शहरं
Join us  
Trending Stories
1
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
2
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
3
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
4
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
5
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
6
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
7
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
8
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
9
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
10
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
11
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
12
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
13
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
14
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
15
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
16
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
17
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
18
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
19
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
20
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...

रुग्णालयात बेड्स मिळेना, रुग्णांना घरी ठेवता येईना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 05:00 IST

जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून कोरोनाचा ग्राफ वाढण्यास सुरुवात झाली आहे. तज्ज्ञांनी कोरोनाची दुसरी लाट येण्याचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने नियोजन करण्याची गरज होती. शासकीय रुग्णालयातील बेड्स, ऑक्सिजनचा साठा, व्हेंटिलेटर, डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची गरज होती. पण मागील सहा महिने केवळ हातावर हात ठेऊन बसण्यातच धन्यता मानली.

ठळक मुद्देप्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका : रुग्णांची परवड, जिल्ह्यातील परिस्थिती हाताबाहेर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना बाधितांचा आलेख सातत्याने वाढत असून सद्यस्थितीत ७ हजारावर कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे शासकीय व खासगी कोविड रुग्णालयसुध्दा हाऊसफुल झाले असून अनेक रुग्ण वेटिंगवर आहेत. शासकीय व खासगी रुग्णालयात रुग्णांना दाखल करण्यासाठी बेड्स मिळेना आणि रुग्णांना घरी ठेवता येईना असेच बिकट परिस्थिती सध्या जिल्ह्यात निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने तहान लागल्यानंतर विहीर खोदण्याच्या प्रकाराप्रमाणे आता हातपाय हलविण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून कोरोनाचा ग्राफ वाढण्यास सुरुवात झाली आहे. तज्ज्ञांनी कोरोनाची दुसरी लाट येण्याचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने नियोजन करण्याची गरज होती. शासकीय रुग्णालयातील बेड्स, ऑक्सिजनचा साठा, व्हेंटिलेटर, डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची गरज होती. पण मागील सहा महिने केवळ हातावर हात ठेऊन बसण्यातच धन्यता मानली. त्याचाच फटका आता रुग्णांना सहन करावा लागत आहे. शासकीय रुग्णालयात बेड्सच्या क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण दाखल आहेत. तर खासगी कोविड रुग्णालयांमध्ये तिच परिस्थिती आहे. त्यातच खासगी रुग्णालयात रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना आधी ॲडव्हान्स जमा करा लागतो. त्याचा आकडासुध्दा चार अंकी आहे. मात्र प्रत्येकच रुग्णाला हे शक्य नसल्याने त्यांना शासकीय रुग्णालयाच्या हेलपाट्या मारण्याशिवाय कुठलाच पर्याय नाही. शनिवारी (दि.१७) केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल होण्यासाठी आलेल्या एका कोविड रुग्णाचा रांगेतच मृत्यू झाला. एवढी बिकट परिस्थिती सध्या शासकीय रुग्णालयाची आहे. रुग्ण संख्येत तीन ते चार पट वाढ होत असल्याने तेथे कार्यरत डॉक्टर स्वत:चा जीव धोक्यात घालून २४ तास काम करीत आहे. त्यांच्यावरील ताण प्रचंड वाढला आहे पण ते याही स्थितीत काम करीत आहे. मात्र प्रशासनाने जिल्ह्यात परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर डॉक्टर आणि परिचारिकांची पदभरती प्रक्रिया सुरू केली आहे. एकंदरीत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले असून यावर खुद्द जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी नाराजी व्यक्त केली. आरोग्य विषयक पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात दिंरगाई झाल्याचे सांगितले. 

नोडल अधिकाऱ्यांचे लक्ष कुठेnशासकीय व खासगी रुग्णालयात ऑक्सिजन तसेच रेमडेसिविर इंजेक्शनचा तुडवडा निर्माण होऊ नये, या इंजेक्शनचे समान वितरण व्हावे यासाठी पालकमंत्र्याच्या निर्देशावरून एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. मात्र यानंतरही जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार सर्रास सुरू आहे. काही रुग्णालयातूनच हे इंजेक्शन बाहेर येथून १५ ते २० हजार रुपयात ते उपलब्ध करून दिले जात आहे. रुग्णांच्या नातेवाइकांना सुध्दा पर्याय नसल्याने ते तेवढे पैसे मोजून खरेदी करीत आहेत. मात्र अद्यापही कुणावरच कारवाई करण्यात आली नाही. मग नोडल अधिकाऱ्यांचे लक्ष कुठे असा सवाल उपस्थित केला जात आहे. माणूसकीच्या धर्माचा पडतोय विसर प्रशासन आम्ही नियमानुसार काम करीत आहोत, किती मोठा व्यक्ती असू द्या पण आम्ही नियम मोडणार नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील काही अधिकारी छातीठोकपणे सांगत आहेत. त्यांच्या या वृत्तीचा आदर आहे. पण एखाद्या रुग्ण गंभीर असेल त्याला मदत करून त्याचे प्राण वाचविणे शक्य असेल तर कधी नियमसुध्दा बाजुला ठेवीत माणुसकीच्या नात्याने मदत करावी लागते. पण नियमावर बोट ठेवीत काही अधिकाऱ्यांना सध्या माणुसकीचा विसर पडत असल्याचे चित्र आहे. 

कोविड नॉन कोविड रुग्णालयाचा वाद  ल्ह्यात सध्या शासकीय आणि खासगी कोविड रुग्णालये सुध्दा हाऊसफुल आहे. वशिला लावल्यानंतरही बेड मिळणे कठीण झाले आहे. तर कोरोनाच्या गंभीर रुग्णांना घरी ठेवणे धोक्याचे झाले आहे. अशात ज्या रुग्णालयात बेड मिळेल तिथे रुग्णांना दाखल केले जात आहे. मात्र नॉन कोविड रुग्णालयात दाखल कोविड रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन मिळणार नाही असा फतवा काढण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णाला मृत्यूच्या दाढेत ढकलण्याचे काम सुरू असल्याचे बिकट चित्र आहे. रुग्ण दाखल शंभर इंजेक्शन मिळतेय चाळीस  एक एका खासगी कोविड रुग्णालयात सुध्दा सद्य:स्थितीत शंभरावर गंभीर रुग्ण दाखल आहेत. त्यांना रेमडेसिविर इंजेक्शन देण्याची गरज आहे. पण त्यांना गरज शंभर इंजेक्शनची असता नियमानुसार केवळ ४० इंजेक्शन दिले जात आहे. तर उर्वरित रुग्णांना वेटिंगवर ठेवण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांची या इंजेक्शनसाठी सर्वाधिक परवड होत असून उधारउसनवारी करून किंवा दागिने गहाण ठेवून हे इंजेक्शन कुठूनही अतिरिक्त दराने खरेदी करावे लागत आहे. 

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या