पणजी : मावळत्या वर्षाची सायंकाळ व रात्र गोव्यात मोठ्या जल्लोषात साजरी झाली. राज्यात आलेल्या देशी-विदेशी पर्यटकांनी राज्यातील विविध किनाऱ्यांवर जल्लोष करून नववर्षाचे स्वागत केले. संपूर्ण राज्यालाच छावणीचे स्वरूप यावे, अशा चोख सुरक्षा व्यवस्थेत मावळत्या वर्षाचा दिवस व रात्र गेली. पोलिसांनी वाहतूक व्यवस्थितरीत्या हाताळली. त्यामुळे संभाव्य कोंडीपासून वाहनचालकांना दिलासा मिळाला. थर्टी फर्स्टला एरव्ही होणारी वाहतूक कोंडी पोलिसांनी गुरुवारी केलेल्या योग्य नियोजनामुळे टळली. उत्तर गोव्यात किनारी भागांमध्ये कोंडीचे किरकोळ प्रकार वगळता वाहतूक सुरळीत झाल्याचे दिसून आले. राजधानी पणजीत नाक्यानाक्यांवर नौदलाच्या जवानांनी वाहतूक व्यवस्था हाताळली. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर आधीपासून सशस्त्र पोलिसांसह दहशतवादविरोधी विभाग आणि राखीव पोलिसांना सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. अतिरेकी हल्ल्यांची शक्यता लक्षात घेऊन पर्यटनस्थळांजवळ सशस्त्र जवान तैनात करण्यात आले होते. किनारी भागात आयआरबीचे पोलीस तैनात करण्यात आले होते. अधिक गजबजलेल्या कळंगुट, हणजूण, कोलवा व पाळोळे या किनाऱ्यांवर सशस्त्र पोलीस ठेवण्यात आले होते. सुमारे अडीच हजार पोलिसांना सुरक्षेसाठी उतरविण्यात आले होते. १०० किनारी पोलीस, ३५ पर्यटन विभागाचे पोलीस, ७० दहशतवादविरोधी पोलीस, आयआरबीचे जवान आणि राखीव दलाचे जवान बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. शिवाय पोलीस स्थानकांना महत्त्वाच्या ठिकाणी (पान ७ वर)
जल्लोष... २0१६चा!
By admin | Updated: January 1, 2016 02:23 IST