कोळसा बाहेर काढल्याशिवाय खाली पडत नाही. मात्र पोलीस ज्या पद्धतीने आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न करतात त्यावरून त्यांचे आणि कोळसा चोरांचे लागेबांधे असल्याचे स्पष्ट होत आहे.