देवानंद शहारे ल्ल गोंदियाजीवंतपणीच मरणयातना देणारा आजार म्हणजे सिकलसेल. हा आजार कुठून आला याबाबत अद्याप संशोधन पूर्ण झाले नाही, संशोधकांमध्ये त्यात एकवाक्यता नाही. या आजारावर अद्याप कोणतेही प्रभावी औषधोपचार उपलब्ध नाही. विवाहापूर्वी घेतलेल्या दक्षतेमुळेच हा आजार नियंत्रित केला जावू शकतो. मात्र प्रत्यक्षात सिकलसेलग्रस्तांच्या सहकार्याशिवाय हे नियंत्रण साधणे अशक्य होत होत असल्यामुळे जिल्ह्यात हा आजार दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी जास्त फोफावत आहे. राज्यभरात गोंदिया जिल्ह्यात या आजाराचे रुग्ण सर्वाधिक आहेत, हे विशेष.गोंदिया जिल्ह्यात मागील साडेसहा वर्षांत ७८१ जण सिकलसेलग्रस्त आढळले. सिकलसेलचे निदान रक्त तपासणीतून होते. यात तीन प्रकारचे पॅटर्न आढळतात. एए (निगेटिव्ह), एएस (वाहक) व एसएस (ग्रस्त). एए पॅटर्न असलेल१ व्यक्ती निरोगी समजल१ जाते. एएस पॅटर्न असलेला सिकलसेल वाहक असतो. मागील साडेसहा वर्षांत जिल्ह्यात एकूण ६,७५४ वाहक आढळले. या वाहकांपासून येणाऱ्या पिढीमध्ये सिकलसेल संसर्गित होत आहे. ग्रस्त रूग्णांची सर्वाधिक काळजी घ्यावी लागते. त्याला वारंवार रक्ताची गरज भासते. शिवाय त्याच्या लाल रक्त पेशी विळ्याच्या आकाराच्या असल्यामुळे शरीरात योग्यरित्या रस्ताचा पुरवठा (ब्लड सर्कुलेशन) होत नाही. याचा मोठा त्रास रुग्णाला सहन करावा लागतो. नियमित काळजी घेतली तर रुग्ण सर्वसाधारणपणे ४२ वर्षे आयुष्य जगू शकतो. पण काळजी न घेतल्यास कधीही त्याचा मृत्यू ओढवू शकतो. सिकलसेल टेस्ट निगेटिव्ह आल्यास त्या व्यक्तीला (एए) पांढरे कार्ड दिले जाते तर एएस (वाहक) पॅटर्न आढळल्यास त्याला पिवळे कार्ड व एसएस पॅटर्न (ग्रस्त) आढळल्यास त्यांना लाल कार्ड दिले जाते. सिकलसेल आजार सर्वाधिक अनुसूचित जाती-जमाती, मुस्लिम समाजात आढळतो. ओबीसी प्रवर्ग व एनटी प्रवर्गातील काही लोकांमध्येही याचे रुग्ण आढळतात. मात्र त्यांचे प्रमाण कमी आहे. वाहक (एएस) सर्वच जातींमध्ये थोड्याफार प्रमाणात आढळतात.सिकलसेलग्रस्तांची लक्षणे४ हातापायावर सूज येणे. ४डोळांवर सूज येणे व पिवळे होणे. ४ अत्याधिक अशक्तपणा, वारंवार रक्ताची गरज पडणे.४ पोटात दुखणे (तिळ उठणे). असह्य सांधेदुखी, गुडघेदुखी हा मुख्य त्रास. ४ वारंवार भोवळ येणे. शरीरात रक्ताचा पुरवठा न होणे. ४ पेशी विळ्याच्या आकाराच्या असल्याने रक्त पुरवठा थांबणे. आॅक्सिजनची कमतरता असणे.नियंत्रणासाठी काय करावे?