शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंची चूक कबुल केली, म्हणाले...
2
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
3
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
4
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
5
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
6
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
7
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
8
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
9
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
10
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
12
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
13
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
14
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
15
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
16
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
17
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
18
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
19
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

मृत वडिलास जिवंत दाखवून जमिनीची रजिस्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2017 00:36 IST

मृत वडिलाला जिवंत दाखवून दुय्यम कार्यालयात जमिनीची रजिस्ट्री केल्याच्या प्रकरणात तिरोडा पोलिसांनी तपास केले नाही.

काचेवानी : मृत वडिलाला जिवंत दाखवून दुय्यम कार्यालयात जमिनीची रजिस्ट्री केल्याच्या प्रकरणात तिरोडा पोलिसांनी तपास केले नाही. आरोपीला वाचवण्यासाठी व आरोपमुक्त होण्यासाठी तत्कालीन तपास पोलीस अधिकाऱ्याने महत्वाचे पुरावे जवळ दडवून ठेवले व न्यायालयात सादर केले नाही. त्या अधिकाऱ्यांची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी तिरोडा यांना देण्यात आली आहे. गुन्ह्यात वाढ करण्यासंबंधी अर्ज न्यायालयात जोडण्यात आले आहे. तिरोडा तालुक्याच्या बरबसपुरा येथील कुवरलाल उंदर रहांगडाले यांनी गावच्या सदाशिव देविलाल कटरे यांना जमिनी विक्री केली. याची रजिस्ट्री दुय्यम निबंधक तिरोडा येथे रजिस्ट्री क्र. (तरर १८५/१९९९ दिनांक ६/२/१९९९) करण्यात आली होती. यात विक्री करणाऱ्यांनी मेलेल्या वडिलास जिवंत दाखवून खोटी रजिस्ट्री करून शासनाची व सर्वांची फसवणूक केली होती. रजिस्ट्री वेळी खोटे नमुना सातबारा जोडणे, मृताला जिवंत दाखवणे, खोट्या स्वाक्षऱ्या करणे अशा आरोपाची तक्रार तिरोडा पोलिसात व उच्च अधिकाऱ्यांना ११ जून २०१२ ला करण्यात आली होती. तिरोडा पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्यादीला नव्याने एफआयआर नोंदविण्यास सांगितले. १७ जानेवारी २०१४ रोजी फिर्यादी नेतराम माने यांनी तक्रार नोंदवली. भादंवि ४१९,४२०,३४ गुन्हा नोंद करण्यात आला. तपास अधिकारी सुनील यादव यांनी २७ दिवसातच न्यायालयात आरोप पत्र दाखल केले. यादव यांनी गुन्हेगाराची बाजू घेण्यास कोणतीही कसर सोडली नाही. न्यायालयात आरोप पत्र सादर करताना फिर्यादीने तक्रारीसोबत जमिनीचे जुने गट क्र.५१० अ व ५१० ब आणि नवीन गट ६२८ व ६२९ चे सातबारा प्रत, फेरफार नोंद प्रती या हेतुपुरस्पर जोडले नाहीत. त्यामुळे याचा लाभ आरोपींना मिळणार, अशी खात्री पोलिसाला होती. तलाठी साजा-१० मेंदीपूरचे तलाठी वंजारी यांनी परि.पोलीस उपअधीक्षक तिरोडा यांना ११ मार्च २०१३ ला गट नं. ६२८ व ६२९ चे सातबारा उतारा, ८-अ, फेरफार क्रं. ८९ नमुना ६ क प्रत, नमुना ६ फे.क्रं. ४६, १७२, १९३ व ३३० अशा प्रतिंसह संपूर्ण रेकार्ड दिला. यापैकी एकही प्रत न्यायालयातून मिळाली नाही. त्यामुळे पोलिसांनी न्यायालयात महत्वाचे पुरावे सादर केले नसल्या समजते.प्रकरण काय आहे?सदर प्रकरण जमीन खरेदी विक्रीचा असून गट क्रमांक ५१० अ व ५१० ब (०.३२ व ०.१५) ची चकबंदी १९८९ ला करण्यात आली. अर्थात हे गट व आराजी बंद झाले. हे पुराने गट उंदर, पोतन आणि मोतीराम जानू रहांगडाले यांचे नावे होते. चकबंदीनंतर १९९१ ला नव्याने ६२८ व ६२९ गट तयार झाले. उंदर जानू रहांगडाले हे १ डिसेंबर १९९२ ला मृत झाल्याने फेरफार क्रं. ४६ नुसार ५ जानेवारी १९९३ ला वारसान संपत उंदर रहांगडाले, कुवरलाल उंदर रहांगडाले व मुलगी मालन पटले हे या जमिनीचे मालक असल्याची मोहर राजस्व विभागाने लावली. ४ फेब्रुवारी १९९९ ला जमिनी विक्री करून रजिस्ट्री (क्र.१८५) करण्यात आली होती. फेरफार (क्र.१९३) १ जानेवारी २००० ला करण्यात आले. जिवंतपणी ४ फेब्रुवारी ९९ ला विक्री केल्याचे नमूद केले आहे. उंदर रहांगडाले हे १९९२ ला मरण पावले तर १९९९ मध्ये जमीन विकण्यासाठी जिवंत झाले कसे? १ जानेवारी २००० च्या फेरफारमध्ये दुसरे खातेदार पोतन रहांगडाले उपस्थित दिसून येत नाहीत. फेरफार ४६ नुसार १९९३ ला नवीन रेकार्ड तयार झाला, तर १९८९ पूर्वीच्या रेकार्डचा उपयोग कसा करण्यात आला.पोलिसाने सावकारी प्रकरणातही वाचविले मृत वडिलास जिवंत दाखविण्याच्या आरोपात अडकलेला कुंवरलाल उंदर रहांगडाले (कृषी सहायक) याच्यावर सावकारी प्रकरण ५६/२०१२ कलम ३२ (ब), ३३,३४ अंतर्गत न्यायालयात प्रकरण सुरू होते. या प्रकरणाचा तपास पोलीस सुनील यादव यांच्याकडे होता. त्यावेळी त्यांना असे काही जमिनीसंबंधी पुरावे हाती लागले असते. गुन्हा दाखल ९ सप्टेंबर २०१२ ला झाला. पुन्हा अडकण्याच्या भीतीने क्रं.(तरर १७१७ दि. १७/९/२०१२) नुसार रजिस्ट्री करून दिली आहे. त्यांनी ही जमीन रजिस्ट्री क्र.तरर २३५/१९९८ दिनांक अशाच प्रकारे रजिस्ट्री क्र. (२५०८/१९९७) २३ जुलै १९९७ ला आपल्या नावे जमिनीची रजिस्ट्री करून घेतली होती. तपास अधिकाऱ्याने अधिक तपास केला असता तर असे अनेक प्रकरण समोर आले असते, अशी प्रतिक्रिया त्यावेळी नागरिकांमध्ये होती.