Maharashtra Election 2019 : कुटुंबाप्रमाणेच मतदानाची जवाबदारी पार पाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 05:00 AM2019-10-15T05:00:00+5:302019-10-15T05:00:02+5:30

शहरातील कुंभारेनगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भवन येथे शुक्रवारी (दि.११) महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने आयोजित महिला जागृती मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.या वेळी शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, कार्यकारी अभियंता विश्वकर्मा, माविमचे सहायक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड उपस्थित होते.

Maharashtra Election 2019 : As a family, do the voting responsibilities | Maharashtra Election 2019 : कुटुंबाप्रमाणेच मतदानाची जवाबदारी पार पाडा

Maharashtra Election 2019 : कुटुंबाप्रमाणेच मतदानाची जवाबदारी पार पाडा

Next
ठळक मुद्देशौकत अहमद परे : कुंभारेनगर येथे महिला मतदार जागृती मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : देशात ५० टक्के महिला आहेत. महिला आणि पुरु षांच्या समस्या वेगळया आहेत. कुटूंबाच्या अर्थाजनाची जवाबदारी महिला यशस्वीपणे पार पाडतात. येत्या २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत जिल्ह्यात मतदानाचे प्रमाण कसे वाढेल यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन गोंदिया विधानसभा क्षेत्राचे सामान्य निवडणूक निरीक्षक शौकत अहमद परे यांनी केले.
शहरातील कुंभारेनगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भवन येथे शुक्रवारी (दि.११) महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने आयोजित महिला जागृती मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.या वेळी शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, कार्यकारी अभियंता विश्वकर्मा, माविमचे सहायक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड उपस्थित होते. परे म्हणाले, जिल्हयात सहा हजार बचतगटांच्या माध्यमातून ७० हजार महिलांचे संघटन आहे. या संघटनांमुळे महिलांची एक शक्ती दिसून येत आहे. त्यामुळे या शक्तीचा वापर जिल्ह्यात मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी होईल. गोंदिया विधानसभा क्षेत्राच्या निवडणुकीत आज एकही महिला उमेदवार निवडणूक लढवित असल्याचे दिसत नाही. महिलांनी आपली शक्ती दाखविली पाहिजे. महिलांनी स्वत: मतदान करु न अन्य मतदारांना जास्तीत जास्त मतदानासाठी प्रोत्साहीत करण्यास सांगितले. हिवारे यांनी, माविमच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठया प्रमाणात मतदानासाठी जनजागृती करण्यात येत आहे. विविध उपक्र मांच्या माध्यमातून मतदान वाढीसाठी प्रयत्न करण्यात येत आहे. खडसे म्हणाले २५ ऑक्टोबरपासून आपण दिवाळीचा सण साजरा करणार आहोत. तत्पूर्वी २१ ऑक्टोबर रोजी आपल्याला लोकशाहीचा उत्सव साजरा करावयाचा आहे. या उत्सवात प्रत्येक मतदाराने स्वयंप्रेरणेने सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजवावा. जगातील सर्वात मोठी लोकशाही भारतीय संविधानामुळे आपल्याला मिळालेली आहे. आपल्याला आपला उमेदवार निवडण्याचा हक्क संविधानाने दिला आहे.
तरी सर्व मतदारांनी मतदान करावे असे सांगीतले. सोसे यांनी, महिला आता संघटीत झाल्या आहेत.बचतगटाच्या माध्यमातून शहरी भागातील मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी काम करण्यात येत सांगीतले. संचालन करून आभार मोनिता चौधरी यांनी मानले. कार्यक्र माला शहरी भागातील महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमासाठी कुंजलता भुरकुंडे, पुनम साखरे, राम सोनवाने, प्रफुल अवघड,एकांत वरघने, गीता भोयर, पल्लवी बनकर, शालू मेश्राम यांनी सहकार्य केले.

आग्रह दिन म्हणून
साजरा करणार

विद्यार्थ्यांंनी येत्या २१ ऑक्टोबर रोजी पालकांकडे मतदानाचा आग्रह धरावा व आपल्या पालकांना मतदानासाठी प्रवृत्त करावे. यासाठी हा दिवस‘आग्रह दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे पालक व त्यांच्या कुटूंबातील मतदार व्यक्ती मतदानासाठी प्रोत्साहीत होवून निश्चितपणे मतदान करतील असे मत व्यक्त केले.
 

रांगोळी व पोस्टर्सचे प्रदर्शन
या वेळी महिलांनी काढलेल्या मतदार जागृती करणाºया पर्यावरणपुरक रांगोळी व पोस्टर्सची मान्यवरांनी पाहणी केली. महिलांनी त्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या रांगोळी व पोस्टर्सचे मान्यवरांनी कौतुक केले. ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनवर उपस्थित महिलांनी मतदानाची प्रात्यक्षिके केली. या वेळी उपस्थित महिलांनी मतदान करण्यासाठी संकल्प शपथपत्राचे वाचन केले. अनेक महिलांनी सेल्फी स्टॅँडजवळ आपली सेल्फी काढली व या माध्यमातून मतदान जागृती केली.

Web Title: Maharashtra Election 2019 : As a family, do the voting responsibilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.