शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

जंगल सफारीचा मोह वाढला

By admin | Updated: June 6, 2016 02:36 IST

जिल्ह्याला वरदान म्हणून लाभलेल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघोबाच्या दर्शनासाठी पर्यटकांची एकच गर्दी

कपिल केकत ल्ल गोंदियाजिल्ह्याला वरदान म्हणून लाभलेल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघोबाच्या दर्शनासाठी पर्यटकांची एकच गर्दी बघावयास मिळत आहे. यातून नागरिकांचा कल आता शहरातील सिमेंट-कॉंक्रीटचे जंगल सोडून जंगलातील विसावा व वन्यप्राणी दर्शनाकडे वाढत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटकांची संख्या दुपटीने जास्त आहे. यातून जंगल सफारीचा मोह वाढत चालल्याने दिसून येते. गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र म्हणून १२ डिसेंबर २०१३ रोजी राज्यातील पाचवे व्याघ्र राखीव क्षेत्र अस्तीत्वात आले आहे. यात नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नवेगाव अभयारण्य, नागझिरा अभयारण्य, नवीन नागझिरा अभयारण्य व कोका अभयारण्य अशा एकूण चार अभयारण्य व एका राष्ट्रीय उद्यानाचा समावेश आहे. याचे क्षेत्रफळ ६५६.३६ चौरस किमी. एवढे आहे. विशेष म्हणजे वाघोबाचे हमखास दर्शन होत असल्याने पर्यटकांची येथे नेहमीच गर्दी असते. त्यात आता व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाल्याने याची राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीयस्तरावर ख्याती आहे. व्याघ्र प्रकल्प जिल्ह्याला लाभलेले एक वरदानच आहे. त्यात आजघडीला धकाधकीच्या जीवनात थोडा विसावा मिळावा यासाठी सिमेंट- कॉंक्रीटचे जंगल सोडून नागरिकांचा कल निसर्गाच्या सानिध्याकडे दिसून येत आहे. म्हणूनच व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. विशेष म्हणजे शाळा-महाविद्यालयांना सुट्टी असल्याने पाहुण्यांचीही घरी गर्दी असून त्यांनाही सुट्टीचा आनंद लाभावा या दृष्टीने मोठ्या प्रमाणात नागरिक जंगल सफारीला पसंती देत आहेत. त्यात उन्हाळ््याचे तीन महिने जंगल सफारीसाठी अनुकूल असतात व वाघोबांचे दर्शनही होते. हेच कारण आहे की सध्या व्याघ्र प्रकल्प पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाले आहे. येथे विशेष बाब म्हणजे, यंदाच्या मार्च व एप्रिल महिन्यात मागील वर्षाच्या तुलनेत जास्त पर्यटकांची नोंद घेण्यात आली आहे. यात मागील वर्षी सन २०१५ च्या मार्च महिन्यात एक हजार ७३४ पर्यटकांची तर एप्रिल महिन्यात दोन हजार ४५७ पर्यटकांची अशी एकूण चार हजार १९१ पर्यटकांची नोंद घेण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक लाख ८५ हजार ६४० रूपये पर्यटक शुल्क, एक लाख १७ हजार ८५० रूपये वाहन भाडे व ४४ हजार रूपये कॅमेरा शुल्क वनविभागाला प्राप्त झाले आहे. यात यंदा चांगलीच भर पडली असून यंदा सन २०१६ मध्ये मार्च महिन्यात चार हजार ९०१ पर्यटक व एप्रिल महिन्यात चार हजार ५४१ असे एकूण नऊ हजार ४४२ पर्यटकांनी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली आहे. यात त्यांच्याकडून चार लाख ३७ हजार ७२० रूपये पर्यटक शुल्क, दोन लाख ७७ हजार ८०० रूपये वाहन भाडे तर ६७ हजार ९०० रूपये कॅमेरा शुल्क वनविभागाला प्राप्त झाले आहेत. विशेष म्हणजे वरील आकडेवारी बघता मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी दुपटीने पर्यटकांनी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिल्याचे दिसून येते. यामुळे व विभागाचाही चांगलाच आर्थिक फायदा होत आहे. एकंदर नागरिकांचा जंगल सफारीचा मोह वाढू लागल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. पिटेझरी गेटवरून सर्वाधिक प्रवेश व्याघ्र प्रकल्पासाठी असलेल्या गेटमधील पिटेझरी गेटवरून सध्या सर्वाधीक पर्यटक प्रवेश घेत असल्याचे कळले. याचे कारण असे की, पिटेझरी गेट राष्ट्रीय महामार्गावर असून पर्यटकांच्या माहितीसाठी अधिक सहज आहे. त्यानंतर चोरखमारा गेटवरून पर्यटक प्रवेश घेत आहेत. १५ जूनपासून प्रकल्प होणार बंद येत्या १५ तारखेपासून व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी बंद केले जाणार आहे. पावसाळ््याच्या काळात दरवर्षी १५ जून ते ३० सप्टेंबर या काळात प्रकल्प बंद केले जातात. असे असतानाही अद्याप पर्यटकांची प्रवेशासाठी धडपड सुरूच आहे. प्रकल्प बंद व्हायला तसेच शाळा सुरू होण्यास जेमतेम काहीच दिवस उरल्याने पर्यटक रिझर्व्हेशनची स्थिती जाणून घेण्यासाठी वन्यजीव विभागाच्या कार्यालयात विचारपूस करताना दिसून येत आहेत.