लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली शहरातील खरपुंडी मार्गावर गांडूळ खताची निर्मिती केली जात आहे. यातून शेतकऱ्याना गांडूळ खत उपलब्ध होण्याबरोबरच नगर परिषदेलाही उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर घणकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासही मदत होणार आहे.शहरातील घनकचरा ही गंभीर समस्या असल्याने या घनकचऱ्याचे व्यवस्थापन प्रत्येक नगर परिषदेने करावे, असे सक्त निर्देश केंद्र शासनाने दिले आहेत. घनकचºयाचे व्यवस्थापन केले जात नसल्याने भविष्यात गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन नगर परिषदेने गांडूळ खत निर्मितीचे कंत्राट २२ लाख रूपयाला दिले आहे. शहरातून गोळा झालेल्या कचऱ्याचे सर्वप्रथम वर्गीकरण केले जात आहे. कापलेले गवत आठवडी बाजारातील भाजीपाला आदींपासून गांडूळ खताची निर्मिती केली जात आहे. कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी सात मजूर कार्यरत आहेत. गांडूळ खत शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गांडूळ खताचा वापर केल्यास उत्पादनाचा दर्जा टिकून राहण्यास मदत होते. गांडूळ खत निर्मितीसाठी पाण्याची गरज भासते. मात्र नगर परिषदेने या ठिकाणी एकही बोअरवेल खोदले नाही. परिणामी टँकरने पाण्याचा पुरवठा करावा लागत असल्याची माहिती कुणाल चावके यांनी दिली.
कचऱ्यापासून गांडूळ खत निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 23:24 IST
गडचिरोली शहरातील खरपुंडी मार्गावर गांडूळ खताची निर्मिती केली जात आहे. यातून शेतकऱ्याना गांडूळ खत उपलब्ध होण्याबरोबरच नगर परिषदेलाही उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर घणकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासही मदत होणार आहे.
कचऱ्यापासून गांडूळ खत निर्मिती
ठळक मुद्दे खरपुंडी मार्गावर प्रकल्प : कचऱ्याचे केले जाते वर्गीकरण