शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

‘कट प्रॅक्टीस’ हा वैद्यकीय व्यवसायाला लागलेला रोग! - तात्याराव लहाने 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 04:41 IST

 बाली : ‘जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले’, ही तुकोबांची शिकवण आजच्या काळात कट प्रॅक्टीस करणाºया डॉक्टरांचे डोळे उघडण्यासाठीच आहे. रुग्ण पैशाच्या भ्र्रांतीत असतात. त्यामुळे त्यांच्या रोगाचे निदान कमीत कमी खर्चात करणे आवश्यक आहे. मात्र अशा वेळी त्यांना नाडणारी ‘कट प्रॅक्टीस’ ही वैद्यकीय पेशाला लागलेला रोग आहे, अशी ...

 बाली : ‘जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले’, ही तुकोबांची शिकवण आजच्या काळात कट प्रॅक्टीस करणाºया डॉक्टरांचे डोळे उघडण्यासाठीच आहे. रुग्ण पैशाच्या भ्र्रांतीत असतात. त्यामुळे त्यांच्या रोगाचे निदान कमीत कमी खर्चात करणे आवश्यक आहे. मात्र अशा वेळी त्यांना नाडणारी ‘कट प्रॅक्टीस’ ही वैद्यकीय पेशाला लागलेला रोग आहे, अशी टीका ज्येष्ठ नेत्रविकारतज्ज्ञ आणि मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी येथे केली.इंडोनेशियातील बाली येथे सुरू असलेल्या सातव्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. डॉ. लहाने यांनी अध्यक्षीय भाषणात अन्यही अनेक महत्त्वाच्या विषयांना हात घातला. त्यांच्या भाषणाचा हा संपादित अंश.कट प्रॅक्टीस म्हणजे एखाद्या डॉक्टराने रुग्णाला उपचारांसाठी दुसºया डॉक्टराकडे पाठविण्यासाठी कमिशन स्वरुपात पैसे घेणे. गरज नसताना महागड्या चाचण्या सांगून लॅबकडून कमिशन घेणे. या कट प्रॅक्टीसमुळे देशातला सर्वसामान्य नागरिक भरडला जात आहे. यासंबंधी शासनाने कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याबाबत कारवाईचे विशेष अधिकार देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, अशी माहिती डॉ. लहाने यांनी या वेळी दिली.रुग्ण मरावा, असे डॉक्टरला कधीच वाटत नसते. तो रुग्णाला वाचविण्यासाठीच धडपडत असतो. पण तो देव नव्हे. काही प्रकरणांत प्रयत्न करूनही यश मिळत नाही. अशा वेळी रुग्णांच्या नातेवाइकांनीही संयम ठेवायला हवा, असे आवाहनही डॉ. लहाने यांनी या वेळी केले.लोकसंख्येच्या तुलनेत डॉक्टरांची संख्या वाढली पाहिजे. म्हणून आणखी वैद्यकीय महाविद्यालयांची गरज आहे. तसेच अतिविशेषोपचार विभागांची संख्या वाढविणेही आवश्यक आहे. तसेच देशातील १०४ दशलक्षपेक्षा जास्त लोकसंख्या आदिवासी भागात राहात असून त्यांच्या आरोग्यविषयक गरजांकडे शासनाने लक्ष दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.त्याचप्रमाणे, ‘भारतामध्ये अवयवदात्यांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. याबाबतच्या अंधश्रद्धा, विविध गैरसमज दूर करण्याची नितांत आवश्यकता आहे. मृत्यूनंतर एक देह ७ जणांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरू शकतो. राज्यात २०१५-१६ साली ४१ जणांनी अवयवदान केले होते. यंदा शासनाच्या महाअवयवदान अभियानानंतर हा आकडा १४१ गेला आहे. ‘अनंत आमुची ध्येयासक्ती, अनंत अन् आशा’ या कुसुमाग्रजांच्या काव्यपंक्तींनुसार, वैद्यकीय क्षेत्राचा आवाका अनंत आहे. तसेच वैद्यकीय क्षेत्रासमोरील आव्हानेही मोठी आहेत,’ असेही लहाने यांनी म्हटले.आरोग्य सांभाळण्याची जबाबदारीवैद्यकीय क्षेत्रासमोरील आव्हाने समर्थपणे पेलण्याचे आमचे ध्येय आहे आणि ते ध्येय आम्ही साध्य करू, अशी आम्हाला आशा आहे. सर्वांचे ‘आरोग्य’ अधिकाधिक उत्तम करण्यासाठी आम्ही डॉक्टर नेहमीच प्रयत्नशील असतो; परंतु वैयक्तिक पातळीवर आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी ही प्रत्येक नागरिकाची आहे, असेही लहाने यावेळी म्हणाले.