शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
3
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
4
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
5
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
6
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
7
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
8
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
9
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
10
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
11
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले
12
Operation Sindoor : भारताची नारी शक्ती! सोशल मीडियावर सोफिया कुरेशी, व्योमिका सिंह यांचा दबादबा, होतंय कौतुक
13
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
14
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
15
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
16
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
18
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक
19
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
20
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान

फी वाढीविरोधात पालक आक्रमक

By admin | Updated: April 4, 2015 01:08 IST

शालेय शुल्कात सुमारे पाच हजार रूपयांची फी वाढ करण्यात आल्याने खवळलेल्या पालकांनी येथील साकेत पब्लिक

पाल्यांचे नाव काढणार : साकेत स्कूलवर धडकले संतप्त पालक$

गोंदिया : शालेय शुल्कात सुमारे पाच हजार रूपयांची फी वाढ करण्यात आल्याने खवळलेल्या पालकांनी येथील साकेत पब्लिक स्कूलमध्ये धडकून फी वाढीचा विरोध दर्शविला. यावेळी झालेल्या चर्चेतही शाळा संचालकांनी आपला निर्णय मागे न घेतल्याने ५० हून अधिक पालकांनी १०० हून अधिक विद्यार्थ्यांची टिसी काढण्यासाठी अर्ज दिला. विशेष म्हणजे पालकांची रविवारी आणखी एक बैठक होणार असून त्यात इतरही पालकांना सहभागी केले जाणार आहेत.साकेत पब्लिक स्कूल व्यवस्थापनासह गोंदियातील इतरही शाळांकडून दरवर्षी अशाच प्रकारे शुल्क वाढ केली जाते. मात्र यावर्षीच्या फी वाढीने साकेत स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यामुळे शुक्रवारी (दि.३) पालक आक्रमक होऊन एकित्रतपणे शाळेवर गेले. एकत्र आलेल्या पालकांनी फी वाढीचा विरोध करीत शाळा संचालक चेतन बजाज यांच्यासोबत चर्चा करून त्यांना फी वाढ मागे घेण्याची मागणी केली. मात्र बजाज यांनी पालकांच्या मागणीला धुडकावून लावत फी वाढ मागे घेणार नसल्याचे सांगितले. एवढेच नाही तर पुढच्या वर्षीही फी वाढ केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. यामुळे पालकांत चांगलाच शाळा व्यवस्थापनाविरोधात चांगलाच रोष पसरला आहे.या चर्चेत डॉ. हरेश बजाज, अनिल पशिने, राजकुमार दुसेजा, सुनिल दुनेजा, सुरेश संतानी, प्रवीण शर्मा, देवीदास नोतानी, भगतराम पुगवानी, सुनील गोलानी, चंद्रकुमार मोटवानी, अरविंद राजवानी, संजय गौतम, विवेक पराते, डॉ.शशिकांत भादुपोते, नारायण बावनकर, कीर्ती गलोले, मंजुषा अनंतवार, मधू खटवानी, सरिता चावला, नितू मुलचंदानी, सिमरन ममतानी यांच्यासह मोठ्या संख्येत पालक उपस्थित होते.पालकांनी दिले टिसी काढण्याचे अर्ज फी वाढीच्या विषयावरून झालेल्या चर्चेत पालकांनी शाळेत दरवर्षी होत असलेली फी वाढ अन्यायपूर्ण व अवैध असल्याचे सांगत आपला विरोध व्यक्त केला. पालकांनी अन्य शाळांमध्ये दोन वर्षांत १० टक्के फी वाढविली जात असल्याचे सांगितले. यावर बजाज यांनी फी वाढ मागे घेतली जाणार नसल्याचे तसेच पुढच्या वर्षीही फी वाढ होणार असल्याचे स्पष्ट केले. बजाज यांच्या या भूमिकेने संतापलेल्या १०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या ५१ पालकांनी टिसी काढण्याचे अर्ज शाळेला दिले आहेत.महागडे साहित्य, त्यात फी वाढशाळेकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात फी वाढविली जाते. यंदा सुमारे पाच हजार रूपये फी वाढ करण्यात आली. शाळेतूनच सर्व साहित्य घेणे बंधनकारक असून ते महागडे असतात. अशात दरवर्षीची फी वाढ परवडणारी नाही. - अनिल पशिने, पालक. कधी डी.जी.क्लास, स्विमींग पूल व नवनवीन उपक्रमांच्या नावावर पैसे घेतले जातात. दोन-चार दिवस त्यांचे हे उपक्र म चालतात. मात्र त्याचा भुर्दंड पालकांना बसतो. - अनिल कुंदानी, पालक. आम्ही नर्सरी ते सातवीपर्यंत २० टक्के व आठवी ते दहावीपर्यंत २२-२३ टक्के फी वाढ केली आहे. आमच्या शाळेला शासकीय मदत मिळत नाही. अशात दिवसेंदिवस वाढत चाललेला खर्च आम्हालाच सहन करावा लागतो. त्यामुळे फी वाढ करणे गरजेचे आहे. - चेतन बजाज, संचालक, साकेत पब्लिक स्कूल, गोंदिया.