शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभर शेतीकाम आणि रात्री निवडणूक प्रचाराचा जोर

By admin | Updated: July 24, 2015 01:15 IST

येत्या २५ जुलै रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सालेकसा तालुक्यात एकूण ४१ ग्रामपंचायतींपैकी नऊ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे.

ग्रामपंचायत निवडणूक : ८१ सदस्यांसाठी १६४ उमेदवार रिंगणातविजय मानकर सालेकसायेत्या २५ जुलै रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सालेकसा तालुक्यात एकूण ४१ ग्रामपंचायतींपैकी नऊ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. यात ८१ सदस्य निवडून द्यायचे असून त्यासाठी १६४ महिला-पुरूष उमेदवारांनी मैदानात उडी घेतली आहे. यापैकी ४५ महिला आणि ३६ पुरूष सदस्य निवडले जाणार आहेत. त्यामुळे महिला उमेदवार मतदारांना आपलेसे करून घेण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. याचदरम्यान शेतीच्या रोवणीच्या कामालासुध्दा वेग आला आहे. त्यामुळे शेतीचे काम असो किंवा निवडणुकीचे, दोन्हीसाठी वेळ फार महत्वाचा असतो. शेतीची कामे वेळेवर झाली नाही तर उत्पादनावर परिणाम होईल तर दुसरीकडे वेळेवर मतदारांशी संपर्क केला नाही तर निवडणूक जिंकण्यावर परिणाम होईल. अशा परिस्थितीत उमेदवारांची मोठी कोंडी होताना दिसत आहे. ते व्दिधा मनस्थितीत सापडले आहेत. यात महिला उमेदवारांची तर अग्निपरीक्षा होत आहे. परंतु ‘एक नारी सब पर भारी’ या म्हणीला सार्थक करण्याचे काम महिला उमेदवार करीत असताना दिसत आहेत. सर्वत्र रोवणीची कामे सुरू आहेत. यात जे निवडणूक लढवित आहेत. तेसुध्दा सहपरिवार कामात गुंतले आहेत. अशात महिला दिवसभर आपल्या शेतीत काम करीत आहेत. सायंकाळी घरी येवून लवकर स्वयंपाक करणे, आंघोळ करणे, तयार होणे आणि आपल्या वार्डात ‘डोअर टू डोअर’ संपर्क करण्याचे काम सर्व नऊ ग्रामपंचायतीमध्ये करताना दिसून येतात. यात महिला उमेदवारच नाही तर ज्या ठिकाणी पुरूष उमेदवार आहेत, त्यांच्या पत्नीसुध्दा आपल्या पतीच्या विजयासाठी स्वेच्छेने घराबाहेर निघून मतदारांशी सतत संपर्क साधताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या कामात महिला आपल्या पुरूषावर कसल्याही प्रकारे अवलंबून न राहता आपल्या सोबत मोहल्यातील एक-दोन महिलांना घेऊन किंवा प्रभागाच्या पॅनेलमध्ये असलेल्या महिलांना घेवून पुरुष उमेदवारांच्या महिलांनासुध्दा एकत्र घेवून जनसंपर्क करीत आहेत. दिवसभर शेतीत काम करून तसे कोणीही थकून जातो आणि सायंकाळी लवकर जेवण करून सकाळी लवकर उठण्याच्या उद्देशाने लवकर झोपायला जातात. परंतु सध्या निवडणूक नादात रात्री ११, १२ वाजेपर्यंत त्या मतदारांशी संपर्क करून घरी येतात. दुसऱ्या दिवसाची योजना ठरवितात आणि मग झोपतात. दोन-तीन तास झोपल्यानंतर पहाटे लवकर उठून पुन्हा सकाळी स्वयंपाक करून शेतीच्या कामाला जातात. हा सर्व क्रम चालत असताना महिला मुळीच थकलेल्या दमलेल्या दिसत नाहीत. अशा महिलांना पाहून वाटते की या महिलांमध्ये किती उर्जा भरलेली आहे. काही वर्षापूर्वीची कल्पना केली तर आपल्याला ग्रामीण भागात कोणतीही महिला पदाधिकारी स्वत: निर्णय न घेता पतीवर अवलंबून राहायची. परंतु आता त्या स्वयंनिर्णयासाठी सक्षम झालेल्या दिसत आहेत. महिलांना फक्त घराबाहेर निघण्याची संधी मिळाली तर भविष्यात त्यांना आरक्षणाची गरज भासणार नाही, असे वाटते.