शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

तिसवाडीत बाबूश हरले आणि जिंकलेही...

By admin | Updated: March 12, 2017 02:26 IST

पणजी : तिसवाडी तालुक्यातील पणजी या महत्त्वाच्या मतदारसंघात बाबूश मोन्सेरात यांचा पराभव झाला. भाजपसाठी ते यश आहे;

पणजी : तिसवाडी तालुक्यातील पणजी या महत्त्वाच्या मतदारसंघात बाबूश मोन्सेरात यांचा पराभव झाला. भाजपसाठी ते यश आहे; पण तिसवाडीतील अन्य मतदारसंघांमध्ये बाबूश फॅक्टर महत्त्वाचा ठरला आहे. बाबूशचे तीन उमेदवार काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. कुंभारजुवेत पांडुरंग मडकईकर यांच्यामुळे गेल्या पंचवीस वर्षांच्या कारकिर्दीत आता प्रथमच भाजपचा विजय झाला.सांताक्रुझ मतदारसंघात बाबूशने टोनी फर्नांडिस यांना काँग्रेसच्या तिकिटावर उभे केले होते. टोनी हे कमकुवत उमेदवार होते; पण काँग्रेसच्या तिकिटामुळे टोनी विजयी झाले. बाबूश हे सांताक्रुझचे माजी आमदार आहेत. आपण बाबूशसोबत आहोत, असे विधान मतमोजणी पूर्ण होताच लगेच टोनी फर्नांडिस यांनी केले. बाबूशच्या पत्नी जेनिफर मोन्सेरात यांचा ताळगावमध्ये प्रभाव नव्हता. जेनिफर पराभूत होतात, अशी चर्चा मतदानानंतरही सुरू होती. मात्र, बाबूश यांचा स्वत:चा ताळगाव मतदारसंघावर प्रभाव आहे. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा भाजपचे दत्तप्रसाद नाईक यांचा ताळगावमध्ये पराभव झाला. जर ताळगावमध्येही बाबूशच्या पत्नीचा पराभव झाला असता तर मोन्सेरात यांच्यासाठी तो फारच मोठा धक्का बसला असता. सांतआंद्रे मतदारसंघात फ्रान्सिस सिल्वेरा हे विजयी झाले. मोन्सेरात यांनी सांतआंद्रेमध्ये सिल्वेरा यांनाच तिकीट द्यावे, अशी मागणी काँग्रेसकडे केली होती. बाबूशचे काँग्रेससोबत जमले नाही तर काँग्रेसचे तिकीट घेणार नाही, असे सिल्वेरा हे प्रारंभी लुईझिन फालेरो यांना सांगत होते. ताळगाव, सांताक्रुझ व सांतआंद्रे हे तीन मतदारसंघ काँग्रेसमधील बाबूश समर्थकांनी जिंकले. सांताक्रुझ हा मतदारसंघ बाबूशसाठी बोनस ठरला. तिथे भाजपनेही बऱ्यापैकी मते प्राप्त केली. पणजीत बाबूश मोन्सेरात स्वत:चा विजय घडवून आणू शकले नाहीत. आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर यांनी बाबूशला पराभवाचे पाणी पाजले. १९९४ सालापासून तिसवाडीतील पणजी हा मतदारसंघ अखंडितपणे कायम भाजपसोबत राहिला आहे. तिसवाडीतील पाचपैकी तीन मतदारसंघ आज काँग्रेसकडे आहेत तर दोन मतदारसंघ भाजपकडे आहेत. २०१२ सालच्या निवडणुकीतही तिसवाडीतील पणजी व सांतआंद्रे हे दोन मतदारसंघ भाजपकडे गेले होते. या वेळी भाजपकडे पणजी व कुंभारजुवे गेले. सांतआंद्रेत मात्र या वेळी भाजपचा प्रभाव पडला नाही. (प्रतिनिधी)