शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

यंदा जिल्ह्यात युरिया खताची टंचाई नाही

By admin | Updated: October 10, 2016 00:52 IST

कृषी विभागाच्या मागणी प्रमाणे केंद्र शासनाकडून युरिया खताचा पुरवठा उपलब्ध होत असल्याने ...

शेतकऱ्यांना दिलासा : तीन हजार मेट्रिक टन साठा शिल्लकगडचिरोली : कृषी विभागाच्या मागणी प्रमाणे केंद्र शासनाकडून युरिया खताचा पुरवठा उपलब्ध होत असल्याने यावर्षी पहिल्यांदाच युरिया खताचा तुटवडा निर्माण झाला नाही. अद्यापही जिल्ह्यात ३ हजार ८१ मेट्रिक टन युरिया खत उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हा परिषद कृषी विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. धानपीक गर्भात आल्यानंतर शेतकरी धानपिकाला युरिया खत देत असल्याने सप्टेंबर ते आॅक्टोबर महिन्यात युरिया खताची मागणी अचानक वाढते व या कालावधीत पुरेसा युरिया खत उपलब्ध राहत नसल्याने युरिया खताची टंचाई निर्माण होते. याचा गैरफायदा जिल्ह्यातील अनेक कृषी केंद्र संचालक यापूर्वी घेत होते. शेतकऱ्यांकडून युरिया खतासाठी अतिरिक्त किंमत आकारली जात होती. यावर्षी मात्र अगदी सुरुवातीपासूनच युरिया खताचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्याचबरोबर डीएपी खत १ हजार १०७ मेट्रिक टन, एसएसपी १ हजार ४६१, एमओपी खत ११४ मेट्रिक टन, संयुक्त खते १ हजार २२० व मिश्र खते २ हजार १८ मेट्रिक टन उपलब्ध आहे. रब्बी हंगामात डीएपी, मिश्र खते वापरली जातात. त्यामुळे रब्बीतही खतांचा तुटवडा निर्माण होणार नाही, असा दावा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने व्यक्त केला आहे. मागास गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बी-बियाणे व खतासाठी धावपळ करावी लागू नये, यासाठी जि. प. च्या कृषी विभागाने योग्यरित्या नियोजन करून शासनाकडे खताच्या मागणीचा प्रस्ताव खरीप हंगामाच्या पूर्वीच सादर केला होता. त्यानंतर कृषी अधिकाऱ्यांनी वारंवार पाठपुरावा करून गडचिरोली जिल्ह्याला खताचा साठा उपलब्ध करून देण्याची विनंती केली. गरजेनुसार जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात संबंधित कृषी केंद्रात खत वेळेवर पोहोचावे, अशी वितरण व वाहतूक व्यवस्था जि. प. च्या कृषी विभागाने यंदा राबविली. त्यामुळे यावर्षी प्रथमच दुर्गम व अतिदुर्गम भागातीलही शेतकऱ्यांना खत वेळेत व सहज उपलब्ध झाले. पुरेशा प्रमाणात खत दिल्यामुळे यंदा धानपिकाचे उत्पादन वाढणार आहे. (प्रतिनिधी)३७ हजार मेट्रिक टन खताची विक्रीजिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत सर्व प्रकारची मिळून एकूण ३७ हजार ९९४ मेट्रिक टन खताची विक्री जिल्ह्यातील अधिकृत कृषी केंद्रांमार्फत झाली आहे. यामध्ये युरिया १९ हजार मेट्रिक टन, डीएपी १ हजार १४० मेट्रिक टन, एसएसपी ३ हजार १२० मेट्रिक टन, एमओपी २०० मेट्रिक टन, संयुक्त खते ६ हजार ५३४ मेट्रिक टन व ८ हजार मेट्रिक टन मिश्र खताची विक्री आतापर्यंत झाली आहे. यंदा जिल्हाभरातील कृषी केंद्रातून सहज खत मिळाल्याने शेतकऱ्यांची अडचण जाणवली नाही.