शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

खासदारांच्या दत्तक गावाला सिंचनाची आस

By admin | Updated: December 27, 2014 22:52 IST

गोरेगाव तालुक्यातील अवघ्या ३८०० लोकवस्तीचे पाथरी म्हणजे पारंपरिक ग्रामीण संस्कृतीने नटलेले एक खेडेगाव. शेती आणि मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या तेथील गावकऱ्यांनी कधी विकासाचे

पटेलांचा पुढाकार : गावकऱ्यांना हवे शेतीला पाणी, हाताला काम अन् घामाला दाममनोज ताजने - गोंदियागोरेगाव तालुक्यातील अवघ्या ३८०० लोकवस्तीचे पाथरी म्हणजे पारंपरिक ग्रामीण संस्कृतीने नटलेले एक खेडेगाव. शेती आणि मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या तेथील गावकऱ्यांनी कधी विकासाचे फार मोठे स्वप्न पाहीले नाही. मुलभूत सुविधा मिळाल्या तरी पुरेसे एवढीच या गावातील लोकांची इच्छा होती, पण माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी हे गाव दत्तक घेतले आणि येथील गावकऱ्यांनाही विकासाची स्वप्नं पडू लागली. ‘लोकमत’ने या गावात जाऊन तेथील विविध स्तरातील लोकांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी विविध अपेक्षा व्यक्त केल्या.पाथरी गावात सर्वच समाजाचे लोक राहतात. पण गावातील सामाजिक पार्श्वभूमी अतिशय चांगली आहे. त्यांच्यात कधीही धार्मिक, जातीय तेढ निर्माण झालेली नाही. गावातील कोणतेही भांडण-तंटे गावातच मिटविण्याचा येथील प्रघात आहे. बहुतांश लोक शेतीवर उपजीविका करणारे आहेत. पण जवळच असलेल्या कटंगी प्रकल्पात या गावातील १५० ते २०० लोकांची शेतजमीन गेली. त्यामुळे अनेकांना उपजीविकेसाठी गाव सोडून जावे लागले. कटंगी प्रकल्पासाठी शेतजमिनी देऊनही त्या प्रकल्पाचे पाणी या गावकऱ्यांना मिळू शकत नाही ही येथील गावकऱ्यांची सर्वात मोठी खंत आहे. कारण हे गाव आणि लगतच्या शेतजमिनी उंच आहे तर प्रकल्पाचे स्थळ खालच्या भागाला आहे. त्यामुळे गावात थेट पाणी पोहोचू शकत नाही. मात्र लिफ्ट करून (उपसा सिंचन योजना) प्रकल्पाचे पाणी शेताला द्यावे अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे. शेतीला पाण्याची सोय झाली तर पाथरीतील शेतकरी रबी हंगामातही धानाचे पिक घेऊन संपन्न होतील, अशी त्यांना आशा आहे. प्रकल्पाचे पाणी शेतीला मिळत नसेल तर शेतकऱ्यांच्या शेतात शासनाने बोर करून द्यावी अशी अपेक्षा शिवाजी सोनेवाने यांनी व्यक्त केली.या गावात पिण्याच्या पाण्याची समस्या काही प्रमाणात आहे. गावात जलस्वराज्य प्रकल्पातून आधी एक पाण्याची टाकी तयार केली होती. पण ती अपुरी पडत असल्याने ७४ लाख रुपये खर्चुन नवीन टाकी तयार करण्यात आली. मात्र त्या टाकीला साजेशी पाईपलाईन टाकण्यात आलेली नाही. त्यामुळे जुन्याच पाईपलाईनवरून काम भागविले जात आहे. नवीन पाईपलाईन टाकल्यास योग्य प्रमाणात पाणी मिळण्यास मदत होईल, असे माजी उपसरपंच भरत ठाकूर यांनी सांगितले. गावातील काही हातपंप चालू तर काही बंद स्थितीत आहेत. विशेष म्हणजे गावातील काही विहिरी आणि त्यावरील हातपंपाचे पाणी खारे आहे. ते पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल आरोग्य विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी सर्वस्वी नळ योजनेच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवीपर्यंतच्या वर्गांची सोय आहे. पुढील शिक्षणासाठी १ किलोमीटरवर असलेल्या कुऱ्हाडी गावात जावे लागते. प्राथमिक आरोग्य केंद्रही कुऱ्हाडीत आहे. एक किलोमीटरचे अंतर पार करताना गावकऱ्यांना कोणतीही अडचण नाही. मात्र गावातील रस्ते, नाल्यांची दुरूस्ती करण्यासाठी बराच वाव आहे. तुटफूट झालेले, उखडलेले रस्ते दुरूस्त केल्यास आणि नाल्यांची योग्य बांधणे करून सांडपाण्याचा निचरा योग्य पद्धतीने केल्यास या गावाच्या सौंदर्यात अधिक भर पडेल. प्रफुल्ल पटेलांसारख्या मोठ्या नेत्याने हे गाव दत्तक घेतल्यामुळे गावकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.