शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

१४ कोटींचा हिशेब गुलदस्त्यात

By admin | Updated: August 3, 2015 01:30 IST

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविताना शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला लोकसंख्येच्या आधारावर बक्षिसे वाटली.

तंटामुक्त मोहीम : ग्रामविकास अधिकाऱ्यांना मागितली होती माहितीगोंदिया : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविताना शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला लोकसंख्येच्या आधारावर बक्षिसे वाटली. जिल्ह्यातील ५५६ गावांना पुरस्कारापोटी १४ कोटी ७ लाख २५ हजार रुपये देण्यात आले. मात्र नियोजन पत्रिकेला डावलून खर्च करण्यात आले. शासनाने या पुरस्कराचा हिशेब मागितला होता. परंतु पुरस्कारप्राप्त अनेक गावांनी पुरस्कार रकमेचा हिशेब शासनाला दिलाच नाही.जिल्ह्यात या मोहिमेला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले. अवघ्या चार वर्षात जिल्हा तंटामुक्त झाला. पुरस्कारप्राप्त गावांनी बक्षीसाची रक्कम शासन निर्णयानुसार खर्च केल्या नसल्याचे दिसून येते. शासन निर्णयाप्रमाणे तंटामुक्तीच्या बक्षीस रकमेतून नवीन बांधकाम करता येत नाही असे स्पष्ट नमूद असताना देखील अनेक ग्रामपंचायतींनी नवीन ओटा बांधकाम व विहिरीच्या तोंडीचे बांधकाम केले. इतर कामासाठी असलेले पैसेही प्रचार प्रसिद्धीच्या नावाने खर्च करण्यात आले. विनियोग कार्यक्रमासाठी येणारा खर्च प्रचार प्रसिद्धीच्या रकमेतून करण्यात यावा असे स्पष्ट आदेश असताना अनेक ग्रामपंचायतींनी विनियोग कार्यक्रमासाठी खर्च केलेले पैसे पुरस्कार राशीतून खर्च केले. शासनाने साहित्य खरेदीसाठी दरवर्षी एक ते दोन हजार रुपये प्रत्येक ग्रामपंचायतीला दिले. तरी देखील या पुरस्कार राशीतून स्टेशनरी घेतल्याचे दाखविण्यात आले. खंड विकास अधिकाऱ्यांनी या विनियोगाच्या अहवालाचा अभ्यास न करताच तो अहवाल सरळ शासनाकडे पाठविला. गोंदिया तालुक्यातील एका ग्रामपंचायतने प्रचार प्रसिद्धीवर ३७ हजार ४०० रुपये खर्च केले. मात्र हे पैसे प्रचार प्रसिद्ध म्हणजे नेमकी कशासाठी हे नमूद केले नाही. सोबतच या पुरस्कार रकमेतून तंटामुक्त समितीचे फलक तयार करण्यावर वेगळे १५ हजार रुपये, बॅनर तयार करण्यासाठी १२०० रुपये, सुचना बोर्ड व म्हणी लिहिण्यासाठी १४ हजार ४०० रुपये खर्च केले. हा खर्च प्रचार प्रसिद्धीतूनच व्हायला पाहिजे होता. मात्र त्या ग्रामपंचायतीने चुकीच्या पद्धतीने पुरस्कार रकमेचा विनियोग केला आहे. लेखन सामग्रीसाठी दरवर्षी पैसे देण्यात आले. तरी ग्रामपंचायतीने रेकार्ड बायडिंगसाठी १६ हजार रुपये, झेरॉक्ससाठी ३०० रुपये खर्च केले. खर्च लेखन सामुग्रीच्या पैशातून खर्च करणे गरजेचे होते. या पुरस्काराच्या रकमेचा विनियोग करताना जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत प्रचार प्रसिद्धीवर पैसे खर्च केल्याचे दाखविले. मात्र प्रचार प्रसिद्धी कसली हा प्रश्न शासनाला पडला आहे. प्रचार प्रसिद्धीत मोडणारे फलक, बॅनर कार्यक्रम हे वेगळ्या निधीतुन करण्यात आले. तर प्रचार प्रसिद्धीचा पैसा गेला याचा शोध घेणे जरूरी आहे. शासन ग्लोबल वार्मिंगवर नियंत्रणासाठी ग्राम पर्यावरण संतुलीत योजना अंमलात आणली. या योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च करून वृक्षारोपण करण्याचे काम सुरू आहे. तंटामुक्त मोहिमेच्या रकमेतून वृक्षारोपण करता येईल असे शासनाने नियोजन पत्रीकेत नमूद केल्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतींनी वृक्षारोपण केल्याचे दाखविले. मात्र पर्यावरण संतुलित योजनेंतर्गत लावलेले रोपटे व तंटामुक्त बक्षीसाच्या रकमेतून लावलेले रोपटे वेगवेगळे नाहीत ते एकच असल्याचे अनेक ग्रामपंचायतींकडून लक्षात येत आहेत. शासनाने गावाचा विकास करण्यासाठी लाखो रुपये प्रत्येक गावाला वाटले. मात्र नियोजन पत्रीकेचा अभ्यास न करताच पैशाचा वापर केला. शासनाने पुरस्काराच्या विनियोगाचा हिशेब मागितला होता. परंतु अनेक गावांनी पुरस्कार रकमेचा हिशेबच दिला नाही. (तालुका प्रतिनिधी)