सीआरपीएफ १९२ बटालियन गडचिराेली
सीआरपीएफ १९२ बटालियनच्या वतीने जागतिक याेग दिन साेमवारी साजरा करण्यात आला. या निमित्ताने अधिकारी व जवानांनी विविध प्रकारची याेगासने केली. नियमित याेग साधना करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच याेगाचे फायदे अधिकाऱ्यांनी समजावून सांगितले. कार्यक्रमाला कमांडंट जियाऊ सिंह, द्वितीय कमान अधिकारी दीपक शाहू, प्रभात गाैतम, उप कमांडंट संध्या राणी व जवान उपस्थित हाेते.
शिवाजी महाविद्यालय गडचिराेली
शिवाजी महाविद्यालयात साेमवारी जागतिक याेग दिन प्राचार्य डाॅ. एम. जे. मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी प्रा. डाॅ. एम. टी. नक्षिणे यांनी कर्मचाऱ्यांकडून कपालभाती, अनुलाेम-विलाेम, बटरफ्लाॅय, मंडुकासन, ताडासन, कटीचक्रासन, त्रिकाेणासन, सूर्यनमस्कार आदी याेग प्राणायाम तसेच आसनांचा सराव करवून घेतला. डाॅ. मेश्राम यांनी नियमित याेग व प्राणायाम करण्याचे आवाहन केले. आभार डाॅ. आर. एस. गाेरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी अरूण भांडेकर व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
श्री. गाेविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालय कुरखेडा
मुनघाटे महाविद्यालयात जागतिक याेग दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी याेग शिक्षिका वर्षा देशमुख व नयना मेश्राम यांनी याेगाचे महत्व सांगून प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यानंतर उपस्थितांनी कपालभाती, अनुलाेम-विलाेम, बटरफ्लाॅय, मंडुकासन, ताडासन, कटीचक्रासन, त्रिकाेणासन, सूर्यनमस्कार आदी याेग प्राणायाम तसेच आसनांचा सराव केला. प्रास्ताविक रासेयाे प्रमुख प्रा. डाॅ. गुणवंत वडपल्लीवार तर आभार डाॅ. रवींद्र विखार यांनी मानले.