शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
4
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
5
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
6
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
7
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
8
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
9
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
10
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
11
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
12
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
13
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
14
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
15
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
16
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
17
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
18
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
19
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
20
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले

मिकी पाशेको जाणार गजांआड

By admin | Updated: March 31, 2015 02:02 IST

मडगाव : वीज अभियंता कपिल नाटेकर मारहाण प्रकरणात दोषी ठरलेले ग्रामीण विकासमंत्री मिकी पाशेको यांच्या सहा महिन्यांच्या

मडगाव : वीज अभियंता कपिल नाटेकर मारहाण प्रकरणात दोषी ठरलेले ग्रामीण विकासमंत्री मिकी पाशेको यांच्या सहा महिन्यांच्या कैदेच्या शिक्षेवर मुंबई उच्च न्यायालयाने जी मोहर उठविली होती, त्यावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. उच्च न्यायालयाच्या आदेशाला पाशेको यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. फकीर मोहम्मद इब्राहीम कलिफुल्ला व न्या. शिवा कीर्ती सिंग यांनी हा आव्हान अर्ज फेटाळून लावताना पाशेको यांना शिक्षा भोगण्याचा आदेश दिला. यासंबंधी पाशेको यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांच्या भ्रमणध्वनीवर फोन केला; मात्र त्यांचा मोबाईल स्वीच आॅफ असल्याने संपर्क होऊ शकला नाही.या निर्णयाने पाशेको यांच्या राजकीय कारकिर्दीला पुन्हा एकदा सुरुंग लागला आहे. आता सर्वोच्च न्यायालयानेही या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्याने पुढचे पावणेसहा महिने त्यांना तुरुंगात काढावे लागतील. यासाठी एका आठवड्यात त्यांना तुरुंगाधिकाऱ्यांसमोर शरण यावे लागेल किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर पुनर्विचार याचिका दाखल करावी लागणार आहे. अशी याचिका दाखल केल्यास ज्या न्यायाधीशांनी हा निवाडा दिला आहे, त्यांच्यासमोरच ही याचिका परत येणार असल्याने पाशेकोंसाठी ही परिस्थिती अडचणीचीच ठरणार आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, सोमवारी दुपारी या आव्हान अर्जावरील सुनावणी न्या. कलिफुल्ला व न्या. सिंग यांनी केवळ २५ मिनिटांत निकाली काढली. पाशेको यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील गुरुमूर्ती यांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, यापूर्वी तीन न्यायालयांनी पाशेको यांच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्याने या आव्हान अर्जात ठोस मुद्दा नाही, असा निष्कर्ष न्यायपीठाने काढून हा अर्ज निकाली काढला.पाशेको हे २00६ साली प्रतापसिंह राणे यांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री असताना त्यांच्याकडून हा प्रमाद घडला होता. माजोर्डा भागात वारंवार वीज खंडित होते, अशी तक्रार आल्याने त्या वेळी वेर्णा वीज केंद्रात कनिष्ठ अभियंते (पान ८ वर)