शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

तीन शाळा बंद करण्याचा प्रस्ताव

By admin | Updated: July 24, 2015 01:14 IST

मागील काही वर्षांपासून नगर परिषदेच्या शाळांच्या होणाऱ्या सततच्या उपेक्षेमुळे बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

नजर आमसभेकडे : सिव्हिल लाईन्स शाळेत केवळ चार व टाऊन शाळेत पाच विद्यार्थीगोंदिया : मागील काही वर्षांपासून नगर परिषदेच्या शाळांच्या होणाऱ्या सततच्या उपेक्षेमुळे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. या शाळांची स्थिती सातत्याने कमकुवत होत चालली आहे. मागील काही वर्षांत अनेक शाळांना बंद करावे लागले. आता आणखी काही शाळा बंद होण्याच्या मार्गावर पोहोचल्या आहेत. कमीत कमी तीन शाळा आता तत्काल प्रभावाने बंद कराव्या लागतील. या शाळांना पुढे चालविण्यात काहीही अर्थ नाही. परंतु नगर परिषदेचे पदाधिकारी-अधिकारी राजकीय ईच्छाशक्तीच्या अभावाने पाऊल उचलण्यास हिंमत करीत नाहीत.नगर परिषदेद्वारे संचालित ज्या तीन शाळांना बंद करणे गरजेचे आहे, त्यापैकी सिव्हील लाईन्स शाळेत केवळ चार विद्यार्थी आहेत. माताटोली येथील शाळेत १० व टाऊन स्कूलमध्ये केवळ पाच विद्यार्थी आहेत. ही संख्या १ जुलैची असून पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आहे. चार वर्गात जर चारच विद्यार्थी आहेत, तर त्या शाळेला चालविण्याचा काहीही औचित्य नसते. मागील वर्षी सिव्हील लाईन्सच्या शाळेत केवळ सात विद्यार्थी होते. ही संख्या आता पुन्हा कमी झाली आहे. सध्या विद्यार्थी संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे, परंतु ही संख्या किती वाढेल? असा प्रश्न आहे. गोंदिया नगर परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने मागील वर्षी सदर तिन्ही शाळांना बंद करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. परंतु आमसभेत सदर प्रस्ताव नामंजूर करण्यात आला होता. आता पुन्हा नवीन प्रस्ता बनविण्यात आला आहे. आमसभेची वाट बघितली जात आहे. आता नगर परिषदेला नवीन मुख्याधिकारी मिळाला आहे. शक्यतो पुढील काळात आमसभेचे आयोजन होवू शकेल. मागील सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला, परंतु नगर परिषदेची आमसभा झाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना काहीही माहिती नाही. जर या शाळांना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला तर त्या विद्यार्थ्यांना त्रास होईल, यात शंका नाही. (प्रतिनिधी)आणखी काही शाळा प्रतीक्षेतनगर परिषदेद्वारे संचालित प्राथमिक शाळांमध्ये व अनेक शाळांची स्थिती गंभीर आहे. मराठी माध्यमाच्या रामनगर शाळेत २४, डॉ. आंबेडकर शाळेत १९, संत गाडगेबाबा शाळेत २२, रेलटोली येथील शाळेत २९ व सावित्रीबाई फुले शाळेत १८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हिंदी माध्यमाच्या मालवीय शाळेत केवळ २० विद्यार्थी आहेत. इंग्रजी माध्यमाचे शिक्षण केव्हा?मागील वर्षी आमसभेत उपस्थित नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी म्हटले होते की, सदर शाळांना बंद करण्याऐवजी इंग्रजी माध्यमातून शिक्षण द्यायला हवे. तत्कालीन मुख्याधिकारी सुमंत मोरे यांच्याशी चौकशी केल्यावर त्यांनी सांगितले की, नवीन शिक्षकांची भरती केली जाईल. शाळा परिसर व वातावरणात बदल केले जाईल. खासगी शाळांशी स्पर्धा करण्याचे प्रयत्न केले जातील. परंतु या दिशेने अद्याप कसलेही पाऊल उचलण्यात आले नाही. सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे शिक्षण विभागाचे उपसंचालकांकडून अनुदान व मंजुरी मिळवावी लागते. त्यासाठी पत्रव्यवहारही करण्यात आले नाही. नगर परिषदेद्वारे अनेक वर्षांपासून केवळ एकच कॉन्व्हेंट शाळा चालविली जात आहे. त्याचा संपूर्ण खर्च नगर परिषद उचलते. जर इंग्रजी माध्यमाचे शिक्षण सुरू झाले तर नगर परिषदेवर भार वाढेल. अशात त्या शाळांना केवळ बंद करण्याचा निर्णयच घेतला जावू शकतो. सेमी-इंग्रजीची तयारी नाहीमागील काही काळापूर्वी नगर परिषदेच्या शाळांमध्ये सेमी-इंग्रजीची तयारी करण्यास सांगण्यात आले होते. याबाबत प्रस्तावही आमंत्रित करण्यात आले होते. केवळ काही शाळांनीच प्रस्ताव दिले होते. अधिकतर शाळांनी पहिल्या वर्गापासून सेमी-इंग्रजी सुरू करण्यात आवड दाखविली नाही. विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल बनविणे व त्यांना उत्तम शिक्षण देऊन आपली नोकरी वाचविण्यासाठीसुद्धा कोणतेही पाऊल उचलण्यास नगर परिषदेचे शिक्षक तयार नाहीत. अशा स्थितीत नगर परिषदेची शिक्षण व्यवस्थाच नष्ट झाली तर नवल वाटू नये.