शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

उपसा सिंचन योजनांची कामे मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 23:37 IST

गडचिरोली तालुक्यातील कोटगल आणि आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव-ठाणेगाव उपसा सिंचन योजनांच्या कामांनी आता वेग घेतला आहे. गेली अनेक महिने पाटबंधारे विभागाकडे अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे या योजनांची कामे रखडली होती.

ठळक मुद्दे१५ गावांना सिंचनाची प्रतीक्षा : निधी असूनही अधिकाºयांअभावी रखडले होते काम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील कोटगल आणि आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव-ठाणेगाव उपसा सिंचन योजनांच्या कामांनी आता वेग घेतला आहे. गेली अनेक महिने पाटबंधारे विभागाकडे अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे या योजनांची कामे रखडली होती. पण आता विविध कामे मार्गी लागली आहेत. या दोन्ही उपसा सिंचन योजनांमधून दोन्ही तालुक्यात १५ गावांना साडेपाच हजार हेक्टर क्षेत्राला सिंचन होणार आहे.७८ टक्के वनक्षेत्राने व्यापलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मोठे सिंचन प्रकल्प उभारणे शक्य नाही. त्यामुळे मध्यम प्रकारातील उपसा सिंचन योजना आणि लघुसिंचन प्रकल्पातून सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी १० वर्षांपूर्वी दोन उपसा सिंचन योजना आणि कुरखेडा तालुक्यातील येंगलखेडा येथे लघु पाटबंधारे प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती.वैनगंगा नदीच्या तिरावर कोटगल गावाजवळ उभारल्या जात असलेल्या कोटगल उपसा सिंचन योजनेला ३० एप्रिल २००८ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या योजनेतून गडचिरोली तालुक्यातील कोटगल, नवेगाव, मुरखळा, पारडीकुपी, कन्हेरी, पूलखल, मुडझा बुज., मुडझा व इंदाळा या ९ गावातील ३००० हेक्टर क्षेत्राला सिंचनाला लाभ मिळणार आहे. ४०.३० कोटींच्या या योजनेवर आतापर्यंत २६.३१ कोटी रुपये खर्च झाले आहेत. या योजनेच्या पंपगृह व उर्ध्वनलिकेच्या बांधकामासाठी ५.९८ हेक्टर जमिनीची आवश्यकता होती. त्यापैकी ५.०२ हेक्टर खासगी जमीन सरळ खरेदीने संपादित करण्यात आली तर उर्वरित ०.९५ हेक्टर जमीन सरळ खरेदीने संपादन करण्याची कार्यवाही प्रगतीपथावर असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.येंगलखेडा प्रकल्पाचे काम पूर्ण, कालवे प्रगतीपथावरकुरखेडा तालुक्यातील येंगलखेडा गावाजवळ स्थानिक नाल्यावर बांधण्यात येत असलेल्या येंगलखेडा लघु पाटबंधारे प्रकल्पातून येंगलखेडा, चिचेवाडा, सावरगाव व नेहारपल्ली या ४ गावआंना सिंचनाला लाभ मिळणार आहे. या प्रकल्पाचे काम १०० टक्के झाले असले तरी कालव्यांची कामे व्हायची आहेत. उजवा व डाव्या कालव्याच्या बांधकामासाठी कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. डाव्या कालव्यासाठी वृक्षतोड करावी लागत आहे. या प्रकल्पात २०१४ मध्ये पाण्याचा साठा करण्यात आला आहे. भूसंपादनास जमीनधारकांनी केलेल्या विरोधामुळे प्रकल्पाचे काम रखडले आहे. याशिवाय नक्षलग्रस्त अतिसंवेदनशिल भाग असल्यामुळे काम करण्यास अडचणी येत आहेत. या प्रकल्पाकरिता अंदाजे ३३.८४ हेक्टर खासगी जमीनीची आवश्यकता आहे. त्यापैकी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राकरिता नलिकसा व दल्ली येथील २२.२२ हेक्टर खासगी जमीन संपादित करण्यात आली. उर्वरित ११.६२ हेक्टर जमिनीची संयुक्त मोजणी झाली असून येंगलखेडा येथील ३.२० हेक्टर खासगी जमीन सरळ खरेदीकरिता प्रस्तावित आहे. त्यासाठी दर निर्धारण प्रस्ताव जिल्हाधिकाºयांच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. उर्वरित ८.४२ हेक्टर जमिनीचे दर निर्धारण प्रस्ताव तयार करणे सुरू आहे.२०१९-२० अखेर सिंचनाला सुरूवातकोटगल योजनेसाठी २०१७-१८ मध्ये ७ कोटींची कामे तर २०१८-१९ मध्ये १० कोटींची कामे पूर्ण करून २०१९ मध्ये प्रत्यक्ष सिंचनाला सुरूवात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच डोंगरगाव-ठाणेगाव योजनेसाठी २०१७-१८ मध्ये ३ कोटी, २०१८-१९ मध्ये ४ कोटी खर्चातून १००० हेक्टर तर २०१९-२० मध्ये ३ कोटी खर्चातून कामे पूर्ण करून २९५० हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुरूवात करण्याचे नियोजन गडचिरोली पाटबंधारे विभागाने केले असल्याची माहिती कार्यकारी अभियंता अविनाश मेश्राम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.पंपगृहांचे काम प्रगतीपथावरकोटगल उपसा सिंचन प्रकल्पाच्या पंपगृहाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. उर्ध्वनलिकेचे २१०० मीटर लांबीचे पाईप टाकण्याचे काम झालेले असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहे. स्वीच यार्डमध्ये माती भरण्याचे काम चालू आहे. बंद नलिका वितरण प्रणालीचे अंदाजपत्रकाचे काम सुरू आहे.डोंगरगाव-ठाणेगाव उपसा सिंचन प्रकल्पाच्या पंपगृहाचे बांधकाम ४० टक्के पूर्ण झाले आहे. उर्ध्वनलिकेच्या भूसंपादनाअभावी पाईप बसविण्याचे काम प्रलंबित आहे. जून २०१९ अखेर ही योजना पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.