शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गाण्याच्या तालावर रोवणी सुरू

By admin | Updated: August 7, 2016 00:54 IST

दमदार पावसाला सुरूवात झाली. कासावीस झालेल्या, बळीराजाने आपल्या उपजीवीकेसाठी शेतीच्या कामाला सुरूवात केली.

मजुरीसह मनोरंजनही : रोवणी संपताच होतो ढोलताशांचा गजर बाराभाटी : दमदार पावसाला सुरूवात झाली. कासावीस झालेल्या, बळीराजाने आपल्या उपजीवीकेसाठी शेतीच्या कामाला सुरूवात केली. शेतीला नांगरून पऱ्हे आले, नंतर पऱ्हे शेतीत रोवण्यास सुरूवात केली. ग्रामीण भागातील महिला आपल्या सुंदर सुरेल गोड आवाजात गाणी म्हणत शेतात रोवी करीत आहेत. उट उट पाकुरा, जा माझ्या माहेरा... केवळ मोठा गुणवान कोढाबाई राबवित मन... ‘केवळ बोले... ही... केवळ बोले’ बहिणाबाईच्या ओळी महिला हिरहिरीने गातात. उन्हाळा संपताच प्रतिक्षा फक्त पावसाचीच असते. जून-जुलैमध्ये पाऊस आला की आनंदाने काळ्या-काळ्या कसदार शेतामध्ये सुपीकाचे रंग चढवितांना शेतकरी नांगरतो, वखरतो, रोप लावतो. धान्य फोकतो, चिखलाच्या बांधीमध्ये धान रोवतो. महिला मंडळी सुंदर सुरतालामध्ये पावसाची गाणी गात रोवणी करताना दिसतात. शेतमजूरही आपल्या शेतीची कामे जोमाने आनंदाने करतात. पऱ्हे काढण्यासाठी परिसरात हुंडे पध्दती, मजूरी पध्दतीने रोवणी करतात. हुंडे पध्दतीमध्ये मजूरांची १७५, २०० रूपये अशी रोजी दिली जाते. मजूरी १००, १२०, १३० अशा प्रकारची मजूरी दिली जाते. मनोरंजनाचा एका पाठच तयार करून संपूर्ण रोवणी करतांना अनेक कविची, गीतकारांची गीत-गाणी गायली जाण्याची ग्रामीण भागातील परंपराच आहे. ग्रामीण भागातील शेतकरी स्वत:कडे लक्ष घालत शेतमालक रोवणी लवकर करण्याचा तगादा लावत आहेत. रोवणी करणाऱ्या मजूर महिला विश्रांती घेणे, पुन्हा नविन पात पकडून रोवणीला सुरूवात करणे हे एक वेळापत्रकच ठरला जातो. अनुप्रास यांचा वापर करून रचलेली सुखद, सुरेल गाणी विठ्ठल वाघ, कुसुमाग्रज, केशवसूत, केशवकुमार, बालकवी, बहिणाबाई चौधरी अशा नामवंत कवींची गाणी गाईली जात आहेत. परिसरात १० दिवसात पावसाच्या आगमनाने ग्रामीण परिसर धान्य रोवणी कामास सुरूवात झाल्यावर बळीराजा सुखावल्याचे चित्र दिसत आहे. पावसाने वेळोवेळी साथ दिली तर क्षणाक्षणाला शेतकरी हसतमुख होतो. रोवणी संपण्याची एक मजा म्हणून चिखल पूजा करणे, चिखल लावणे, शेतामधून ढोल-ताशा, डपळी वाद्याने रोवणीची रॅली मालकाच्या घराकडे आणतात. परंपरेने खांद्यावर नांगर, हातात जुपना, तुतारी फन ही साधने समादित मजूर गाणे गात घराकडे निघतात. रोवणी वेळची रुढी, परंपरा, चालरितीनुसार ही विदर्भ आणि ग्रामीण भाग हा रोवणीच्या वेळी गाण्याच्या तालावर संपूर्ण बहरला दिसतो आहे. महिना-दिड महिना चालणाऱ्या या रोवणीच्या कामांना हसत-खेळत ओटोपण्यासाठी मजूर वर्ग गाण्यांचा आधार घेतात. (वार्ताहर)