शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात घराणेशाहीला पुन्हा झिडकारले

By admin | Updated: March 12, 2017 14:23 IST

गोव्यातील निवडणूक निकालाने सर्व राजकीय पक्षांनी बरेच काही शिकण्याचे आहे.

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 12 - गोव्यातील निवडणूक निकालाने सर्व राजकीय पक्षांनी बरेच काही शिकण्याचे आहे. जनतेने जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी दिलेली असली तरी घराणेशाहीला थारा दिलेला नाही. सत्तरीतील राणे पितापुत्रांचा जुनाच अपवाद वगळता एकाही कुटुंबातील दोन व्यक्तींना पुन्हा स्थान दिलेले नाही. घराणेशाहीच्या नादामुळे २०१२ साली काँग्रेसला सत्ताभ्रष्ट व्हावे लागले होते. त्यातून फारसा बोध काँग्रेसने घेतलेला नाही. एवढे सारे महाभारत होऊनही सांगे मतदारसंघात काँग्रेसचे आमदार बाबू कवळेकर यांच्या पत्नी सावित्री कवळेकर यांनाच उमेदवारी देऊन घराणेशाहीची परंपरा कायम ठेवली. सत्तरीत प्रतापसिंग राणे आणि विश्वजित राणे या पितापुत्रांना दिलेल्या उमेदवाऱ्या या त्यांचे या भागात असलेल्या निर्विवाद प्रभुत्वामुळे दिल्यानं समजण्यासारखे आहे. परंतु सांगेतील उमेदवारी ही लोकांच्या पचनी पडण्यासारखी मुळीच नव्हती आणि त्याचे परिणाम पक्षाला भोगावे लागले. ताळगावमध्ये जेनीफर मोन्सेरात या काँग्रेसच्या उमेदवार निवडून आल्या असल्या तरी काँग्रेसने समर्थन दिलेले त्यांचे पती बाबूश मोन्सेरात पणजीत हरले. मोन्सेरात कुटुंबीयांचे राजकीय अस्तित्व अर्धे कमी झाल्याचे हे संकेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढविलेले चर्चिल आलेमाव बाणावलीत पुन्हा निवडून आले आहेत. त्यांचे बंधू ज्योकीम आलेमाव मात्र कुंकळ्ळी मतदारसंघात हरले आहेत. ज्योकीम यांनी अपक्ष जरी उमेदवारी दाखल केली असली तरी एका कुटुंबातील दोन उमेदवार जनतेने नाकारले. भाजपचे खासदार आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे पुत्र सिद्धेश नाईक कुंभारजुवे मतदारसंघातून निवडणूक लढविण्यात इच्छुक होते. त्या मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपात आलेले पांडुरंग मडकईकर हे मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले. म्हणजेच त्या मतदारसंघात सिद्धेश नाईक यांनी निवडणूक लढविली असती तर ते कितपत बाजी मारू शकले असते हे आता स्प्ष्टच झाले आहे. घराणेशाहीला झिडकारणाऱ्या या निकालांतून सर्वच राजकीय पक्षांनी धडा घेण्यासारखी ही परिस्थिती आहे. यापुढे पक्षाच्या उमेदवाऱ्या या घरच्या घरी वाटून घेतल्या तर काय परिणाम होऊ शकते, याची झलक सर्वांना पाहायला मिळाली आहे. राजकीय पक्ष जेव्हा शिस्तीची बंधने स्वत:वर घालून शकत नाहीत तेव्हा जनता ती सूत्रे स्वत:कडे घेते हेच त्यावरून सिद्ध होत आहे.