कृषी विज्ञान केंद्रात ॲझाेला तंत्रज्ञान एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी साेमवारी ते बाेलत हाेते. प्रशिक्षणाला राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयाेग मुंबईच्या सल्लागार प्रगती गाेखले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी उपसंचालक अरूण वसवाडे, मुख्य अन्वेषक तथा वनस्पती राेग शास्त्र विभागाचे प्रा. डाॅ. सुभाष पाेटदुखे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक संदीप कऱ्हाळे उपस्थित हाेते.
प्रगती गाेखले यांनी कृषी विपणन या विषयावर मार्गदर्शन केले. अरुण वसवाडे यांनी कृषी संजीवनी सप्ताहविषयी माहिती दिली. डाॅ. सुभाष पाेटदुखे यांनी ॲझाेलामध्ये नत्राचे प्रमाण ४ ते ५ टक्के असते. ही वनस्पती पिकांना नत्र पुरवठा करते, असे प्रतिपादन केले.
संदीप कऱ्हाळे यांनी शेतकऱ्यांनी ॲझाेला तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. प्रशिक्षणादरम्यान शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक स्वरूपात ॲझाेलाचे वाटप करण्यात आले. यशस्वीतेसाठी डाॅ. व्ही. एस. कदम, एन. पी. बुद्धेवार, डी. व्ही. ताथाेड, पी. ए. बाेथीकर, डी. डी. चव्हाण, एस. पी. थाेटे, एच. पी. राठाेड, जी. पी. मानकर, शशिकांत सलामे, अंकुश ठाकरे, एम. वाय. गणवीर, पी. आर. नामुर्ते, अंकुश गाठाेडे यांनी सहकार्य केले.