तिरोडा उपजिल्हा रूग्णालय : २५ लाखांचे यंत्र लागणार देवानंद शहारे गोंदियाआरोग्य सेवेची अत्यावश्यक सेवेत गणना केली जाते. रूग्णांस वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध झाली नाही तर मृत्यू अटळ असते. जीवन वाचविण्यात आरोग्य सेवेचा सर्वाधिक वाटा असतो. अशातच अपघातांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे जखमी रूग्णांना वाचविण्यासाठी सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा तात्काळ पुरविणे गरजेचे असते. हीच बाब लक्षात घेवून तिरोडा उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम यांनी तेथील अपघात विभागाला अत्याधुनिक करण्याचे काम हाती घेतले व आता त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे दिसून येते.२५ लाख रूपयांच्या अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने तिरोडा उपजिल्हा रूग्णालयाच्या अपघात विभागाला अत्याधुनिक केले जात आहे. यापैकी १७ लाखांचे विविध यंत्र उपलब्ध झाले असून आठ लाखांचे यंत्र लवकरच रूग्णालयाला उपलब्ध होणार असल्याचे डॉ. मेश्राम यांनी सांगितले. सीएसआर फंडातून पाच खाटांचे अपघात कक्ष तयार करण्यात आले आहे. त्यात पल्स आॅक्सिमीटर, सॅक्शन मशीन, इंस्ट्रुमेंट ट्रॉली, इसीजी मशीन आदी यंत्रे उपलब्ध झाली आहेत. तर अदानी पावर महाराष्ट्र लि.कडून रूग्णालयास क्रॅशकार्ड उपलब्ध झाले आहे. क्रॅशकार्डमध्ये आॅक्सिजन सिलिंडर अटॅच असून इमर्जंसी मेडिसिन असते. तसेच लवकरच तीन यंत्रे उपजिल्हा रूग्णालयाला उपलब्ध होणार आहेत. यात मोबाईल एक्स-रे मशीन, रूग्णाच्या हृदयाचे कार्य सुरू करण्यासाठी डी-फेब्रीलेटर मशीन व मल्टीपॅरामीटरचा समावेश आहे. मल्टीपॅरामीटर यंत्रामुळे पल्स, इसीजी आदी जीवनरक्षक सूचना प्राप्त केल्या जातात. अशा अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने उपजिल्हा रूग्णालयात सज्ज होत असलेल्या अपघात विभागाचे लोकार्पण विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल २०१६ रोजी करण्यात येणार आहे.स्थानिक आ. विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते, सीओ दिलीप गावडे, डीएचओ डॉ. कळमकर व अदानी फाऊंडेशन यांच्याकडून जिल्हास्तरीय सभांमध्ये मिळालेल्या मार्गदर्शनामुळे या सोयी पुरविणे शक्य झाल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मेश्राम यांनी सांगितले.१ एप्रिल ते २९ फेब्रुवारीपर्यंतचे कार्यतिरोडा उपजिल्हा रूग्णालयात १ एप्रिल २०१५ ते २९ फेब्रुवारी २०१६ पर्यंत रूग्णांना अनेक आरोग्य सुविधा देण्यात आल्यात. या दरम्यान ४८ सिजर आॅपरेशन्स, ३१० डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, २५६ सामान्य प्रसूती, एक हजार ६२० रूग्णांच्या सोनोग्राफी, ५० रूग्णांवर हायड्रोसिल आॅपरेशन्स, एक हजार ७१४ एक्स-रे, १० मुलांवर हार्टसर्जनी आॅपरेशन्स, ७२ बालकांचे टुडी इको (हृदयरोग तपासणी), २५ लहान मुलांवर इतर सर्जरी करण्यात आल्यात. येथे टेलिमेडिसीन सेंटरमधून व्हिडिओकॉन्फ्रेसिंगद्वारे निदान व उपचार केले जाते. तसेच पोलिओ अभियानामध्येही या रूग्णालयाचे ९९ टक्के कार्य आहे. आणखी गरज एका रूग्णवाहिकेचीतिरोडा उपजिल्हा रूग्णालयात एका १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेची सोय असून आणखी एका रूग्णवाहिकेची गरज आहे. लोकप्रतिनिधींनी सहकार्य केले तर आणखी एक रूग्णवाहिका उपलब्ध होऊ शकेल. कुपोषित बालकांसाठी बाल उपचार केंद्र जानेवारी महिन्यापासून येथे कुपोषित बालकांसाठी १० बेडेड बाल उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. यात २६ बालकांवर उपचार करण्यात आले. सध्या सहा बालके येथे दाखल असून त्यांची सेवा केली जात आहे.प्रथम जिल्हास्तरीय पुरस्कारतिरोडा उपजिल्हा रूग्णालयाच्या कार्याची दखल घेऊन जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी जि.प. सभागृहात डॉ. आनंदीबाई जोशी प्रथम जिल्हास्तरीय पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप ५० हजार रूपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे आहे.
अपघात विभाग होतोय अत्याधुनिक
By admin | Updated: March 7, 2016 01:33 IST