शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
5
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
6
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
7
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
8
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
9
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
10
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
11
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
12
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

शहरात वाहतुकीचा बट्ट्याबोळ

By admin | Updated: December 27, 2014 22:54 IST

मुख्य मार्गावर अस्ताव्यस्त वाहतूक व ठिकठिकाणी पार्किंग केलेली वाहने दिसून येतात. गेल्या काही वर्षात शहरात वाहनांमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. प्रत्येकाजवळ वाहन

गोंदिया : मुख्य मार्गावर अस्ताव्यस्त वाहतूक व ठिकठिकाणी पार्किंग केलेली वाहने दिसून येतात. गेल्या काही वर्षात शहरात वाहनांमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. प्रत्येकाजवळ वाहन आल्यामुळे शहरात वाहतुकीच्या शिस्तीचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने अपघाताच्या संख्येतही वाढ झाल्याचे दिसून येते. शहरात वाहनांची संख्याही मोठया प्रमाणात वाढली आहे. शालेय विद्यार्थ्यांजवळही वाहने आली आहेत. परंतु त्या तुलनेत सुरक्षित वाहने चालविण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे सध्या शहरातील वाहतूक अतिशय जोखमीची ठरत आहे. बालाघाट ते पुढे आमगाव व गोरेगावकडे जाणारा मुख्य मार्ग हा शहरातून जातो. आमगावहून देवरी होत छत्तीसगड तर बालाघाट मध्यप्रदेश या दोन राज्यांना जोडणारा हा महत्वाचा मार्ग असल्याने या मार्गावर दिवसरात्र मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. बालाघाट मार्गावरील ग्राम नागरा ते आमगाव मार्गावरील फुलचूरपर्यंत तसा शहरी भाग व रहिवासी क्षेत्र असल्याने येथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते. असात खासगी प्रवासी वाहनांची अधिकची भर पडते. अशावेळी वाहतूक पोलीस मात्र बघ्यांची भूमिका घेताना दिसून येतात. शहरातील मरारटोली बस स्थानक, नेहरू चौक, जयस्तंभ चौक परिसर आदी ठिकाणी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा ठिय्या असतो. अतिशय बेशिस्तीत येथे वाहनांची गर्दी हमखास दिसून येते. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा चांगलाच त्रास होतो. येथील जसस्तंभ चौकात तर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कार्यालयासमोरच प्रवासी वाहनांचा गराडा असतो व त्यापासून अडथळा होत असूनही पोलीस मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. हप्ता वसुलीच्या माध्यमातून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून मोठी रक्कम नियमतिपणे मिळत असल्यामुळे पोलिसांची या वाहनांवर कारवाई करण्याची हिम्मत नसल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. नियोजनशून्य पोलीस व्यवस्थेमुळे नागरिकांना मात्र जोखिम स्वीकारून रस्त्याने ये-जा करावी लागते. उल्लेखनीय म्हणजे महिला व विद्यार्थी वर्गाला या अस्ताव्यस्त वाहतुकीचा फटका सहन करावा लागतो. याबाबत वाहतूक नियंत्रण शाखेच्या निरीक्षकांना विचारले असता ते मनुष्यबळाची कमतरता तसेच नगर परिषदेचे असहकार्य ही कारणे सागंतात. एकंदर केवळ आपल्या अंगावरील घोंगडे दुसऱ्याच्या अंगावर टाकणे एवढा एकच प्रकार विविध शासकीय विभागांकडून सुरू असून जनतेच्या सोयीचा मात्र सर्वांनाच सोईस्कररीत्या विसर पडल्याचे दिसून येते. शहरात वाढत्या अवैध वाहतुकीमुळे व्यापारी, सर्वसामान्य नागरिक, शालेय विद्यार्थी व महिलांना चांगलीच कसरत करीत रस्त्याने जावे लागते. याबाबत नागरिकांमध्ये चांगलाच रोष आहे. विद्यार्थी व सर्वसामान्यांना रस्त्याने चालणे कठीण झाले असून पोलिसांचा वाहतूक विभाग नेमका काय करतो, असा प्रश्न शहरवासीयांकडून उपस्थित केला जात आहे. वाहतूक विभागाची कार्यप्रणाली तशी नेहमीच वादग्रस्त आहे. वाहतूक पोलीस दुचाकी चालकांवर आपला जोर आजमावतात. गाडीसमोर आडवे होऊन गाड्यांची चाबी काढून घेण्या इतपत वाहतूक पोलीस धजावले आहेत. दुचाकीवाले दिसले की त्यांना कागदपत्र विचारून थेट चालान किंवा १०० ची नोट घेऊन सोडले जाते. सध्या हा प्रकार सर्वच चौकांत दिसून येत आहे. वाहतूक पोलीस चौका चौकांत दिसून येत असून या रस्ताने निघाल्यास प्रत्येक चौकात नियुक्त कर्मचारी चालान फाडताना हमखास दिसून येत आहे. त्यांचा हा पराक्रम मात्र फक्त दुचाकीवाल्यांसाठीच आहे. तर चारचाकी वाहनांच्या झेडी कुणीही जात नाही. बाजारात चालायला रस्त्यावर जागा राहत नाही. अशात एखादी दुचाकी रस्त्यावर दिसली की तिला उचलून नेले जाते. मात्र चारचाकी उभी पाहून वाहतूकीला त्रास होत असला तरिही कुणी त्याकडे लक्ष देताना दिसत नाही. यातून वाहतूकीचे नियम फक्त दुचाकीवाल्यांसाठीच आहेत काय असा सवाल आता शहरवासी करीत आहेत. काही दिवसांपूर्वी वाहतूक शाखेने दुकानदारांचे अतिक्रमण काढले. मात्र ही मोहिम आता थंडावली आहे. अशात चार दिन की चांदनी सारखाच हा प्रकार दिसून येतो. (शहर प्रतिनिधी)