शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

मत्स्यपालनातून जीवनोन्नती

By admin | Updated: August 4, 2015 01:36 IST

तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदियात जलक्षेत्र मोठे असून नैसर्गिक संपत्तीही विपुल प्रमाणात आहे.

विभागीय आयुक्त अनुपकुमार : पथदर्शी प्रकल्पातील संस्थांशी संवाद गोंदिया : तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदियात जलक्षेत्र मोठे असून नैसर्गिक संपत्तीही विपुल प्रमाणात आहे. जिल्ह्यातील मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था पारंपरिक पद्धतीने मासेमारी करीत असल्यामुळे उत्पादन कमी मिळत आहे. या संस्थांनी शास्त्रोक्त पद्धतीने मत्स्योत्पादन केल्यास मोठ्या प्रमाणात माशांचे उत्पादन घेवून आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. त्यामुळे मत्स्यपालनातून जीवनोन्नती साधावी, असे मत विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी व्यक्त केले.शनिवारी १ आॅगस्ट रोजी अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेड तिरोडा येथील सभागृहात १८ मत्स्य सहकारी संस्थांच्या अध्यक्ष व सचिवांना मार्गदर्शन करताना विभागीय आयुक्त अनुप कुमार बोलत होते. मत्स्यव्यवसाय विभाग आणि अदानी फाऊंडेशन तिरोडा यांच्या सहकार्याने जिल्ह्यात भूजल मत्स्योत्पादन वाढविण्याचा पथदर्शी प्रकल्प १८ मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांमार्फत राबविण्यात येत आहे. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेडचे प्रकल्प प्रमुख सी.टी. साहू, अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेडचे महाव्यवस्थापक मोहन पांडे, अप्पर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत पाडवी, उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे, अदानी फाऊंडेशनचे सुबोधसिंग, मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त समीर परवेज यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.अनुप कुमार पुढे म्हणाले, जिल्ह्यातील मासेमारी संस्थांनी आता माशांसोबत झिंगा उत्पादनाकडे वळावे. जिल्ह्यात जास्तीत जास्त मत्स्योत्पादन केल्यास बाहेर जिल्ह्यातसुद्धा मासे विक्रीसाठी पाठविता येईल. सोसायटीने स्वार्थीवृत्ती बाजूला ठेवून समाजातील बांधवांच्या हितासाठी काम करावे. विदर्भ वैधानिक विकास मंडळाकडूनही मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांच्या विकासासाठी आपण तयार असल्याचे आयुक्तांनी या वेळी सांगितले.जिल्हा मासेमार संघाच्या माध्यमातून इथला मासा बाहेर जिल्ह्यात विक्रीसाठी गेला पाहिजे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले, मत्स्य सहकारी संस्थांशी करार करून इटियाडोह येथील मत्स्यबीज निर्मिती केंद्र पूर्ण क्षमतेने सुरु करण्याच ा विचार आहे. आंध्र व पश्चिम बंगाल राज्यातील मत्स्यविभागाशी संपर्क साधून जिल्ह्याच्या मत्स्यविकासासाठी त्यांचे सहकार्य घेण्यात येईल. जिल्ह्यात मोबाईल मासेविक्री केंद्र सुरू करण्याचा विचार असल्याचे सांगून दरमहा जिल्हा मासेमार संघाची सभा जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेणार असल्याचेही डॉ. सूर्यवंशी यांनी या वेळी सांगितले.प्रास्ताविकातून जिल्हा मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त समीर परवेज यांनी पथदर्शक प्रकल्पाची माहिती दिली. या वेळी जिल्हा मत्स्यमार सहकारी संघाचे अध्यक्ष घुसाजी मेश्राम, मासेमारी सहकारी संस्थांचे पदाधिकारी गोपाल सोनवाने, काशीराम कोल्हे, दिगंबर पटले, हुसन गेडाम, दिलीप सोनवने, रामचंद्र तुमसरे, रफीक शेख, हेमराज मेश्राम, धानाजी उके, भाष्कर वासनिक, रमेश मानकर, ताराचंद मेश्राम, मधुकर देवगडे यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)मत्स्यजीरे विक्रीतूनही उत्पन्न मिळवा४गोड्या पाण्यातील मत्स्यजिऱ्यांचे उत्पादन जिल्ह्यातील संस्थांनी मोठ्या प्रमाणात कराव. त्यामुळे त्या संस्थांना माशांच्या उत्पादनासोबत मत्स्यजिरे विक्रीतून उत्पन्न वाढविण्यास मदत होईल. इथला मत्स्यजिरा विक्रीसाठी कलकत्याच्या बाजारपेठेत गेला पाहिजे. पथदर्शी प्रकल्प राबविताना संस्थांच्या अडचणी व मत्स्योत्पादन वाढीसाठी आवश्यक असलेले माहिती संस्थांच्या सभासदाना द्यावी, असेही विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी सांगितले.कृउबास परिसरात मासेविक्रीचे मार्केट४गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनात गोंदिया जिल्हा राज्यात अग्रेसर रहावा यासाठी मत्स्य सहकारी संस्थांनी लक्ष द्यावे. यासाठी आपण सर्वोतोपरी सहकार्य करण्यास तयार आहोत. माशांसाठी लागणारे खाद्य व मासेविक्रीची बाजारपेठ यांचाही अभ्यास संस्थांनी करावा. जिल्ह्यात गोंदिया येथे कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात मासेविक्रीचे चांगले मार्केट उभे करण्याचा आपला विचार आहे. जिल्ह्यातील मासेमारी कुटुंबातील महिलांना संघटीत करून मत्स्योत्पादनात महिलांचा सहभाग जीवनोन्नती अभियानातून घेणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या वेळी सांगितले.