शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
4
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
5
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
6
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
7
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
8
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
9
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
10
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
11
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
12
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
13
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
14
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
15
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
16
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
17
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
18
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
19
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
20
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर

अदानीने राबविले चिखली येथे स्वच्छ सुंदर भारत अभियान

By admin | Updated: October 11, 2015 01:02 IST

अदानी उद्योग समूहाच्या सामाजिक दायित्व पार पाडणाऱ्या अदानी फाऊंडेशन या शाखेच्या वतीने तिरोडा परिसरातील ग्रामीण विभागाच्या विकासाकरिता विविध उपक्रम राबविले जात आहेत.

गोंदिया : अदानी उद्योग समूहाच्या सामाजिक दायित्व पार पाडणाऱ्या अदानी फाऊंडेशन या शाखेच्या वतीने तिरोडा परिसरातील ग्रामीण विभागाच्या विकासाकरिता विविध उपक्रम राबविले जात आहेत. अदानी फाऊंडेशन सोबतच अदानी पॉवर सुद्धा सामाजिक कार्यात रुची ठेवीत सुटीच्या दिवशी श्रमदान करुन गाव स्वच्छता मोहीम राबवून गावात स्वच्छतेविषयी जनजागृती करीत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ सुंदर भारत अभियानाला आॅक्टोबर २०१४ मध्ये सुरुवात केली. या अभियानाचा मुख्य उद्देश सन २०१९ पर्यंत संपूर्ण भारत स्वच्छ करायचा आहे. या उद्देशाची पूर्तता तेव्हाच साध्य होईल जेव्हा गावातील लोक या कार्याकरिता जागृत होऊन हातभार लावीत गाव स्वच्छ ठेवतील.४ आॅक्टोबर रोज रविवारला सकाळी ७.२० वाजता अदानी पॉवरच्या मानव संसाधन विभागाने सामाजिक कार्याप्रती जाण ठेवून चिखली गावातील मुख्य रस्त्याचे स्वच्छता केली. यावेळी या विभागाचे आ. विजय रहांगडाले, अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेड तिरोडाचे मुख्य सी.पी. साहू, समीर मित्रा, बी.के. पांडे, संजीव मोहंती, अदानी फाऊंडेशन तिरोडाचे प्रकल्प समन्वयक सुबोध सिंग, सरपंच कैलास पटले, उपसरपंच दिलीप क्षीरसागर, कुलपत रहांगडाले व गावातील १०० च्यावर तरुण मंडळीनी हातात झाडू घेऊन संपूर्ण गावातील मुख्य रस्ते स्वच्छ केले.चिखली गावाच्या मुख्य गेटपासून आ. विजय रहांगडाले, अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेड तिरोडाचे स्टेशनचे प्रमुख सी.पी. शाहू यांनी हातात झाडू घेऊन कार्यक्रमाचीे सुरुवात केली.रस्ते स्वच्छ केल्यानंतर गावात ग्रामपंचायतीच्या पटांगणावर सभा घेण्यात आली.यावेळी या सभेला संबोधित करतानी सी.पी. शाहू यांनी गावात दारूबंदी झाल्याचा आनंद व्यक्त केला. या परिसरातील युवकांनी खर्रा, गुटखा बंद करावे असे आवाहन करीत आपल्या गावात स्वच्छता राखण्यास सांगितले. जर आपल्या गावात स्वच्छता राहिली तर आपले आरोग्य सुदृढ होईल, आर्थिक स्थिती सबळ होईल, आपले गाव समृद्ध होईल असे मत व्यक्त केले.सरपंच कैलास पटले यांनी अदानीने हे कार्यक्रम राबवून आमचे मनोधर्य वाढविले आहे. याबद्दल त्याचे आम्ही मनापासून आभार मानत असून आमचे गाव एक मॉडेल गाव होईल. राळेगण सिद्धी, हिवरे बाजार यांचे आदर्श लक्षात घेऊन आमचे गाव आदर्श करू असे आश्वासन देऊन कार्यक्रमाची सांगता केली. यात गावकऱ्यांनीही सहभाग घेतला. (तालुका प्रतिनिधी)