शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

इमारती बोलक्या, शिक्षणाचा अभाव

By admin | Updated: July 22, 2015 02:00 IST

सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील भौतिक सुविधांची पूर्तता झाली असली तरी ...

पदाधिकारी-अधिकारी निर्धास्त : गोरगरिबांच्या शिक्षणाचा वाली कोण ?वाताहत शिक्षणाचीसंतोष बुकावन अर्जुनी मोरगावसर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील भौतिक सुविधांची पूर्तता झाली असली तरी जि.प. प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या गचाळ नियोजनामुळे शाळांची वाताहात होत आहे. राजकारणाच्या माध्यमातून जि.प.च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून धनदांडगे शिक्षणसम्राट हे जि.प.च्या शाळा बंद पाडण्याचा कुटील डाव रचत असल्याशी शंका या परिस्थितीमुळे घेतली जात आहे. येथे जिल्हा परिषदेचे कनिष्ठ महाविद्यालय आहे. शैक्षणिक स्पर्धेच्या काळातही गोरगरीबांचे हे शैक्षणिक दालन डौलाने उभे आहे. गुणवत्तेच्या बाबतीत येथे अगदी निष्णात शिक्षकवृंद आहे. मात्र जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचा शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. या शाळेमध्ये हजारावर गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेतात. कला व विज्ञान शाखेचे कनिष्ठ महाविद्यालय नावाला आहे. मात्र येथे कला शाखेत राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल व अर्थशास्त्र या विषयाचे कनिष्ठ व्याख्याते नाहीत. विज्ञान शाखेत रसायनशास्त्रासाठी कनिष्ठ व्याख्याता नाही. कला व विज्ञान शाखेत जर व्याख्याने नसतील तर विद्यार्थ्यांना काय शिक्षण मिळत असेल, याचा विचारच केलेला बरा.शिक्षक हे दारोदारी भटकंती करून कसेबसे विद्यार्थी मिळवत शाळा चालविण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. पालकही आज ना उद्या सर्व विषयांचे शिक्षक मिळतील अशी आशा बाळगतात. पण शेवटी आमच्या पाल्यांशी विश्वासघात केल्याचा ठपका या शिक्षकवृंदांवर लागतो. ज्यांच्या हातात जिल्हा परिषदेची सत्ता आहे ते लोकप्रतिनिधी व प्रशासन सांभाळणारे वरिष्ठ अधिकारी मात्र नामनिराळेच असतात. दुसरीकडे खासगी शाळांतील एक जरी शिक्षक दीर्घ रजेवर गेल्या तरी खासगी संस्था चालक त्याची शिक्षणाधिकाऱ्यांची लेखी परवानगी घेऊन ती जागा तात्पुरती भरतात. यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण वाया जात नाही. मात्र जिल्हा परिषदेचे बिचारे विद्यार्थी अनुभवी शिक्षकांपासून वंचित होतात. अशा या गचाळ व्यवस्थेला जबाबदार कोण? असा प्रश्न पडतो. शाळेतील एका इमारतीचा स्लॅब पूर्णत: बसला. भेगा पडल्या आहेत. एखाद्या वेळी या इमारतीत दुर्घटना होऊ शकते. अनेकदा तक्रारी झाल्या, पण दुर्लक्ष केले जात आहे.लोकप्रतिनिधी फिरवितात पाठवर्षानुवर्षापासून शिक्षक भरती प्रक्रिया रखडली आहे. कुठल्यातरी निमित्ताने लोकप्रतिनिधींनी यावे म्हणून कार्यक्रमात त्यांना आमंत्रण दिले जाते. समस्या त्यांचेजवळ विषद कराव्यात हा यामागील हेतू असतो. मात्र ते सुध्दा या आमंत्रणाला पाठ दाखवितात. विधानसभेत नेतृत्व करणारे जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले हे याच मतदारसंघातून निवडून आले. त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळा अस्ताकडे वाटचाल करीत असल्याचे चित्र शासनाकडे मांडावे, अशी येथील जनतेची रास्त अपेक्षा आहे.ती विहीर ठरू शकते ‘मौत का कुआ’जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयाच्या परिसरात एक पुरातन विहीर आहे. या विहिरीला लागून असलेले सिमेंट कॉक्रीटचे थर खचले आहे. या थराच्या खाली भलेमोठे भगदाड पडले आहे. शाळेत दोन पाण्याच्या टाक्या आहेत पण शाळेच्या पटसंख्येमुळे पाणी अपुरे पडते. विद्यार्थी विहिरीकडे धाव घेतात. एखादे वेळी दुर्घटनेची शक्यता टाळता येत नाही. नगर पंचायत प्रशासनाला याची सूचना देण्यात आली, मात्र प्रशासकांचे अशा गंभीर समस्येकडे संपूर्णत: दुर्लक्ष आहे. शालेय प्रशासनाने तात्पुरते कुंपन घालून विद्यार्थ्यांना प्रवेश बंद केला आहे. परंतु विद्यार्थी दशेतील उनाडपणामुळे एखादे वेळी तो ‘मौत का कुआ’ ठरू शकतो. वर्षानुवर्षापासून या विहिरीतील गाळ उपसा केलेला नाही. उन्हाळ्यात विहीरीत पाणी नसते.शौचालयांची दुरवस्था ४बांधकाम हे भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे. येथे एक शौचालय तयार झाले, मात्र त्याचा एकही दिवस विद्यार्थ्यांनी वापर केला नाही. या शौचालयातील दारे तुटलेली आहेत. बैठक व्यवस्था पूर्णत: नेस्तनाबूत झाली आहे. या कनिष्ठ महाविद्यालयात मोकळे रान असल्याने उनाड मुले तोडफोड करतात. आवारभिंतीची प्रदीर्घ काळापासून मागणी आहे. मात्र या मागणीकडे जिल्हा परिषद प्रशासन सातत्याने कानाडोळा करीत आहे.