रोहयातून मंजुरी : वन विभागातर्फे हजारो मजुरांना रोजगारगडचिरोली : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सन २०१६-१७ या वर्षात आलापल्ली, सिरोंचा व गडचिरोली वन विभागांतर्गत २ कोटी २३ लाख ५१ हजार रूपये किमतीच्या रोपवाटिकेची एकूण २५ कामे मंजूर करण्यात आली आहे. यापैकी आलापल्ली वन विभागाने आतापर्यत रोपवाटिकेची तीन कामे पूर्ण केली आहे. या कामातून हजारो मजुरांना रोजगार प्राप्त झाला आहे. गडचिरोली वनवृत्तांतर्गत आलापल्ली वन विभागाच्या वतीने रोजगार हमी योजनेतून रोपवाटिकेची एकूण १२ कामे प्रस्तावित करण्यात आली. सर्वच कामांना मंजुरी देण्यात आली. यापैकी वन विभागाने तीन कामे पूर्ण केली आहेत. सर्वच १२ कामांची अंदाजपत्रकीय किमत १११.५९० लाख रूपये आहे. आतापर्यंत या कामांवर १५.५१० लाख रूपयांचा खर्च झाला आहे. उर्वरित आठ कामे सुरू असून एक काम सेल्फवर ठेवण्यात आले आहे. सिरोंचा वन विभागांतर्गत रोपवाटिकांची १० कामे रोहयोतून मंजूर करण्यात आली. या कामाची अंदाजपत्रकीय किमत ९० लाख रूपये आहे. सर्वच १० कामे सेल्फवर ठेवण्यात आली आहे. गडचिरोली वन विभागांतर्गत २१ लाख ९२ हजार रूपये किमतीचे रोपवाटिकांचे तीन कामे मंजूर करण्यात आली. यापैकी दोन कामे सुरू असून एक काम सेल्फवर ठेवण्यात आले आहे. राज्याच्या वन विभागाने यावर्षीपासून वन महोत्सव कार्यक्रमांतर्गत वृक्ष लागवडीचा जम्बो कार्यक्रम हाती घेतला आहे. गडचिरोली जिल्ह्यात या महोत्सवांतर्गत पाच लाखांवर वृक्षांची लागवड १ ते ७ जुलैदरम्यान करण्यात येणार आहे. वन विभागाने रोहयोतून तयार केलेल्या रोपवाटिकेत विविध प्रकारच्या झाडांची रोपे उपलब्ध आहेत. वृक्ष लागवडीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वन विभागाच्या या रोपवाटिकांचा परिपूर्ण उपयोग करण्यात येणार आहे. रोजगार हमी योजनेतून निर्माण करण्यात येत असलेल्या रोपवाटिकांना नियमित पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था वनाधिकाऱ्यांनी वनमजुरांमार्फत केली आहे. या रोपवाटिकेचे संरक्षण व संवर्धनाकडे विशेष लक्ष आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
दोन कोटींतून २५ रोपवाटिका होणार
By admin | Updated: June 19, 2016 01:08 IST