दिलीप चव्हाण ल्ल गोरेगावशिक्षणाचे बाळकडू पाजणाऱ्या आणि उद्याचे नागरिक घडविणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांची गोरेगाव तालुक्यात वाताहत होत आहे. ज्यांचे भविष्य उज्वल करायचे त्या विद्यार्थ्यांचे वर्तमानच इथे बिघडले आहे. त्यांना शाळेत बसवायचे कसे? असा प्रश्न शिक्षण विभागाला पडला आहे.तालुक्यातील १०९ शाळा पावसाळ्यात गळत असून स्लॅबमधून अविरत पाणी झिरपते. विद्यार्थी ओल्या जागेवर बसून ज्ञानार्जन करतात. हा सर्व प्रकार केविलवाणा असून कंत्राटदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.तालुक्यात खासगी अनुदानित शाळांचे एकछत्री वर्चस्व आहे. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मुलभूत सोर्इंच्या नावावर प्रलोभन देवून विद्यार्थी व पालकांना आकर्षित करण्यात येते. मात्र येथील इमारती पडक्या अवस्थेत आहेत. काही इमारती मोठ्या प्रमाणावर जर्जर झाल्याचे चित्र आहे. अनेक शाळांमध्ये कौलारू इमारतीत बसून विद्यार्थी पावसाचे तुषार अंगाव झेलतात तर काही ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना कमी जागेवर दाटीवाटीने बसून शिक्षणाचे धडे घेत आहेत.विशेष म्हणजे खासगी विनाअनुदानित शाळांकडे लक्ष देण्यासाठी प्रशासनाचे लक्ष नाही. खासगी शाळा अनुदानापलिकडे शाळांच्या मुलभूत सोयींकडे विशेष लक्ष देत नाहीत. शाळा परिक्षणापुरत्या शाळा अद्यावत करुन शासनाची दिशाभूल करण्यात येते. शाळेच्या आवारात साचलेले पाणी व पाण्याचे चिखलात झालेले रुपांतर विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ ठरत आहे. मात्र याकडे पालक किंवा शिक्षक कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. शिक्षणावर शासन कोट्यवधीचा खर्च करीत असताना जिल्हा शिक्षण विभाग मात्र याबाबत किती गंभीर आहे याचा प्रत्यय शाळेची दुरवस्था पाहून आल्याशिवाय राहात नाही. १ ते ४ वर्ग असणाऱ्या शाळेतील विद्यार्थी पाणी गळतीमुळे एकाच वर्गात बसून ज्ञानार्जन करतात. विद्यार्थ्यांची गैरसोय यावर्षी दूर होईल का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.पाऊस आणि सुटीपावसाळ्यात पावसाची रिपरिप सुरू झाली तर शालेय प्रशासनाकडे विद्यार्थ्यांना सुटी देण्यापलिकडे पर्याय नसतो. विद्यार्थ्यांना बसवायचे कुठे हा प्रश्न शिक्षण विभागाला पावसाळ्यात सतावत राहतो. पुढे पर्याय नसल्याने विद्यार्थ्यांना सुटी द्यावी लागते. मात्र यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. जर्जर शाळा, लक्ष कोणाचे ?तालुक्यात शासकीय व खासगी शाळांचा तोरा मोठा आहे. जिल्हा परिषद शाळा असो किंवा खासगी शाळा, शाळेत प्रवेशाच्या वेळी विद्यार्थी व पालकांना सोई-सुविधेसाठी दिले जाणारे आमिष किती पाळले जाते, हा संशोधनाचा विषय आहे.
१०९ शाळांना पाणी गळतीचा फटका
By admin | Updated: July 21, 2015 01:13 IST