शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

जिल्ह्याला वादळाचा तडाखा

By admin | Updated: May 12, 2017 00:20 IST

जिल्ह्यात गुरूवारी दुपारी झालेल्या वादळी पावसाचा जबर तडाखा बसला. या वादळात अनेक घरांवरील टिनपत्रे उडून गेली ....

अनेक घरांवरील टिनपत्रे उडाली : दारव्हा तालुक्यात सर्वाधिक नुकसान लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्ह्यात गुरूवारी दुपारी झालेल्या वादळी पावसाचा जबर तडाखा बसला. या वादळात अनेक घरांवरील टिनपत्रे उडून गेली असून, मोठमोठाली वृक्ष उन्मळून पडली. दारव्हा तालुक्याला सर्वाधिक फटका बसला असून, यवतमाळ तालुक्यात किटा कापरा येथे वीज कोसळून तरूण ठार झाला. या वादळाने अनेक गावांचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. यवतमाळ शहरासह काही भागात गुरूवारी दुपारच्या सुमारास अचानक वादळी वातावरण निर्माण झाले. दारव्हा, झरी, कळंब, वणी, मारेगाव या तालुक्याला वादळाचा तडाखा बसला. दारव्हा तालुक्यातील वडगाव गाढवे, तिवसा, कामठवाडा, चाणी, चिकणी, आमशेत, दिघोरी यासह अनेक गावात दुपारी वादळाने थैमान घातले. अनेक घरांवरील टिनपत्रे उडून गेलीत. वडगाव येथील शाळेचे छत पत्त्यासारखे उडून गेले. तर चिकणी येथील ग्रामपंचायत कार्यालयावरील टिनपत्रे उडाली. तिवसा ते बाणायतपर्यंत रस्त्यावर ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. वादळामुळे अनेक वीज खांब वाकले असून, वीज पुरवठाही खंडीत झाला आहे. या वादळामुळे पाडाला आलेला आंबा गळून पडला. वादळानंतर प्रत्येक जण नुकसानीचा अंदाज घेताना दिसत होते. यवतमाळ तालुक्यातील किटा कापरा येथे दुपारी ४ वाजता वीज कोसळून योगेश कुंडलिक मुरझडे (२२) हा ठार झाला. तर कवडू तुकाराम रिंगणे (३३) हा गंभीर जखमी झाला. तर कळंब येथील उमेश जुनघरे यांच्या शेतातील गोठ्यावर वीज कोसळल्याने बैल ठार झाला. वादळी पावसाने नेमके किती नुकसान झाले हे मात्र कळू शकले नाही. लग्न मंडप उडाला यवतमाळ तालुक्यातील तिवसा येथे गुरुवारी विष्णू भावसिंग राठोड यांचा विवाह सोहळा होता. त्यासाठी घरासमोरील मैदानात विवाह मंडप टाकण्यात आला होता. लग्न आटोपल्यानंतर जेवणाच्या पंगती सुरू होत्या. त्याचवेळी अचानक आलेल्या वादळाने संपूर्ण मंडप उडून गेला. यामुळे वऱ्हाड्यांची त्रेधा उडाली. पंगत अर्ध्यावर सोडून वऱ्हाड्यांना सुरक्षित स्थळी धाव घ्यावी लागली. यात राठोड यांचे मोठे नुकसान झाले.