झाडे व विद्युत खांब कोसळले : लाखोंच्या मालमत्तेची हानी, कवेलू व छत उडालेकाचेवानी : तिरोडा तालुक्यात पुन्हा नैसर्गिक कोप जाणवला. नैसर्गिक चक्रवादळाच्या रौद्ररूपाने अनेक झाडे व विद्युत खांब कोलमडून पडले. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. मात्र सुदैवाने कुठेही जीवित हानी झाली नाही.तालुक्यात (दि.२७) च्या रात्री १२ वाजताच्या सुमारास जोरदार मेघगर्जनेसह चक्रीवादळ आणि गारपिटीने कहर केला. यात हजारो झाडे, विद्युत खांब, घराचे छत, कवेलू दूरपर्यंत उडाले. बाहेर शेतात असणारे गुरेढोरे जखमी झाले. उन्हाळी धानपिकांची नासाडी झाली. अर्धातासाच्या वेळेकरिता अचानक उद्भवलेल्या रौद्र चक्रीवादळाने सर्वनाश केला.या रौद्ररुपी चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका काचेवानी, जमुनिया, बरबसपुरा, डब्बेटोला, मेंदीपूर, धामनेवाडा, बेरडीपारसह अनेक गावांना बसला. काचेवानीमध्ये शेकडो झाडे तुटून बरबसपूरा, इंदोरा मार्गावरील रेल्वे गेट परिसरातील पाच विद्युत खांब कोसळले. त्यामुळे अनेक रस्ते बंद पडले होते.बरबसपुरा येथील रमेश बिसेन, संजय लिचडे आणि बेरडीपार येथील विद्याधर राऊत यांच्या घराचे लाकडी साहित्य आणि छत उडून दूराव उडून गेले. रौद्र चक्रीवादळात ९० टक्के घरावरील कवेलूसुद्धा उडून घर बाधित झाले. चक्रीवादळाने अनेक झाडे मुळासह उखडले तर काही झाडे अर्ध्यातून तुटून पडले. त्यामुळे विद्युत खांब तुटून विद्युत वायर रस्त्यावर लोंबकडलेले दिसत होते. चक्रीवादळ एवढे भयावह होते की, गेल्या २० वर्षांत असे चक्रीवादळ पाहण्यात आलेले नाही. रात्रीची वेळ असल्याने व विद्युत खंडित असल्याने जीवित हानी घडली नाही. तरीपण उन्हाळ्याच्या दिवसात शेतात असणारी गुरे गारपिटीच्या तडाख्याने जख्मी झाल्याच्या तक्रारी मिळाल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते गणेश कोल्हटकर, उपसरपंच पप्पू सैयदसह अनेकांनी याची सूचना विद्युत विभागाला देवून सहकार्य केले. या वादळीवाऱ्यामुळे शेतकऱ्यांसह गावकऱ्यांचाही मोठा नुकसान झाला. नेतराम माने यांनी ठाणेदार सुरेश कदम आणि विद्युत विभाग यांना परिसराची माहिती देवून विद्युत खंडित करण्यात यावी, अशी विनंती केली. (वार्ताहर)उन्हाळी धानपिके संकटातउन्हाळी धान पिकांसाठी खूप कष्ट आणि खर्च करावा लागतो. अशा परिस्थितीत धान पिके फुलोऱ्यावर व काही कापण्याच्या स्थितीत असताना चक्रीवादळ व गारपिटीने झोडपले. याचा शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे. काही धानपिके दाणे भरण्यापूर्वीच बांध्यात झोपलेले असल्याचे चित्र आहे.अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणाविद्युत समस्या निर्माण होण्यामागे विभागाचे कर्मचारी दोषी आहेत. रस्त्याच्या शेजारी असणारे झाडे कमकुवत दिसत असतील तर नागरिकांना किंवा मालकांना सांगून नष्ट करायला सांगणे गरजेचे होते. परंतु विद्युत अधिकारी व कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने असे गंभीर संकट निर्माण होत आहेत. शेतकऱ्यांनी किंवा नागरिकांनी संरक्षणाच्या दृष्टीकोनातून असे झाडे तोडून टाकायला हवे, असेही काही शेतकऱ्यांनी लोकमतजवळ बोलून दाखविले.सर्वेक्षण करुन आर्थिक सहाय्य करावेकाचेवानी परिसरातील ५ ते ७ गावांत चक्रीवादळ, गारपीट व पावसाने तसेच विद्युत खांबामुळे झालेल्या नुकसानीचे निरीक्षण व पंचनामा करुन नुकसान भरपाई व आर्थिक सहाय्य करण्यात यावे, अशी मागणी तालुका उपविभागीय अधिकारी प्रविण महिरे आणि तहसीलदार रविंद्र चव्हाण यांनी केली आहे.
चक्रीवादळाचे रौद्ररूप
By admin | Updated: April 30, 2016 01:45 IST