शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

इंदिरा आवासच्या घरकुलाचा स्लॅब कोसळला

By admin | Updated: August 6, 2015 00:46 IST

१५-२० वर्षापूर्वी शासनाच्या इंदिरा आवास योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील नागरिकांकरिता घरकुल तयार करण्यात आले होते.

भूकंपानंतर खिळखिळा : बांधकामातील दोष उघडकाचेवानी : १५-२० वर्षापूर्वी शासनाच्या इंदिरा आवास योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील नागरिकांकरिता घरकुल तयार करण्यात आले होते. निकृष्ट बांधकामाचे उदाहरण असलेल्या या घरकुलांतर्गत तालुक्यातील ग्राम खुरखुडी येथील दीनदयाल तुलाराम कोसरे यांच्या घरकुलाचा स्लॅब कोसळला. त्यामुळे या योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या अन्य घरकुलांची तपासणी करण्याची, तसेच कोसरे यांना नवे घरकूल देण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य मनोज डोंगरे यांनी केली आहे. गेल्या २३ जुलैला झालेल्या भूकंपाच्या सौम्य धक्क्याने तिरोडा तालुक्याच्या खुरखुडी येथील दिनदयाल तुलाराम कोसरे यांच्या घराच्या छताला भेग पडून तो वाकला होता. हा वाकलेली स्लॅब चार दिवसांपूर्वी रात्री ८.३० वाजताच्यादरम्यान कोसळला. सुदैवाने कोणतीही जनहानी झाली नाही. भूकंपाच्या धक्क्याने स्लॅब ७० टक्के वाकल्यानंतर त्या ठिकाणावरून वावरणे बंद करण्यात आले होते, त्यामुळे कोणतीही जीवित हाणी झाली नाही, असे परिवाराने सांगितले. भूकंपाच्या दुसऱ्या दिवशी (दि.२४) ला महसूल विभागाचे तलाठी, तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांना दुरध्वनीद्वारे कळविण्यात आले. मात्र त्याकडे कोणत्याही अधिकाऱ्याने लक्ष दिले नाही किंवा दखल घेतली नाही, असे जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. भूकंपाच्या धक्क्याने वाकलेला स्लॅब कोसळल्याने मनोज डोंगरे, पं.स. सदस्य मनोहर राऊत, सरपंच प्रमिला बोपचे, पोलीस पाटील भारती रामटेके, उपसरपंच गणेश रहांगडाले, ग्रामसेवक एस.एन. तळेगावकर, सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष छबीलाल पटले आणि अन्य ग्रा.पं. सदस्याच्या प्रमुख उपस्थितीत घटनास्थळी जावून कोसळलेल्या छताचा पंचनामा करण्यात आला. लगेच याची सूचना उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे, तहसीलदार चव्हाण यांना देण्यात आली. त्यांनी पंचनामा करण्याकरिता मंडळ अधिकारी दाते यांना पाठवून अहवाल सादर केला. (वार्ताहर)जिल्ह्यातील ९० टक्के घरकुलांची दुर्दशा १५ ते २० वर्षापूर्वी इंदिरा आवास योजनेंतर्गत दारिद्रयात जीवन जगणाऱ्या आणि घर नसणाऱ्यांकरिता घरकुल तयार करून देण्यात आले होते. या घरकुलांचे बांधकाम बघता त्या घरकुलाचे आयुष्य १० वर्षाच्या वर नसल्याचे दिसून येते. त्यात आजघडीला या घरकुलांची दशा अधिकच दयनीय झाली आहे. ज्यावेळी ही घरकुले बांधली त्या काळी निधी फारच कमी असल्याने कंत्राटदारांनी कसेतरी बांधकाम केले. परिणामी बांधकाम मजबूत झाले नाही. संपूर्ण जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी इंदिरा आवासचे घरकूल अशाच पद्धतीने तकलादू असल्याचे सांगितले जात आहे.इंदिरा आवासमध्ये राहणाऱ्या कुटुंबांची आजची स्थिती पाहिली तर डुकरांच्या झोपड्यामध्ये राहण्यासारखी तिथे राहणाऱ्यांची स्थिती आहे. भूकंपासारखी घटना किंवा संततधार पावसात एखादे घरकूल कोसळले तर जीवहानी होऊ शकते.