शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

नगर परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध होणार मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:23 IST

आपल्या घरातील एखादे काम करावयाचे असल्यास सध्या शहरातील बाजार परिसरात असलेल्या मजूर चौकातून मजूर मिळविले जातात. यासाठी संबंधीताला मजुराशी बोलणी करून मजुरी तय करावी लागते व त्यानंतर तो मजूर कामावर जातो.

ठळक मुद्देराष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान : लवकरच होणार कार्यालयाची स्थापना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आपल्या घरातील एखादे काम करावयाचे असल्यास सध्या शहरातील बाजार परिसरात असलेल्या मजूर चौकातून मजूर मिळविले जातात. यासाठी संबंधीताला मजुराशी बोलणी करून मजुरी तय करावी लागते व त्यानंतर तो मजूर कामावर जातो. मात्र आता या पद्धतीत बदल होणार असून नगर परिषदेच्या माध्यमातून मजूर उपलब्ध करवून दिले जाणार आहे. दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत हे प्रयोग केला जाणार आहे. यासाठी लवकरच कार्यालयाची स्थापना केली जाणार असून तेथून कुशल व अकुशल अशा दोन्ही प्रकारच्या मजुरांची पुर्तता केली जाणार आहे.शहराच्या भाजी बाजारात मजूर चौक आहे. दररोज सकाळी येथे मोठ्या प्रमाणात मजूर जमा होतात. ज्यांना मजूरांची गरज असते ते या चौकात येतात व मजुरांशी बोलणी करून घेऊन जातात.या मजूर चौकाची विशेषता अशी की, येथे फक्त मजूरच मिळत नसून प्रत्येकच कामात तरबेज कारागीर मिळतात. देशातील बहुतांश शहरातील हीच स्थिती आहे. मात्र भविष्यात शहरात सुरू असलेली परंपरा बदलणार असून मजूर चौक जवळील टाऊन स्कूलमध्ये स्थानांतरीत होऊ सकते.त्याचे असे की, राज्य शासनाच्या दीनदयाल अंत्योदय योजनेंतर्गत राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान राबविले जात आहे. या अभियानाचे कार्यालय नगर परिषदेच्या टाऊन स्कूलमध्ये असून ही योजना नगर परिषदेच्या माध्यमातून राबविली जात आहे.शासनाच्या या योजनेंतर्गत शहर उपजिवीका केंद्राचे गठन केले जात आहे. हे केंद्र कार्यालयाच्या खाली रिकाम्या भवनात देण्याचे निश्चीत करण्यात आले आहे. असे झाल्यास शहरातील सर्वच मजुर या कार्यालयाशी जुळतील.या अभियानाचे व्यवस्थापक बनकर यांच्यानुसार, या भवनातील चार खोल्यांना एकत्र जोडण्याचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे. यासाठी राज्य शासनाच्या नगर विकास विभागाला लवकरच प्रस्ताव पाठविण्याची तयारी असून त्यानंतरच काम केले जाईल.अशी राहणार उपजीविका केंद्राची व्यवस्थाशहरातील या उपजीविका केंद्राला कौशल्य विकास केंद्र बनविले जाणार आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्या नंतर कौशल्य विकास उपलब्ध करविण्याच्या दिशेने काम सुरू झाले आहे. याच योजनेला पुढे वाढवित या केंद्रात कौशल्य आधारीत कारागिर एकत्र जोडले जातील. यातंर्गत प्लंबर, मिस्त्री, मजूर, वेल्डर, कारपेंटरसह कुशल मजुरांना जोडले जाईल. प्रत्येक क्षेत्रातील किमान १०० कारागिरांची यादीच केंद्रात उपलब्ध राहील. यात त्यांच्यासोबत एक करार केला जाईल. एवढेच नव्हे तर कंत्राटदारांसोबतही या कारागिरांच्या सेवेबाबत करार केला जाईल. यामुळे सर्वसामान्यांसह कंत्राटदारांना निश्चीत दरात कारागिर उपलब्ध होतील व या मोबदल्यात कंत्राटदारांना एक रक्कम केंद्राला द्यावी लागेल. सोबतच या केंद्रात बचतगटांच्या विक्री केंद्राचीही स्थापना केली जाणार आहे. या केंद्राला एक टोल फ्री क्रमांक दिला जाणार असून या क्रमांकावर संपर्क केल्यास मजूर उपलब्ध करवून दिले जाईल.