४भरपूर पाणी प्यावे. संतुलित आहाराकडे लक्ष द्यावे. वैद्यकीय सल्ल्यानुसार फॉलिक अॅसिड व एंटीड्रग (हायड्राक्सियुरिया) नियमित घेणे. उन्ह व थंडीपासून बचाव करावागर्भजल तपासणीतूनही होते निदान४कधीकधी आई-वडील निरोगी (निगेटिव्ह) असतानाही मुलांमध्ये सिकलसेल आढळतो. हा आजार पूर्वीच्या पिढीतून संसर्गित होण्याची शक्यता असते. त्यामुळे या आजाराला अनुवंशिक समजले जाते. गरोदर मातेच्या दोन ते अडीज महिन्यांत गर्भजल तपासणीतूनही सिकलसेल पॅटर्न कोणत्या प्रकारचे आहे, याची माहिती मिळू शकते. या तपासणीतून जर गर्भ एसएस पॅटर्नचे आढळले तर गर्भपात करून सिकलसेलग्रस्त बाळाचा जन्म होण्यापासूनच थांबविले जावू शकते.सिकलसेल निदानाच्या तीन चाचण्या४सिकलसेल तपासणीसाठी सर्वप्रथम सोल्युबिलिटी टेस्ट केली जाते. यातून केवळ सिकलसेल पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असे निदान होते. यानंतर कन्फर्मेशन टेस्ट (इलेक्ट्रोफोरेसिस) केली जाते. या चाचणीद्वारे पॅटर्न कन्फर्म होते. इलेक्ट्रोफोरेसिसची सुविधा रजेगाव, देवरी, आमगाव व जिल्ह्यातील इतर रूग्णालयांमध्ये आहे. यानंतर एसएस पॅटर्न असलेल्या रूग्णांची एचपीएलसी (हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमाटोग्राफी टेस्ट) केली जाते. या चाचणीसाठी रस्ताचे नमुने नागपूला पाठविले जातात. या चाचणीतून रक्तामधील थायलेसेमियाचा बँड माहीत होते. थायलेसेमिया लहान मुलांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो.सिकलसेल ग्रस्तांसाठी शासनाच्या योजना४संजय गांधी निराधार योजनेतून दरमहा ६०० रूपये. दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत एका तासाला २० मिनिटे अधिक वेळ. एसटी बसमध्ये प्रवास मोफत यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रमाणपत्र व ग्रस्ताच्या ओळखपत्राची गरज. मात्र त्यासाठी शासनाने एसटी महामंडळाकडे अनुदान वळते केले नाही. रेल्वेच्या प्रवासातही ५० टक्के अनुदान, मात्र याची मुदत तीन महिने कालावधीची असते. लग्नापूर्वीच्या दक्षतेशिवाय नियंत्रण अशक्य४लग्नापूर्वी सिकलसेल चाचणी करून त्यानुसार विवाह केल्यास सिकलसेल भविष्यात नियंत्रित होवू शकतो. एएस-एएस पॅटर्नच्या व्यक्तींनी लग्न टाळावे. एएस-एसएस पॅटर्नच्या व्यक्तींनी एकमेकांशी कधीच लग्न करू नये. एएस-एए पॅटर्नचे व्यक्ती लग्न करू शकतात. यात येणाऱ्या पिढीत सिकलसेल असण्याची शक्यता अत्यंत कमी असते. तसेच एसएस-एए पॅटर्नचे व्यक्ती लग्न करू शकतात, पण ते त्यांच्या मनावर व स्वीकृतीवर अवलंबून आहे.शासनाकडून सिकलसेल रूग्णांना मोफत तपासणी, मोफत औषधोपचार, मोफत समुपदेशन व सर्व सुविधा पुरविल्या जातात. बाई गंगाबाई महिला रूग्णालय व जिल्हा सामान्य रूग्णालयात डे-केअर सेंटर स्थापित करण्यात आले आहे. तेथे सिकलसेल रूग्णांना भरती करून उपचार केले जातात. शिवाय टेलिमेडिसिनद्वारेसुद्धा रूग्णांना मदत व सुविधा पुरविली जात आहे.सपना खंडाईतजिल्हा कार्यक्रम समन्वयक, गोंदिया.
सिकलसेलग्रस्तांना मरणयातना
By admin | Updated: November 4, 2015 02:10 IST