शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
2
साप्ताहिक राशीभविष्य: राहु-केतु-शुक्र गोचर, शनि जयंती; ६ राशींना लाभ, ६ राशींना तापदायक काळ!
3
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
4
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
5
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
6
खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा
7
ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण
8
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
9
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
10
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
11
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
12
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
13
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
14
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
15
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
16
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
17
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
18
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
19
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
20
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता

१० टक्के लोक हृदयरोगाच्या कक्षेत

By admin | Updated: September 24, 2016 01:40 IST

सध्या वाढलेला तणाव, कमी होत असलेले शारीरिक श्रम, आहारातील अनियमितता, वाढलेले वजन, व्यसनाधिनता, मधुमेह, उच्च रक्तदाब यामुळे हृदयरोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

डॉ.बाहेकर यांची माहिती : पाच मधुमेहींपैकी एकाला ग्रासतो हृदयरोगनरेश रहिले  गोंदियासध्या वाढलेला तणाव, कमी होत असलेले शारीरिक श्रम, आहारातील अनियमितता, वाढलेले वजन, व्यसनाधिनता, मधुमेह, उच्च रक्तदाब यामुळे हृदयरोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. भारतात सध्या ७ कोटी लोकांना हृदयरोग आहे. बदललेल्या जीवनशैलीमुळे आता समाजातील १० टक्के लोक हृदयरोगाच्या कक्षेत आले आहेत. त्यामुळे वेळीच योग्य ती काळजी घेऊन हृदयरोगाला दूर ठेवण्याचा सल्ला हृदयरोगतज्ज्ञांनी दिला आहे.३० वर्ष वयोगटापेक्षा अधिक वयाच्या लोकांना हृदयरोग होत आहे. मधुमेहाचे रूग्ण असलेल्या पाच व्यक्तींपैकी एकाला हृदयरोग तर सर्वसामान्यांत १० टक्के लोकांना हृदयरोग असल्याची माहिती गोंदियातील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. दीपक बाहेकर यांनी दिली. मृत्यू पावण्याच्या कारणांमध्ये अपघातामुळे सर्वाधिक लोक दगावतात. त्यानंतर हृदयविकाराचा दुसरा क्रमांक लागतो. हृदयविकार नियंत्रणात आणता येतो. अनुवांशिकतेमुळेही हृदयरोग होतो. महिलांपेक्षा पुरूषांमध्ये हृदयरोग होण्याचे प्रमाण अधिक आहे. महिलांपेक्षा पाच पटीने जास्त पुरूषांना हृदयरोग होतो. ग्रामीण भागातील १५ टक्के लोकांना तर शहरी भागातील २० टक्के लोकांना हृदयरोग असल्याचे वैद्यकीय पाहणीत आढळून आले आहे. वाढलेल्या व्यसनांमुळेही कमी वयातच या आजाराला बळी पडावे लागत आहे. व्यक्तीचे बीएमआय २३ पेक्षा कमी असावे अन्यथा त्या व्यक्तीला हृदयरोग होऊ शकतो. हृदयरोग असणाऱ्या व्यक्तीने तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार जीवनमानात योग्य तो बदल केल्यास ७० टक्के हृदयरोग कमी होतो असे डॉ.बाहेकर म्हणाले.ध्यान-योगा ठरतो फायदेशिरसुरुवातीपासूनच ध्यान-धारणा व योगा-प्राणायाम करणाऱ्या व्यक्तीला हृदयरोग होत नाही. ध्यान मनावर नियंत्रण ठेवते तर योगा शरीरावर नियंत्रण ठेवते. यात जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडून प्रशिक्षण घेवून ध्यान-योगाचा आपल्या जीवनात समावेश केल्यास हृदयरोग होणे टाळले जावू शकते. रूग्णाने ध्यान-योगा पद्धतीचा अंतर्भाव आपल्या जीवनपद्धतीत केला तर हृदयरोगावर नियंत्रण मिळविले जावू शकते.जिल्हा सामान्य रुग्णालयात हृदयरोग तज्ज्ञ नाहीत१४ लाख लोकसंख्येसाठी असलेल्या गोंदियाच्या केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात हृदयरोग तज्ज्ञ नाही. त्यामुळे या रूग्णालयात हृदयरोग तज्ज्ञांची सेवा घेण्यासाठी खासगी डॉक्टरांची मदत घ्यावी लागते. वैद्यकीय महाविद्यालयासाठी हृदयरोगतज्ज्ञ आलेत परंतु ते सेवाच देत नसल्याची ओरड आहे.