राज्यात पाण्याची टंचाई आहे. यासाठी आता सांडपाण्याचा पुरेपूर वापर करणे गरजेचे आहे. यामुळे पाणीपट्टीत सवलत मिळणार, त्याचबरोबर पाण्याची बचतही होणार आहे. गोंदिया शहरातील नागरिकांवर पाण्याची आपत्ती ओढावते. त्यावेळी पाणी बचतीबाबत चर्चा होते. विविध उपाय सुचविले जातात. मात्र पाऊस सुरू झाला की, सगळेच मनसुबे वाहून जातात. आता मात्र आपल्याला धडा घेण्याची वेळ आली आहे. वाढती लोकसंख्या मात्र पाणी साठवण क्षमता वाढत नाही. यामुळे येत्या काळात उपलब्ध पाणीच आपल्याला पुरवून वापरावे लागणार आहे. त्यामुळे आतापासून सुरुवात करावी लागणार आहे. जि. प. किंवा नगर परिषदेकडून उपाययोजना होतील म्हणून गप्प बसून चालणार नाही. वैयक्तिक पातळीवरही आपण पाणी बचतीसाठी काळजी घ्यायला हवी.
.......
वेस्टेज पाण्यासाठी खड्डे खोदा
गोंदिया जिल्हा परिषदेंतर्गत असलेल्या ५४६ ग्रामपंचायतींपैकी काही ग्रामपंचायतींनी १० वर्षांपूर्वी हातपंप, विहीर यांच्या जवळ खड्डे खोदून याजवळील वापरण्यात आलेले पाणी सरळ बाजूला तयार केलेल्या खड्ड्यात जाण्यासाठी उपाययोजना केली होती. परंतु ते खड्डे आता बुजलेले आहेत. असेच खड्डे झाकणासह तयार करून वाया जाणारे पाणी खड्ड्यात टाकून जमिनीत मुरविण्याची गरज आहे.
....
गोंदियाकरांनो लक्षात ठेवा...
खरे तर आपण पाण्याशी नीट वागत नाही. अमर्याद वाढणारी लोकसंख्या आणि पाण्याच्या बेबंद वापराची सवय यामुळे पाण्याची टंचाई सर्वांनाच जाणवू लागली आहे. गोंदियाकरांना आता पाणी बचतीची सवय लावण्याची वेळ आली आहे. या सवयी बदलण्यासाठी आपण छोटे-छोटे उपाय करू शकतो.
...
आंघोळ
बादलीत पाणी घेऊन केल्यास: २० लिटर
शॉवरखाली केल्यास :१०० लिटर
......
दाढी
नळ सोडून दाढी केल्यास : १० लिटर
मग घेऊन केल्यास: १ लिटर
......
ब्रश
नळ सोडून ब्रश केल्यास : १० लिटर
मग घेऊन ब्रश केल्यास: १ लिटर
........
कपडे
नळाखाली केल्यास : ११६ लिटर
बादलीचा वापर केल्यास: ३६ लिटर
......
मोटार
पाईप वापरल्यास : १०० लिटर
बादलीचा वापर केल्यास : १८ लिटर
.....
हात धुण्यासाठी
नळाखाली : १० लिटर
मग घेऊन : अर्धा लिटर
.....
शौचविधी
फ्लश केल्यास : १० लिटर
बादलीचा वापर केल्यास - ६ लिटर