शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
8
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
10
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
11
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
12
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
13
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
14
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
15
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
16
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
17
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
18
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
19
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
20
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती

बापू, तुम्हीच खरं सांगा...

By admin | Updated: July 19, 2015 01:29 IST

गोंदिया जिल्ह्यातील तीन पंचायत समित्यांमध्ये आणि जिल्हा परिषदेत झालेली काँग्रेस-भाजप युती सध्या जिल्ह्यातच नाही तर राज्यातील एक मोठी राजकीय घडामोड ठरली आहे.

गोंदिया जिल्ह्यातील तीन पंचायत समित्यांमध्ये आणि जिल्हा परिषदेत झालेली काँग्रेस-भाजप युती सध्या जिल्ह्यातच नाही तर राज्यातील एक मोठी राजकीय घडामोड ठरली आहे. राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी अतिशय गांभिर्याने घेतलेल्या या विषयात आता काय होणार, अशी उत्सुकता जशी सर्वत्र निर्माण झालेली आहे तशीच या घडामोडी घडवून आणण्यासाठी कोणी-कोणी पुढाकार घेतला याचाही शोध पक्षातर्फे घेतला जात आहे. त्यामुळे या विषयात पुढे काय व्हायचे ते होवो, तो काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा विषय आहे. पण ज्या काही घडामोडी या निमित्ताने घडत गेल्या त्यातील एकेक किस्से आता समोर येऊ लागले आहेत.आमगाव विधानसभा क्षेत्रातील विद्यमान भाजप आमदार संजय पुराम यांच्या पत्नी सविता पुराम आणि काँग्रेसचे माजी आमदार रामरतनबापू राऊत यांची कन्या सुषमा राऊत या दोघींनाही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अनपेक्षितपणे हार पत्करावी लागली. विशेष म्हणजे भाजपच्या सविता पुराम यांना काँग्रेसच्या उषा शहारे यांनी तर काँग्रेसच्या सुषमा राऊत यांना भाजपच्या सरिता रहांगडाले यांनी पराभवाची धूळ चाखली. या दोन्ही लढतींकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. या दोन्ही लक्षवेधी लढतींमध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्यातच लढाई झाली. गेली अडीच वर्षे जिल्हा परिषदेत सभापतीपदी विराजमान असणाऱ्या सविताताईंसाठी त्यांचे पतीदेव आ. संजय पुराम यांनी काँग्रेस उमेदवाराविरूद्ध निवडणूक प्रचारादरम्यान केलेली आगपाखड तेथील मतदारांच्या चांगलीच ध्यानीमनी आहे, एवढेच नाही, तर माजी आमदार रामरतनबापू राऊत यांनी आपल्या कन्येला निवडून देण्याचे आवाहन करताना भाजप उमेदवाराविरूद्ध केलेला प्रचारही मतदारराजा विसरलेला नाही. निवडणुकीतील ही लढाई व्यक्तीविरूद्धची निश्चितच नसते, ती लढाई दोन पक्षातील, त्यांच्या तत्त्वांविरूद्धची असते. मात्र दोन राष्ट्रीय पक्षांचे प्रतिनिधी म्हणून जेव्हा ते मतदारांपुढे जातात तेव्हा एकमेकांच्या पक्षांचे उणेदुणे बाहेर काढायला समोरचा प्रतिस्पर्धी मागेपुढे पाहात नाही. असे असताना प्रतिष्ठेच्या या लढाईत ज्या उमेदवाराने आपल्या कन्येला किंवा आपल्या पत्नीला पराभवाची धूळ चाखली त्या उमेदवाराला सत्तेसाठी ‘आपले’ म्हणवून घेताना त्या नेत्यांचे अंत:करण खरंच परवानगी देते का, याबाबत शंका आल्याशिवाय राहात नाही. ज्या रामरतनबापूंच्या घरात काँग्रेसच्या तत्वांची परंपरा आतापर्यंत जपण्यात आली, ज्या बापूंना सात महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीत ज्या पक्षाकडून पराभवाला तोंड द्यावे लागले त्याच पक्षासोबत हातमिळवणी करताना काहीच वाटले नसेल का? पंचायत समितीत असो किंवा जिल्हा परिषदेत असो, काँग्रेसच्या उमेदवारांनी भाजपशी घरोबा करावा यासाठी रामरतनबापूंनी स्वमर्जीने आपली ‘नाहरकत’ दिली असेल यावर विश्वास बसत नाही. कधीकधी एखादी लाट आली की त्यात अनेक गोष्टी वहावत जातात. पण रामरतनबापूंसारख्या मुरब्बी नेत्यानेही यात वहावत जावे, ही गोष्टी निश्चितच सर्वांना खटकणारी अशी आहे. या घडामोडींवर शेवटी एकच विचारावेसे वाटते, ‘बापू, तुम्हीच खरं सांगा, या घडामोडी तुमच्या मर्जीने झाल्या का?.. भाजपशी केलेला घरोबा तुम्हाला मान्य आहे का?’