गोंदिया : जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून समन्वय साधण्याच्या व संघटितपणे कामाला लागण्याच्या हेतूने सर्वसाधारण बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. सभेत बूथ कमिट्या बळकट करण्याबाबत सूचना देण्यात आल्या, तसेच आपसातले मतभेद विसरून कामाला लागण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीची वार्षिक सर्वसाधारण बैठक २० सप्टेंबर रोजी गणखैरा येथील किरसान इंटरनॅशनल पब्लिक स्कूलच्या सेमिनार हॉलमध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. एन.डी. किरसान यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आ. सहषराम कोरोटे, प्रदेश सचिव अमर वराडे, पी.जी. कटरे, माजी आमदार दिलीप बन्सोड, पुरुषोत्तम कटरे, कार्यध्यक्ष रत्नदीप दहीवले, माजी जि.प. अध्यक्ष उषा मेंढे, झामसिंग बघेले, युवा नेते अशोक गुप्ता उपस्थित होते. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे अमर वराडे, पी.जी. कटरे, आमदार सहषराम कोरोटे, दिलीप बन्सोड, बाबा कटरे, रत्नदीप दहीवले यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. बैठकीत जिल्ह्यातील सर्व आजी-माजी पदाधिकारी व आजी-माजी आमदार यांच्यात एकता व सुसूत्रता दिसून आली. याचा फायदा निश्चितच जि.प. व नगरपंचायत निवडणुकीत दिसून येईल, अशी अपेक्षा जिल्हाध्यक्ष एन.डी. किरसान व आमदार सहषराम कोरोटे यांनी व्यक्त केले. यावेळी रामलाल राऊत, सी.टी. चौधरी, महासचिव यादनलाल बनोठे, पृथ्वीराज चव्हाण, दामोदर नेवारे, जगदीश येरोला, पुष्पा खोटेले, रमेश लिल्हारे, सचिव इशूलाल भालेकर, विशाखा साखरे, डॉ. संजय देशमुख, निकेश मिश्रा व संजय वाहाने, कार्यकारिणी सदस्य कैलास अग्रवाल, वसंत पुराम, अनिल राजगिरे, कृष्णा सहारे, नितीन पुगलिया, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा उषा शहारे, युवक काँग्रेस अध्यक्ष अलोक मोहंती, एनएसयूआय अध्यक्ष हरीश तुळसकर, ओबीसी सेल अध्यक्ष जितेंद्र कटरे, किसान काँग्रेस अध्यक्ष जितेश राणे, अनु. जाती विभाग अध्यक्ष अमित भालेराव, अल्पसंख्याक अध्यक्ष परवेज बेग, सोशल मीडिया अध्यक्ष योगेश अग्रवाल, असंघटित कामगार सेल अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे, डॉक्टर्स सेल अध्यक्ष विवेक मेंढे उपस्थित होते.