शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

सुभाष घई, गुलजार, मनोज वाजपेयी यांची ‘इफ्फी’ला उपस्थिती

By admin | Updated: November 16, 2014 01:29 IST

तयारी अंतिम टप्प्यात : निर्माते, दिग्दर्शक, संगीतकारांचाही सहभाग

पणजी : ४५व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. इफ्फीत खास सिने कलाकारांची उपस्थिती लागावी यासाठी महोत्सव संचालनालयाने अनेक सिनेस्टारना आमंत्रित केले आहे. यातील काही कलाकारांनी इफ्फीदरम्यान येण्याचे मान्य केले आहे, अशी माहिती गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष दामोदर नाईक यांनी दिली. यात शेखर कपूर, गुलजार, मनोज वाजपेयी, पवन कालिया, मुनमून सेन, पाउली दाम, सुभाष घई, सतीश कौशिक, विनय पाठक, रूपा गांगुली, रजत कपूर, अनंत महादेवन, कौशिक गांगुली, रसूल पुकुट्टी, श्याम बेनेगल, टिनू आनंद, अर्पिता चटर्जी, राजू हिराणी, ध्रितीमन चटर्जी, जयराम, विधू विनोद चोप्रा, अभिजीत जोशी, गोविंद निहलानी या कलाकारांचा समावेश आहे. तसेच मराठी चित्रपटसृष्टीचे कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक, संगीतकारांचाही यात सहभाग असणार आहे. महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाला सुपरस्टार अमिताभ बच्चन, माहिती व प्रसारण खात्याचे मंत्री अरुण जेटली, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माहिती व प्रसारण राज्यमंत्री राजवर्धन सिंग राठोड उपस्थित असतील. महोत्सवाचे सूत्रसंचालन कलाकार अनुपम खेर व अभिनेत्री रविना टंडन करणार आहेत. श्रद्धांजली विभागात सर रिचर्ड अ‍ॅटनबरो यांचा ‘गांधी’ हा चित्रपट दाखविण्यात येईल. भारतीय पॅनोरमा विभागात मराठी चित्रपट डॉ. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘एलिझाबेथ एकादशी’ दाखविण्यात येईल. तर चीनचे सिने निर्माते वाँग कार वाय यांना यंदाच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती नाईक यांनी दिली. राजधानीत शासकीय इमारती, रस्ते, कला अकादमी, मांडवी पूल यांच्या सुशोभीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे. प्रतिनिधी संख्येनेही यंदा १२ हजाराचा आकडा पार केला आहे. यंदा इफ्फीसाठी साधारण १४ हजारपर्यंत प्रतिनिधी नोंदणी करण्याचे लक्ष्य गोवा मनोरंजन संस्थेने ठेवले होते. इफ्फी सुरू होण्यासाठी अजून चार दिवस शिल्लक असल्याने हा आकडा चौदा हजारापर्यंत पोहोचेल, असे नाईक यांनी सांगितले. कांपाल फुटबॉल मैदानावर उभारण्यात येणाऱ्या स्क्रिनवर देवदास, रब ने बना दी जोडी, ताल अशा तऱ्हेचे निवडक चित्रपट दाखविले जाणार आहेत. कोकणी विभागातून पाखलो, निरागस या लघुचित्रपटांची निवड झाली आहे. वर्ल्ड सिनेमा विभागात दाखविण्यात येणारे चित्रपट हे प्रीमियर असणार असल्याची माहिती नाईक यांनी दिली. या वेळी महोत्सव संचालनालयाचे संचालक शंकर मोहन, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, मुख्य सचिव, आमदार किरण कांदोळकर, सीईओ राजेंद्र सातार्डेकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)