शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
3
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
4
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
5
‘’महाराष्ट्रातील सर्वजन मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
6
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
7
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
8
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
9
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
10
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
11
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
12
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
13
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
14
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
15
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
17
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
18
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
19
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
20
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य

कक्ष तयार, मात्र करवसुली अधिकारीच नाही

By admin | Updated: March 2, 2015 01:33 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेचे कर वसुली अधिकारी म्हणून नायब तहसीलदार पाटील यांची नियुक्ती केली.

गोंदिया : जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेचे कर वसुली अधिकारी म्हणून नायब तहसीलदार पाटील यांची नियुक्ती केली. कर वसुली अधिकारी रुजू होणार यामुळे नगरपरिषद कार्यालयात असलेले पक्षनेत्यांचे कक्ष त्यांच्यासाठी सज्ज करण्यात आले. मात्र महिनाभर लोटून गेला असूनही पाटील रूजू न झाल्याने कक्ष असून त्यासाठी अधिकारीच नसल्याचे चित्र दिसून येत आहे. नगरपरिषदेने कर वसुली अधिकारी मिळावा यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याकडे मागणी केली होती. कर वसुली अधिकारी मिळाल्यास नगरपरिषदेच्या डोक्यावर असलेले ११ कोटींच्या कर वसुलीचे डोंगर कमी होणार अशी नगरपरिषद प्रशासनाची अपेक्षा होती. एवढेच नव्हे तर पाटील रूजू झाल्यावर मुख्याधिकारी सुमंत मोरे यांनी ते स्वत: एक पथक घेऊन तसेच दुसरे पथक तयार करून पाटील यांच्या मार्गदर्शनात वसुली मोहीम राबविण्याचे ठरविले होते. त्यानुसार त्यांनी आमसभेत ठराव घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली. करवसुलीचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी नायब तहसीलदार निलेश पाटील यांची करवसुली अधिकारी म्हणून नियुक्ती केली. ३१ जानेवारी रोजी तसे आदेश नगरपरिषदेला मिळाले. आता करवसुली अधिकारी पाटील येणार, त्यामुळे त्यांना बसण्यासाठी जागा लागेलच. अशात नगरपरिषद कार्यालयातील पूर्वी पक्षनेत्यांसाठी असलेले कक्ष करवसुली अधिकाऱ्यांसाठी आरक्षीत करून सज्ज करण्यात आले. मात्र फेब्रुवारी महिना लोटून गेला तरिही पाटील रूजू झालेच नाहीत. अशात त्यांच्यासाठी आरक्षीत करून ठेवलेले कक्ष तसेच बंद पडून आहे. एकीकडे ज्यांना वेगळे कक्ष नाही ते वेगळे कक्ष लाभावे यासाठी धडपडत असतात. येथे मात्र उलटाच कारभार दिसून येत आहे. पाटील साहेबांसाठी कक्ष तयार असूनही ते रूजू होत नसल्याने त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेले कक्ष बंद पडून आहे. तर पालिकेतील कर्मचारी पाटील कधी रूजू होणार याची वाट बघत आहेत. मात्र त्यांच्यासाठी राखून ठेवण्यात आलेल्या कक्षावर करवसुली अधिकाऱ्यांचे कक्ष अशी पट्टी चिकटविण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)एकच पथक करीत आहे वसुली३१ जानेवारी रोजी पाटील यांची करवसुली अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश नगरपरिषदेला मिळाले. त्यानुसार पाटील २ फेब्रुवारी रोजी पदभार घेणार व त्यानंतर दोन कर वसुली पथक तयार करून वसुली केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी मोरे यांनी लोकमतला सांगीतले होते. मात्र पाटी अद्याप रूजू झालेले नाही. परिणामी एकच वसुली पथक शहरात कर वसुलीची मोहीम राबवित आहेत. दोन पथकांद्वारे मोहीम राबविल्यास कमी कालावधीत जास्तीत जास्त थकबाकीदारांपर्यंत पोहचता आले असता असे मुख्याधिकाऱ्यांचे नियोजन होते. मात्र पाटील न आल्याने त्यांचे हे नियोजन फिस्टकले. परिणामी एकच पथक कार्यरत आहे.