लोकमत विशेषगोंदिया : जिल्ह्यात २७ आयुर्वेदिक दवाखाने व तीन आंग्ल रूग्णालये मंजूर आहेत. सुसज्ज इमारतींसह त्या ठिकाणी सर्व सुविधा देण्यात आल्या होत्या. मात्र त्या रुग्णालयांसाठी गेल्या तीन वर्षांपासून निधीच उपलब्ध होत नसल्यामुळे तीन आंग्ल व सात आयुर्वेदिक अशी ९ रूग्णालये मागील अडीच ते तीन वर्षात बंद पडली आहेत. गोंदिया जिल्ह्यातील सात आयुर्वेदिक दवाखाने व तीन आंग्ल दवाखाने बंद झाले आहेत. हे दवाखाने १३ वने या शिर्षांतर्गत सुरू होते. त्यांना वर्षाकाठी एक कोटी रूपयांची गरज होती. परंतु या शिर्षातंर्गत शासनाने निधी देणे बंद केल्यामुळे मागील अडीच ते तीन वर्षात हे दवाखाने बंद पडले आहेत. गोंदिया जिल्ह्यात २७ आयुर्वेदिक दवाखाने सुरू आहेत. त्यात गोंदिया तालुक्यातील बनाथर, बटाणा, अदासी, चुटीया, धापेवाडा व मुर्दाळा असे सहा आयुर्वेदीक दवाखाने सुरू आहेत. गोरेगाव तालुक्यात घुमर्रा व तेढा येथे, आमगाव तालुक्यात शिवणी, ननसरी, गिरोला व कट्टीपार येथे, सालेकसा तालुक्यात पिपरीया, सोनपुरी, गांधीटोला येथे, देवरी तालुक्यात इडूकचुहा, डोंरगाव, पालांदूर, पुराडा येथे, सडक-अर्जुनी तालुक्यात मंदीटोला, कोसमतोंडी, बोपाबोडी, घाटबोरी, तसेच अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ईळदा, बाराभाटी, बोंडगावदेवी, इटखेडा तर तिरोडा तालुक्यात अर्जुनी, गांगला, मुरमाडी व सरांडी येथे आयुर्वेदीक दवाखाने सुरू आहेत. आंग्ल दवाखाना आमगाव तालुक्यात चिचटोला, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील झरपडा व सडक-अर्जुनी तालुक्यातील घाटबोरी येथे सुरू आहेत. (तालुका प्रतिनिधी)हे दवाखाने पडले बंदगोंदिया तालुक्यातील मजीतपूर, पांगळी, गोरेगाव तालुक्यातील बोळुंदा, सडक-अर्जुनी तालुक्यातील चिखली, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील झाशीनगर, आमगाव तालुक्यातील अंजोरा ही सहा आयुर्वेदीक रुग्णालये निधीअभावी बंद पडली आहेत. अडक-अर्जुनी तालुक्यातील गिरोला, डोंगरगाव व सुरतोली हे तीन दवाखाने बंद पडलेले आहेत. खोडशिवणी या आयुर्वेदीक दवाखान्यात प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झाले आहे.वनविभागाची जबाबदारी?१३ वने याअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या आयुर्वेदीक दवाखान्यांना चालविण्यासाठी वर्षाकाठी एक कोटी रूपयांचा खर्च येतो. हा खर्च करण्याची जबाबदारी वन विभागाची आहे. परंतू त्यांच्याकडून निधी मिळत नाही. जिल्हा परिषदेने हा निधी देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हे दवाखाने बंद पडल्याचे सांगितले जाते.५१ डॉक्टरांची नियुक्तीजिल्ह्यातील आयुर्वेदिक दवाखान्यात ५२ डॉक्टरांची पदे मंजूर आहेत. यापैकी ५१ डॉक्टर जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यात २३ डॉक्टर स्थायी तर २८ डॉक्टर अस्थायी आहेत. आयुर्वेदिक दवाखाने बंद पडल्यामुळे त्यांची नियुक्ती अॅलोपॅथीच्या दवाखान्यांमध्ये करण्यात आली आहे.
नऊ आयुर्वेदिक दवाखान्यांना कुलूप
By admin | Updated: April 2, 2015 01:14 IST