शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

संस्थेत प्रसूतीचे प्रमाण आले ९९ टक्क्यांवर

By admin | Updated: September 18, 2015 01:36 IST

नक्षल प्रभावित, दुर्गम व आदिवासी भागात आरोग्य यंत्रणेने आरोग्यविषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे या योजनांचे लाभार्थी वाढले आहेत.

आरोग्याच्या योजनांचे यश : १२ हजार गरोदर मातांना बुडीत मजुरीचा लाभगोंदिया : नक्षल प्रभावित, दुर्गम व आदिवासी भागात आरोग्य यंत्रणेने आरोग्यविषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे या योजनांचे लाभार्थी वाढले आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानामुळे आरोग्य सेवेचे बळकटीकरण होण्यास मदत झाली आहे. नऊ वर्षाच्या कालावधीत आरोग्य सेवेत मोठा बदल झाला असून अनेक योजना लोकाभिमुख झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवेचा लाभ रुग्णांना घेता आला आहे.जननी सुरक्षा योजनेंतर्गत ग्रामीण भागातील मातेला संस्थेत प्रसुती केल्यानंतर ७०० रुपये व शहरी भागातील मातेला ६०० रुपये, मातृत्व अनुदान योजनेंतर्गत संस्थेतील प्रसुतीनंतर ४०० रुपये, प्रत्येक मातेला प्रसुतीकाळात ३ दिवस मोफत जेवण, जोखमीच्या मातांना विनामुल्य वाहन व्यवस्था आदी सुविधा पुरविण्यात आल्यामुळे जवळपास १०० टक्के प्रसुती या आरोग्य संस्थेत झाल्या आहेत.सन २०१४-१५ या वर्षात १६ हजार ५२६ प्रसुती या संस्थेत झाल्या असून त्यापैकी १३ हजार ८४० गरोदर मातांना घरापासून संस्थेत मोफत सेवा देण्यात आल्या आहे. मानव विकास मिशन कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील गर्भवती मातांची, स्तनदा मातांची आणि ० ते ६ महिने वयोगटातील बालकांची तपासणी करून १२ हजार ५९ गरोदर मातांना बुडीत मजुरीचा लाभ देण्यात आला आहे. सन २०१४-१५ या वर्षात मानव विकास मिशनअंतर्गत ४५५ आरोग्य शिबिरे घेण्यात आली आहेत.राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्रात विविध आरोग्यविषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आल्यामुळे आरोग्य सेवेचे बळकटीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दुर्गम, नक्षलग्रस्त व ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यविषयक योजनांचा लाभ घेणे शक्य झाले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)नऊ वर्षात आमुलाग्र बदलसन २००५-२००६ या वर्षात आरोग्य संस्थेतील प्रसुतीचे प्रमाण ३९.१८ टक्के, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया ७५.०२ टक्के, प्राथमिक लसीकरण ९५.६५ टक्के, अर्भक मृत्यू दर ४०.७२ टक्के, प्रजनन दर २.५३ टक्के असा होता. सन २०१४-१५ या वर्षात आरोग्य संस्थेतील प्रसुतीचे प्रमाण ९९.६४ टक्के, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया ९४.७४ टक्के, प्राथमिक लसीकरण १०० टक्के, अर्भक मृत्यू दर २४.७२ दरहजारी, प्रजनन दर २.०५ दरहजारी असा झाला आहे.जीवनदायी योजनेत ६ हजार २४९ रुग्णांची नोंदणी२१ नोव्हेंबर २०१३ पासून जिल्ह्यात राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू झाली आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी ६ हजार २४९ रुग्णांची नोंदणी करण्यात आली. या योजनेंतर्गत त्यांच्या उपचारावर १ कोटी १५ लाख २० हजार रुपये खर्च करण्यात आले आहे. वास्तविक जिल्ह्याच्या १३ लाख लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णांची ही नोंदणी कमीच असून ती वाढविण्यात आरोग्य यंत्रणेला अद्याप यश आलेले नाही. योजनेच्या प्रचार व प्रसारात हा विभाग कमी पडत असल्याचे दिसून येते.